मानस शास्त्र आणि आपण व आपली मागची व पुढची पिढी

 जुलै 2025. मानस शास्त्र व आपण मागची पिढी व पुढची पिढी..

           माझ्या मागच्या, आजच्या व पुढच्या पिढीतील वाचक वर्ग,  मी एकदम track बदलाय, असे वाटले नं, मुळीच नाही, मी आधी च्या सर्व blogs शी connected लिहीत आहे.

                आपण ही 40 ते 70+ वयातील पिढी थोडी संभ्रमात असते, हे सत्य आहे. आणि त्यापुढील पिढी तर parenting बाबत चांगलीच गोंधळात असते. मार्काच्या घोडा रेस मध्ये, आदर्श मुले व आदर्श पालक होण्याची रेस च धावत असतात.

          पण आपल्याला व आपल्या आधीच्या पिढीला, म्हणजे आपल्या पालकांना, जितके मानसशास्त्र अवगत असायचे, त्याची तुलना नाही.

     एक मजेशीर आठवण सांगते. मी 10 वर्षाची होते. माझी भावली मला जीव की प्राण होती. त्याच बरोबर, माझ्यासाठी, एका भावला आणला. साधारण सव्वा फुटी. अगदी खऱ्या बाळा सारखा. तेव्हाच माझ्या मावशीला, बाळ झाले. तीही तेवढ्याच आकाराची. तिला मालिश करताना पाहून मी ही माझ्या भावल्याचे हात तसेच दुमडले, आणि झाले. त्याचा एक हात निखळला.

         अर्थात, आई दादांनी (वडील) समजूत काढली, दुकानात नेऊन दुरुस्त करू. पण मी, माझ्या त्या ""बाळाला "" दुकानात नाही न्यायचे म्हणून अडून बसले.

           का ते विचारा. माझ्या आत्याचे यजमान, भाऊसाहेब (रणदिवे ) दादरमध्ये, नावाजलेले, हाडवैद्य होते. आणि नुकतेच,  त्यांनी, एका रेल्वे अपघातात, गुडघ्यातून पाय अक्षरश, उलटा झालेला पाय चांगला केलेला पाहिला होता. अर्थात, त्यावेळी, मीच, ते पाहताना, रडून गोंधळ घातला होता. त्यामुळे मी बालहट्ट धरला. त्यांनीच, माझ्या बाळाला, बरे करायचे. शेवटी त्यांना बोलावले, त्यांनी ही माझ्या मनाला समजून घेतले व त्यांच्या सोबत त्या माझ्या " बाळाला " न्यावयाचे कबूल केले. आईने एक पिशवी आणली. झाले,माझे बिनसले. त्याला पिशवीतून का न्यायचे, मला ही असेच नेणार का? 

      आणि काय सांगू,  त्यांनी (भाऊसाहेब), बालमानसशास्त्र जाणून त्या भावल्याला, खऱ्या बाळासारखे, कडेवर घेतले व पूर्ण गल्लीतून, तसेच, जो पर्यंत मी वरून बघत होते, तो पर्यत, चालत गेले, अर्थात सर्व बघत असतील, पण माझे मन राखण्यासाठी, त्यांच्या घराच्या दिशेने गेले, दुकान होते विरुद्ध दिशेला. नंतर त्यांनी पिशवीत घातले असेल. वळसा घालून दुकानात गेले असतील. आता मला सांगा, ह्यालाच बाल मानसशास्त्र जाणकार म्हणावे नं? एक प्रकारे आत्मशक्ती - राम- म्हणावा नं

         आजचे parenting couse केलेले पालक, तेही आत्याचे यजमानांनी सहजच केले, तसे करतील का? ते ही नामांकित हाडवैद्य, मीच नव्हे, तर सर्वांनी आपले, "इथे कर माझे जुळती", म्हणून 🙏🙏🙏🙏🙏

       उद्या अशाच एका  डॉक्टरांची सत्य कथा सांगेन.

      ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू