नवीन जन सुरक्षा कायदा, योग्यच आणि आपल्या सुरक्षते साठीच आहे.
नवीन कायदा, ज्याला विरोध करणे, लोकशाहीची गळचेपी म्हणणे, अयोग्यच
प्रिय वाचक हो, मी माझ्या तत्वाला धरूनच आहे. राजकारण हा माझा विषय नव्हेच. पण समाजकारण ही माझी, " मर्म बंधातली ठेव ", निश्चितच आहे. ज्यायोगे सामाजिकरित्या, एकतेला धक्का बसू शकत असेल, तिथे मी नक्कीच बोलणार.
जनसुरक्षा कायदा योग्यच आहे.
असे आहे की, अभिव्यक्त होण्याचा अधिकार सर्व नागरिकांना असला, तरी त्यासाठी, प्रत्येकाने तारतम्य बाळगणे, आवश्यक आहे. Social media वर जो तो, इतरांना नावे ठेवताना, स्वतः ला सुप्रीम कोर्टाचा जज्ज समजून लिहीत असतो, बघा, चिल्लर मुले ही फेसबुकवर काही ही खरडतात. जणू ते सर्व गुण संपन्न आहेत. सरकारला नावे ठेवण्यात नंबर वन. जेव्हा ही मंडळी, रस्त्यावरील खड्ड्यावर सरकारला नावे, ठेवतात, तेव्हा या अज्ञानी जणांची कीव करावीसी वाटते. मुंबई शहरातील रस्ते महानगर पालिकेच्या, अख्यतारीत येतात. त्यांचे दुरुस्तीकरण, म्युनिसिपालिटी, contract देऊन करत असते, आणि आज कित्येक वर्षे ह्यावर कोणाची सत्ता आहे, बरे??
या कायद्याने, मोर्चा, बंद- हरताळ..- उपोषणे करून जनतेला, नको त्या प्रकारे, फूस लावणे, अफ़वा पसरवणे, स्वतः ला नीट न समजलेले विषय, हिरीरीने मांडणे, यावर निश्चित अटकाव होणार आहे. तसेच हे टीव्हीतील बातमीदार कोठचीही, बातमी ओरडून ओरडून सांगतात. त्यामागे बऱ्याच वेळेस अर्धसत्यच असते. कित्येकदा, ऐनवेळी, ते स्वतः ची मते बनवून, ठाम पणे बोलतात. आणि ऐकणारी जनता, त्यावरून आपली मते बनवून, बहुतेक सरकारला दोषी ठरवतात.
समाज माध्यमे, सामान्य माणसाला सहज हातात आली आहेत. मग कोणीही उठायचे आणि मन मानेल ते खरडायचे. हे फार धोकादायक आहे. मोर्चा त एकत्र येऊन, समोरील साध्या जनतेला रुबाब दाखवून, धमकावायचे. तसेच एक गंमत सांगते, हे उपोषण करतात नं, मग सलाईन लावून घेतात, अहो, सर्वांना ही गोष्ट माहीत आहे की, कित्येक आजारपणात, जेव्हा अन्न पचणार नसते, तेव्हा, डॉक्टर, पेंशटला सलाईन लावतात. त्यातून, बेस मस्त भरण पोषण होत असते.
एक महात्मा ( माफ करा) उपोषण करीत, तेव्हा व एरवी ही खजूर व बकरी चे दूध पीत. करून बघा. या शेळीच्या दुधात, इतकी शक्ती आहे की, माणसाची ताकद मस्त राहते. आठवतोय, एक गोविंदाचा, एक सिनेमा आला होता. त्यात तो जन्मत:, दुबळा होता, त्याला शेळीच्या सह वासात व तिच्या दुधावर वाढवले, व तो सशक्त झाला हे सत्य आहे. सांगण्याचा हेतू, या कायद्याने , या प्रकारे सामाजिक जीवन बिघडेल, अशा प्रकारावर, दंड व सजा करण्याची सोय आहे, हे योग्यच आहे नं,, आपल्या सामान्यांच्या सुरळीत जीवनासाठी, बरोबर नं सोचो सोचो, तुम्ही,एवढेच करा,निदान या कायद्याच्या विरोधात प्रचार करू नका.
Comments
Post a Comment