कर्तव्य निष्ठा, एका डॉक्टरांची.

  माझ्या लेखाचे स्वागत करण्याऱ्या वाचक हो,

काल माझ्या आत्याच्या यजमानांच्या, मनाच्या मोठेपणाची कथा वाचलीत. हे तर माझे जवळचे आप्त होते. पण आता माझा आणखी एका डॉक्टर. प्रबोध कर्णिक यांच्या महतीची गोष्ट ऐका, I mean वाचा

 हो, आडनाव सारखे असले तरी, त्यांचे व माझे काही नाते नाही. पण डॉक्टर, म्हणून पेशाशी, हे किती, मनःपूर्वक जोडले होते, ते बघा.ते ENT स्पेशालिस्ट आहेत. दादरले हॉस्पिटल आहे.

     झाले असे, की माझ्या मुलाचे, कानाचे ऑपरेशन, त्यांनी केले, - मे.1999मध्ये. तो शुक्रवार होता. नंतरच्या चेक- अप साठी पुढच्या गुरुवारी बोलावले होते. अचानक, रविवारी संध्याकाळी 6 वाजता, त्याचा तो कान व गालाची बाजू दुखायला लागली. रजेचा दिवस म्हणून, मी त्यांच्या घरी फोन केला. 

            कोणीतरी, महिलेने उचलला, मी डॉ. शी बोलायचेय, म्हटल्यावर, त्यांनी, अं अं केले., तेवढ्यात, बाजूने आवाज आला," दे, फोन दे इकडे ", 

   " मी डॉ. प्रबोध बोलतोय, " मी ओळख दिली व मुलाला काय त्रास होतोय, सांगितले.

         डॉ.  बोलले, "कळले मला,तुमचे मेडिकल स्टोर जवळ आहे नं? ते फोन करून देतील नं? तर आता तेथे जा व तिथून मला फोन करा, मी त्यांच्याशी बोलतो. मी बरे, म्हणून तसे केले. नवल म्हणजे, ते इतक्या समजसपणे व आत्मीयतेने बोलले. जय अंबे, I Mean, आमचा मेडिकल वाला ही नवल करीत होता, डॉ. नी औषध कसे घ्यावयाचे व ड्रॉप्स कसे घालायचे, हे,त्याला व मला समजून सांगितले. इतकेच नव्हे, तर औषधाचे स्पेल्लिंग ही सांगितले. किती काळजी पहा. पण खरी घटना तर नंतरच घडली. सोमवारी, सकाळी, मी वर्तमानपत्र उघडले. आणि मला शॉकच बसला.

        पहिल्या पानावर, बातमी--  नामांकित ENT डॉ. पंढरीनाथ कर्णिक हयांचे अकस्मात  दुःखद निधन. हे डॉ. प्रबोधचे वडील. त्यांचे डॉ. प्रबोध एकुलते एक पुत्र. दोघे ही प्रॅक्टिस करत होते. पुढे असे लिहिले होते. काल चार वाजता, त्यांच्यावर संस्कार झाले.

Oh my god, म्हणजे अग्नीसंस्कार आटपून नुकतेच आलेल्या पुत्राने, आपला शोक बाजूला ठेऊन, आपले डॉक्टर, या पेशाचे कर्तव्य केले.

    आणि माझे मन व डोळे भरून आले. बघा, तुम्ही ही डोळे पुसताय नं, वाचताना.  सर्व डॉक्टर, ह्यांच्या सारखी या पेशाशी, अशीच निष्ठा ठेवतील नं!

                उद्या, अशाच एका मुलीची,डॉक्टर होण्याची कथा सांगीन.

         ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू