डॉक्टर या पेशाची खरी ओढ.
डॉक्टर पेशाची खरी ओढ.
प्रिय सजग वाचक वृंद हो,
मी हा जो मायना, तुम्हाला उद्देशून लिहिला, त्याचा अर्थ माहितेय का? वृंद म्हणजे त्या त्या विशिष्ट क्षेत्रातील जाणकार व चौकस जन. मला माझाच अभिमान वाटतो की, मला असे वाचक मिळाले. फक्त त्यातून, काहीतरी activeness घडावा, ही आस. डॉक्टर या पेशा विषयी, आज, तीन दिवस, मी लिहीत आहे
आता अशाच, एका डॉक्टर होऊ घातलेल्या, मुलीची कथा. अर्थात, आता ती ही, प्रसिद्ध व यशस्वी डॉक्टर आहे. मी पूर्वी ( दोन वर्षा आधी ही गोष्ट ह्याच blog मध्ये लिहिली होती). पण माझ्या मनावर ही घटना जबरदस्त, आघात करून राहिली आहे. हिच्या संयमी धोरणामुळे, ती, मेडिकलमध्ये, यशस्वीपणे प्रवेश घेऊ शकली व डॉक्टर झाली. पण अशा कित्येक, भावी डॉक्टर- इंजिनियरची गळचेपी होऊन, ते निराशेच्या गर्तेत जातात.
झाले, असे की, हिला बारावीला 95% मार्क मिळाले, तेव्हा प्रवेश परीक्षा नसे. पण 95.5% ला प्रवेश बंद झाले. आणि हिचा अर्ज नाकारला गेला. तिचे वडील ही मशहूर डॉक्टर होते. पण त्याच वेळी, आरक्षणाच्या, अघोरी नियमानुसार एका मुलाला, 65% मार्क असून ही प्रवेश मिळाला. ठीक आहे, त्या पालकांचा, आनंद मान्य. पण त्यांनी, नेमके ह्या डॉक्टर पित्या समोर जाऊन, त्यांना खिजविले, " हे काय, तुम्ही दाक्टर नं, मग तुमच्या पोरीला, नाय मिलली, आमच्या पोराला घावली बघ शीट. " पेढा खाणार का?
या मानसिकतेला काय म्हणायचे. असो..
डॉक्टर शांतपणे घरी आले. जरी ऍडमिशन मिळाली, नाहीतरी, या हिंमतबहादूर, मुलीचे संयमित वर्तन बघा. तिने घरी पुस्तके आणून, वडिलांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास सुरू केला. पूर्वी कॉलेज, जूनला सुरू होत. माझ्या वडिलांनी, (त्यांना, डॉक्टर, काका म्हणत व ती मुलगी आजोबा म्हणे. ) वडीलकीच्या, नात्याने विचारले, अहो, अशाने, तिचे वर्ष फुकट जाणार नाही का? दोघांनी उत्तर दिले, लवकरच बघा. हे बिल्डिंग मधील सर्वांनी ऐकले, नवल वाटले.
पण नंतर 17 ऑगस्ट ला ती,आमच्या घरी आली. कॉलेजेस सुरू झाल्यावर अडीच महिन्यानी व म्हणाली, " आजोबा, मला admission मिळाली. आता एकच नव्हे, तर नऊ सीट्स रिकाम्या झाल्यात. आरक्षण म्हणून प्रवेश मिळालेल्याना, अभ्यास न झेपल्याने, drop out झालेल्या मुलांनी.....
यावर No comments. वाचक हो, तुम्हीच यावर विचार करा. नऊपैकी एक seat सत्कारणी लागली, पण इतर आठ फुकट गेल्या नं? हं.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
Comments
Post a Comment