हिंदुत्व व भारतीय व आपण.
हिंदुत्व व भारतीय व आपण.
माझ्या सुजाण व सुतर्क वाचक हो, मी अचानक ह्या गंभीर विषयावर का लिहितेय, असे वाटून घेऊ नका. मी तुम्हाला, "सुतर्क"असे संबोधले. सतर्क शब्द सर्वांना माहीत आहेच. मी तयार केलेला, हा नवीन शब्द-- 😊 शीतावरून भाताची परीक्षा, या न्यायाने, आपण तर्क करणारच की हा विषय, आजच्या काळाशी किती संबंधित आहे.
आता मी आपल्या स्वातंत्रवीर सावरकरांची मते सांगते. --लिहिते.
खरे म्हणजे, हे इथे लिहिण्यासाठी त्या पुस्तकाच्या प्रकाशकांची परवानगी घेणे, आवश्यक आहे. मला मान्य आहे. पण आजच्या परिस्थितीत या सोपस्कारासाठी, वेळ नाही. इंग्रज राजवट आली, तीच मुळी, divide and rule या पद्धतीतून. आपले सर्व राजे एकत्रित आले असते तर...
असो. आज पुन्हा तेच घडतेय. आपण प्रथम हिंदू आहोत. भारतीय आहोत. हेच मनःपूर्वक मानणे, जरुरी आहे.
हिंदुत्व हे हिंदू धर्मपेक्षा वेगळे आहे. दोन लेखातून मी वारकरी संप्रदायाचे, हिंदुत्व व बंधूत्व दाखवून दिले. समोरील, प्रत्येक व्यक्तीला, "माऊली" वंदन करणारी ही संस्कृती म्हणजेच हिंदुत्व.
सावरकर सांगतात,
"हिंदुत्व, हा केवळ शब्द नाही, तर तो इतिहास आहे. काही वेळेला काही लोक, हिंदुत्व या शब्दाला जवळ असणाऱ्या,' हिंदू धर्म या शब्दाशी गफलत करून हा इतिहास केवळ धार्मिक किंवा अध्यात्मिक इतिहास समजतात. पण तसे नसून हा इतिहास सर्वांगीण आहे. हिंदू धर्म हा हिंदुत्व या मोठ्या संकल्पनेचा, त्याच शब्दापासून उत्पन्न झालेला, एक भाग आहे. म्हणून हिंदुत्व या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला नाही, तर हिंदु धर्म या शब्दाचा अर्थ नीट समजत नाही.
हिंदू संस्कृतीचा अमूल्य ठेवा, वारसा म्हणून मिळालेल्या सहभगिनी जातीजमातींमध्ये आहे. हिंदुत्व आणि हिंदू धर्म या दोन शब्दांतील फरक ण समजल्यामुळे या जाती जमातीत अनेक गैरसमज आणि परस्परांवर अविश्वास निर्माण झाला. भाषाशास्त्राची पद्धती, जर आमच्या वाटेत आली नसती तर,"हिंदुपणा" हाच शब्द, हिंदूधर्म या शब्दापेक्षा, हिंदुत्वाशी अधिक जवळ आम्ही योजला असता. हिंदुत्व या शब्दामध्ये आमच्या हिंदू वंशाच्या अस्तित्वाच्या सगळ्या कृती आणि विचारांच्या सगळ्या शाखांचा समावेश होतो."
हे समजण्यास जरा कठीण वाटेल. पण, कृपया, जाऊ देत, म्हणून सोडून देऊ नका 🙏🙏🙏.
दोनदा- तीनदा वाचा. शाळेत असाच अभ्यास केला, नाही का, मग..
आणि उद्या मी हे सर्व सोप्या सरळ आजकाल च्या बोली भाषेत समजून सांगीनच. उदाहरणा सहित, तेव्हा try and try.
आणि आजच का लिहिलेय याचा सुसंगत तर्क करा. समझने वालों को इशारा काफी है. तर उद्या भेटू या व हे विचार समजून, त्यानुसार आचार व वर्तन करू या.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
Comments
Post a Comment