कारगिल युद्धातील शहीद जवानांना शतशः प्रणाम.

 कारगिल युद्ध

         प्रिय वाचकहो, ठीक आहे, राष्ट्र भक्ती प्रगट करण्यासाठी, फार मागे जाऊ नको या. पण कारगिल युद्ध तर तुम्हाला आठवत असेलच. त्या धारातीर्थ स्थानी जाऊन आलेल्या, माझ्या या मैत्रिणीचा अनुभव व सल्ला वाचा व आचरणात आणा. हिचे नाव,श्रीमती माधवी भगवान सोनावणे. हे युद्ध आपणा समोरच घडलेय, त्यात शहीद झालेल्या, आपल्या विरांची आठवण तरी सदैव मनी बाळगा. तिचा लेखच आज, मी तुमच्या समोर ठेवत आहे.

कारगिल युद्धातील शहीद जवानांना शतशः प्रणाम.

     आपल्या भारत देशाला स्वातंत्र मिळून 76वर्षे झाली. ते मिळवण्यासाठी लाखो वीरांनी बलिदान दिले, ज्यांच्या मुळे, आपण ते उपभोगतो. त्यांना विसरता कामा नये. पण आज.. असो.

माझी खूप इच्छा होती, की ज्या ठिकाणी, आपले जवान कसे व कोठच्या कठीण परिस्थितीत राहून, देशाचे रक्षण करतात, त्या ठिकाणी, एकदा जाऊन, निदान नतमस्तक व्हावे.

गेल्या वर्षी द्रास कारगिल, लेह लडाखला भेट देण्याचा योग आला. कारगिल द्रास मध्ये, war memorial ला भेट म्हणजे जणू एखाद्या तीर्थ क्षेत्राला भेट दिल्यासारखे वाटले.

   तेथे मधोमध ओळी, कोरल्या आहेत 

            ""तुम्ही घरी जाल, तेव्हा सर्वांना सांगा की, बघताना तुमच्या उद्यासाठी, आम्ही आमचा आज दिला आहे.

       कारगिल युद्धात साडे पाचशे जवान शहीद झाले आहेत. जेव्हा आपण इथे आरामात व सुखात निवांत जगतोय. तेव्हा ते आपल्या मुलांना आठवत तेथील कठीण परिस्थितीत जगत असतात..

            देशवासियांचे संरक्षण करण्यासाठी, सीमेवर जवान, अहोरात्र पहारा देत असतात. त्या वेळी, ते, आपला स्वतः चा व त्यांच्या परिवाराचा ही विचार करीत नसतात. लक्ष पूर्णतः सीमेवरील हालचाली कडे केंद्रित करावे लागते.

        Hall of FAME संग्रहालयामध्ये, या देशाच्या रक्षणासाठी, लडाख मध्ये, भारतीय लष्कराने, दिलेल्या बलिदानची व तेथील खडतर जीवनाची माहिती, एक जवान सांगतो, त्यावेळी, नुसत्या कल्पनेनेच, अंगावर काटा येतो.

           आजवर, पाकिस्थानबरोबरच्या युद्धात, लष्करी कारवाया मध्ये, भारतीय सेनेने, मिळवलेला विजय,

सियाचिन मधील, कारागील मधील, भारतीय सेनेच्या बलिदानाच्या इतिहासाची गाथा (45मिनिटाची डॉक्युमेंट्री )मोठ्या पडद्यावर, युद्धाचे वर्णन सांगत दाखवली जाते. त्यावेळी अंगावर शहारे येतात. डोळ्यात "अश्रू "उभे राहतात, 20.25हजार फूट उंच डोंगरावर, रात्रीच्या काळोखात, बर्फ तुडवत, तेही पाठीवर ओझे घेऊन जीवाची पर्वा न करता कसे चढतात, तेच जाणे!

         18हजार फूट उंचावर असलेला  "खारदूंगला पास"

पडद्यावर बघताना, फक्त 10मिनिटातच, आपले हात पाय गारठतात. अशा उणे तपमानात,अहोरात्र हे कसे उभे राहतात, कल्पना करा. पाहिजे तर प्रयोग करून बघा AC असेल नं, त्यात तपमान (-)करून उभे रहा बरे.

        त्यांना कसले सण वार नाहीत की वाढदिवस साजरे करणे नाही. आपण मात्र त्यांच्या भरवश्यावर, निर्धास्त व बिनधास्त आयुष्य जगत असतो. त्यांचे 

 निरंतर प्रशिक्षण सुरूच असते.

  पड द्या वरील कलाकार, अनेकांचे, "रोल मॉडेल "असतील. पण माझे,"रोल मॉडेल "--सर माणेकशॉ, निर्मल जीत सिंग सर, कुलदीप सिंह, कप्टन गुरमित सिंह पुनिया. कप्टन प्रदीप कुमार गौ, कप्टन विक्रम बत्रा आणि असे अनेक अगणित शहीद जवान, ज्यांची नावे देखील, आपल्याला माहिती नाहीत. अनेक छोटया छोटया गावातील वीर जे सीमेवर अहोरात्र पहारा देत उभे राहतात, त्यांच्या प्रति अभिमान बाळगू या 

         आपल्याला देशभक्ती राखण्यासाठी निदान, हे करू या. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, याची, आपण काळजी घेतली, तरी खूप आहे. इतरत्र कोठेही कचरा न टाकणे. रस्त्यात गाड्या पार्क न करणे कोठे ही न थुंकणे आणि आपले काम प्रामाणिकपणे केले तरी खूप आहे. ही सुद्धा एक राष्ट्र भक्तीच आहे. शक्ती आहे. 🇮🇳.

        सिमेवरील जवान, नोकरी, नाही करीत.. ते देशासाठी  "नि:स्वार्थ " कर्तव्य पार पाडत असतात. अहोरात्र.

         देशाच्या या जवानांचे शतशः आभार,धन्यवाद आणि त्रिवार सलाम!

      जय हिंद 

          माधवी भगवान सोनावणे.

यात मी एक महत्वाचे सत्य नमूद करणार आहे. या विरांचा सध्याच्या सरकारने, यथास्थित सन्मान केला आहे व त्यांचे स्मारक केले. तेथे लोकांनी जाऊन, त्यांचे शतश:आभार मानावेत, यासाठी तेथे भारतीय जनतेने जावे ह्यासाठी सोय केली आहे. 

       पण पूर्वी 1962 मध्ये je चीनशी युद्ध झाले, तेव्हा ही तेथे जे शहीद झाले, तेथे ना चिरा ना पणती. हे मी कल्पनेतून लिहीत नाही. माझे वडील तेव्हा तेथे होते. हां, ते प्रत्यक्ष लढले नाहीत ते कंट्रोलर ऑफ डिफेन्स मध्ये होते. पण सर्व रसद पुरविण्याची (अन्न कपडे व दारुगोळा) जबाबदारी यांच्यावर असे. त्यामुळे हे ही त्यांच्या मागोमाग असत. 

      आणि इथे आम्हाला, शाळेत, एक गीत बोलावण्यास लावत, " जिंकू किंवा मरू ",

    हे काय,  काळजाच्या ठोका चुके," मरू " बोलताना. बस इथे थांबते

       ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू