आपली चूक कबूल करण्याची हिंमत

                                         आपली चूक कबूल करण्याची हिंमत.

        माझ्या प्रिय वाचक हो, अचानक मी, लेखनाचा, रोख बदलला, असे वाटले नं, नाही हं, बघा कालच्या लेखातील, त्या परिवाराचा किती मनाचा मोठेपणा आहे नं, विशेषतः त्या मुलाने आपली चूक स्वीकारली, स्वतःला सुधारले व त्याचे जीवन मार्गी लागले. 

    आपली चूक कबूल करून, सुधारणे. या साठी मोठठी हिंमत लागते.

       झाले असे की. माझ्या मुलाला technical विषयात आवड असल्याने, त्याच्या मनाप्रमाणे दादरच्या डी सीलव्हा tech शाळेत, आठवी पासून घातले. नवीन शाळा, तीही दूर, जरा tention आले. 

 पण झाले असे की त्यांना इंग्रजी ला एक, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वर  धडा होता. अर्थात, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा, उल्लेख होता. "शेतकऱ्याचा आसूड".

        एक दिवस, मी घरी आल्यावर बघितले, त्याने, त्या पुस्तकातील," आसूड " या शब्दातील, " ड " खोडला होता. माझ्या मुलांना, अशी पुस्तकात काही करण्याची सवय नव्हती. मी विचारल्यावर म्हणाला, " टीचर नी सांगितले, म्हणून. ती printing mistake आहे, आसू असे पाहिजे. मी यातील चूक ओळखली. ते शेतकऱ्याचे आसूड पुस्तक, माझ्या कडे होते. त्यातील मजकूर मला पाठ होता. मी ते पुस्तक घेऊन, शाळेत निघाले. अचानक मनात आले, नवीन शाळा व एकटा दूर जातो.  तेथे असे सांगणे व चूक दाखवणे, आवडले नाही व त्यामुळे ह्याला त्रास झाला तर..... 

      पण गप्प बसणे, माझा स्वभाव नाही. मी गेले व क्लास टीचरना (इंग्रजीच्या) भेटलेच. व त्यांना ते पुस्तक दाखवून. तो शब्द - आसूडच आहे. सांगितले. ते छोटेसे अठरा पानी पुस्तक, त्यांनी चाळले. "ओ गॉड" म्हणत, मला म्हणाल्या, please, come with me to Principal's room ".

    मी त्यांच्या मागोमाग निघाले. पण त्यांचा इरादा कळेना. आम्ही सरांना भेटलो. त्यांनी सरांना सर्व सांगितले.  मला व सरांना बोलल्या, मी तीन वर्षे, मुलांना हेच सांगत आले. Now I want to rectify my mistake. आणि नवल तर पुढे आहे. त्यांनी, माईक घेऊन सर्व 8th, 9th & 10th च्या मुलांपुढे, आपली चूक कबूल करून, माझ्या मुलाचे नाव घेऊन, माझा ही उल्लेख केला. व आपली चूक सर्वांना सांगितली. हां, एखादीने, मला thanks म्हणून, विषय संपवला असता. पण या सच्चा शिक्षिकेने, केवढी मोठी हिंमत दाखवली. Hats off to her.  बघा किती जण including me. अशी जिगर दाखवू शकू???  इथे कर माझे जुळती. 🙏.

           ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू