जो इतरांना आपले मानतो, तोच आपल्या परीने, समाज कार्य करतो.
25 जुलै 2025. जो इतरांना आपले मानतो तोच आपल्या परीने समाज कार्य करीत असतो.
माझ्या सजग वाचक हो, तुम्ही ह्या वर्गात येता का? याहो, मला आपले सगे सोयरे वाटाला, 😊👍
हं, काय सांगत होते. तुम्ही कोठच्या तरी स्टेशनवर जात असालच, तेथे प्रत्येक स्टेशनात, बुटपॉलिशवाले असतातच ना,ते कमी शिक्षित असल्याने, ते हे काम -आपल्या पोटासाठी करीत असतात, पण तेही सामाजिक जबाबदारी, मोठ्या प्रमाणात पार पाडत असतात आणि तेही संघटित पद्धतीने. कित्येक बूट पॉलिसवाले, कधी कधी, अचानक, त्यांच्या हातातील ब्रशने, लाकडी डब्यावर,ठपा ठपा आवाज करताना दिसतात. नीट ऐकाल, तर त्यात, एक विशिष्ट रिदम ऐकू येईल. ते या प्रकारे काय करतात, माहीत आहे, लांबून, एखादी अंध व्यक्ती पुलावरून उतरताना दिसली, तर या स्टेशनवरील, कोलाहलात, जर व्यक्तीला announcement ऐकू आली नसेल तर, ट्रेनच्या बदलणाऱ्या प्लॅटफॉर्म ची माहिती, हे त्या मोठ्या ठकाठक आवाजातून सांगतात. हो, ही ऐकीव बातमी नाही. माझ्या, अंध विद्यार्थी मुलांनी सांगितलेय. जर एकच ठोका आला,तर बरोबर नेहमीच्या, फलाटावरच गाडी येणार, नाहीतर दोन थांबून चार म्हणजे बदलला प्लॅटफॉर्म नंबर. आहे की नाही, महान कार्य! गंमत म्हणजे सेंट्रल व वेस्टर्न दोन्ही लाईन च्या सर्वच फलाटा वरील पुलाजवळील, बूट पॉलिसवाले सतत हे कार्य करीत असतात, त्यांनी,कसे संघटित होऊन, ह्या खुणा ठरवल्यात, तेच जाणे. कोणी त्यांना ही प्रेरणा दिली असेल बरे. निश्चितच, आत्मबल होय. म्हणून एवढेच म्हणावेसे वाटते, तेथे कर माझे जुळती 🙏. इंग्रजीत Hats off.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.
Comments
Post a Comment