जिद्द व पारिवारिक एकजुटीचे महान उदाहरण म्हणजे सावरकर.
15 जुलै 2025. जिद्द व पारिवारिक एकजुटीचे महान उदाहरण. म्हणजे सावरकर.
माझ्या वाचनप्रिय व सुबोध वाचक हो,
काल मी तुम्हाला, एका कवीयत्रीची, उज्वला बोरकरची कविता विशद करून सांगितली. तिचा पुढील भाग, आता वाचा. हो, आपण सावरकर परिवार, यांच्या बद्दल माहिती जाणून घेणारच आहोत. पण त्यांची जिद्द व देशभक्ती विषयीची एकजूट जाणून घेणे, आवश्यक आहे. पण त्यासाठी आपण, त्यांच्या मार्गाने जाणे, निदान थोड्या प्रमाणात का होईना, मला गरजेचे वाटते. फक्त वाचून सोडण्याचा "हा" विषय नव्हे.
ते सांगतात,
" देशभक्ती साठी मृत्यू ही जवळ करावा. पण त्या पेक्षा, देशसेवेसाठी, "जगणे", ही तेवढेच आवश्यक आहे. सर्वपरीने, परिस्थिती जाणून घेणे, ही गरजेचे आहे. आपण नेमके काय करू शकतो, त्याचा शोध घ्यावा. हेच ही कवियत्री, ह्या कवितेतून सांगत आहे. जे शक्य आहे, ते कराच.
तर पुढील कडवी बघा.
"if you know your fault,
Admit it."
जेव्हा सावरकरांना जाणवले, की अंदमामध्ये, मरण आले, तर काही साध्य होणार नाही, उलट आपल्या सारखे, जाज्वल देशभक्त निर्माण करणे, हाच खरे देश भक्तीचा योग्य मार्ग आहे, तेव्हाच त्यांनी,
तो, " माफीनामा दिला, त्यात त्यांनी राजकारणातून दूर राहीन, फक्त समाजकारण करेन. असे लिहून, इंग्रजांना हातोहात बनवले. रत्नागिरीत राहून त्यांनी, जन जागृतीचे महान कार्य केले. तेथेच त्यांनी, " मोपल्यांचे बंड", हे राजकीय पुस्तक लिहिले.
आणि.,
या कवितेतील पुढच्या कडव्याप्रमाणे,
If you feel it right,
do it.
या तत्वाला, धरून, त्यांच्या,, थोरल्या बंधूने(बाबाराव सावरकर) हे पुस्तक, स्वतः च्या नावावर छापले. इंग्रजाचा, रोष आपल्यावर ओढवून घेतला व आपल्या बंधूचे, जन जागरणाचे कार्य निर्विघ्न चालू राहण्यास, हातभार लावला. ही ह्या भावांची देश कार्यातील, एकजूट.तसे तर,त्यांनी ही अंदमानमध्ये, हाल सोसले होते, तरीही.
आता ह्या ओळी वाचा,
if you know its being wasted,
Save it.
आणि
If you feel its beautiful,
Appreciate it.
हेच बाबारावांनी कृतीतून केले.
ह्या कवितेतून तरी बोध घ्या हो.. तर उद्या भेटू याच आणि माझा blog वाचा hi 🙏🙏🙏 जोडून विनंती.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
Comments
Post a Comment