अनाथ होणे, योग्य की.....
अनाथ होणे, योग्य की.......
वाचक मंडळीनो, संभ्रमात पडलात ना? माझे विचित्र शीर्षक वाचून, तर ऐकाच ही अघटित, घटना. हो ही एक सत्य कथा आहे.
मी मानसशास्त्र ह्या विषयावर, पदवी मिळवली. त्या मुळे आम्हाला, प्रक्टिकल म्हणून अनाथाश्रम, रिमांड होम ( सुधार गृह) मेंटल हॉस्पिटल वगैरेला भेटी द्याव्या लागत. अशा प्रकारे, आम्ही, सायनच्या, B. J. home, अनाथाश्रमला जाऊ लागलो. मुलींचे खेळ व त्यांना गाणी व गोष्टी सांगणे. हे करताना, गप्पा होत. असेच एकदा लक्षात आले एक मुलगी, सदैव अभ्यास करताना दिसे. अर्थात आम्ही चौकशी केली व सुप्रिटेंडनी तिचे कौतुक करत सांगितले. काय माहितेय, आम्ही तर चाटच पडलो. असेही घडू शकते. विश्वासच बसेना. तिचा इतिहास-ती कशी इथे आली ते ऐकून, देवाची लीला कशी कोणाला, कोठे पोहोचवते, हे नवलची घडले.
झाले असे की, VT स्टेशनवर,एक भिकारीण भीक मागत असे. कोणी तिच्या स्त्रीत्वाचा, फायदा उठवला कोण जाणे. म्हणतात ना, "देवाची करणी आणि नारळात पाणी" तिच्या बरोबर, तिच्या, दोन मुली असत. एक दोन वर्षाची व दुसरी तीन महिन्याची. पण एक दिवस सकाळी, त्या भिकारिणीचा, प्लॅटफार्मवर मृत्यू झाला. वाईट झाले नं? अं हं. ऐकायला विचित्र वाटेल, पण त्याचमुळे, त्या दोन्ही मुलींचे, भाग्य फळले. कसे ते बघा.
त्यानंतर, पोलीस कारवाई होऊन, त्या दोघींना, या अनाथाश्रमात ठेवले. मॅडमच्या लक्षात आले की, दोघी खूप हुशार आहेत. शाळेत पहिला वा दुसरा नंबर असे. त्या दोघी - त्यावेळी, मोठी सायन्सला शेवटच्या वर्षाला होती व धाकटी, इंटरला होती. नवल म्हणजे मोठीने केमिस्ट्री विषय निवडला होता. व धाकटी, डॉक्टर होण्याची, इच्छा धरून, जोरदार मेहनत करीत होती
हा त्यावेळी, अकरावीत S SC होत असे. कॉलेजचे दुसरे वर्ष म्हणजे इंटर..
आता सांगा, जर त्यांची, माय जगली असती तर त्या दोघी रेल्वे फलाटावर, आई बरोबर भीक मागतच जगल्या असत्या व परवाच्या माझ्या लेखातील soloman grandy प्रमाणेच जन्माला आल्या, म्हणून जगल्या व अशाच मेल्या. असे झाले असते.
हो, महत्वाची गोष्ट म्हणजे, तेथे दान करावयास येणाऱ्यापैकी, एका जैन श्रीमंत गृहस्थाने, दोघीची foster care ची जबाबदारी स्वीकारली होती. म्हणजे त्या तिथेच राहतील, इतर मुलींच्या बरोबरच जेवतील, राहणी, तीच राहील. पण त्यांचा, शिक्षणाचा संपूर्ण खर्च, ते करतील. नंतर कळले, तिला, मेडिकला admissin मिळाली. डॉक्टर बनली. बघा देवाची लीला.
अशीच कित्येक, काही कारणाने, drop out झालेली मुले परत शिकू शकली, तर आयुष्यात खूप काही करून दाखवतील. त्यासाठी, जरा आजूबाजूला, नजर टाका व मागच्या लेखात, दाखवून दिलेल्या मोर्च्यात सामील होऊन, स्वतः ला, कार्यकर्ते समजण्याऱ्याना, track वर आणा हो. एकटे नं करता एक मिशन करा. इतरांना सामील करवून घ्या. मग बघा तुमचे जीवन ही संमृद्ध होईल.
ॐ ॐ ॐॐ ॐ ॐ ॐ ॐ
Comments
Post a Comment