लोकमान्य टिळक पुण्य स्मरण
माझ्या प्रिय वाचक हो, आजच्या दिवसाचे महत्व सर्व भारतीय जाणतातच. पण आपण लोकमान्य टिळकांना, ओळखत असलो तरी, किती जणांनी, त्यांना, जाणले आहे बरे? हां, सर्व जण शालेय जीवनात, त्यांचे स्मरण करीत होतो. पण आजही शालेय जीवन संपल्यानंतर, बहुतेक जण गोंधळात असतात. हा दिवस, त्यांची जयंती की पुण्यतिथी?
हो तुम्ही म्हणाल, आम्हाला त्यांची घोषणा आठवतेय, " स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, मी शेंगा खाल्या नाहीत, वगैरे वगैरे. फार तर त्यांनी, "गीतारहस्य" हा ग्रंथ लिहिलाय.
पण मी आज, तुम्हाला त्यांची व त्यांच्या कार्याची महती सांगणार आहे. त्यांनी, "केसरी" हे वर्तमानपत्र चालवले, त्यातीलच काही महत्वाचे लेख मी येथे देणार आहे. ते खालील पुस्तकातून घेत आहे.
केसरी 16 जानेवारी 1883. पान 7 .
धर्मस्य तत्वम निहीतं गुहायाम ||
धर्मासारखा वादग्रस्त आणि नाजूक जगात दुसरा कोणताही विषय नसेल. जे धर्मनिष्ठ आहेत, त्यांना, त्यांचा धर्म जीवित्वापेक्षाही अधिक प्रिय असतो. अनेक महात्मानीं आपल्या धर्माच्या रक्षणासाठी किंवा त्याचा प्रचार होण्यासाठी, आपल्या अस्तित्वाची आहुती दिल्याची, उदाहरणे इतिहासात थोडी आहेत, असे नाही.
निबंधारंभी घातलेले वाक्य कोणी कधी रचिलेले असो, त्या शब्दात जितका बोध आहे, तितका दोनचार हजार पानांच्या ग्रंथात नसेल. धर्म तत्व कोणासही उमगले नाही. ज्याने त्याने या संबधात, आपापल्या धोरणाने चालावे, यापेक्षा आणखी स्तुत्य उपदेश तो कोणता असणार?
[ ] ( यात, " धोरण ", या शब्दात, त्यांना सांगायचा अर्थ हा की, आपला धर्म जाणून त्या प्रमाणे जीवित कार्य करावे. बघा, पुत्र धर्म-पालक धर्म, गुरूधर्म- शिष्यधर्म, राजकर्ताधर्म- प्रजाधर्म वगैरे सर्व संबधित धर्म होय. आपल्या योग्य राजकीय नेत्यांना, योग्य मान देणे, त्या तील कायद्याने वर्तन करणे हीच शिकवण, लोकमान्य टिळक देत आहेत). आज1ऑगस्टला त्यांचे पुण्य स्मरण करून त्यांनी दिलेल्या, उपदेशाचे पालन करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली होय.
[ ] ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

Comments
Post a Comment