आता आलीय तीन दिवस, एकत्रित सुट्टी.
माझ्या जागृत वाचक वर्ग हो, तुम्ही कॉलेज ची मुले असाल तर तर स्वतः जागे व्हा. आणि पालक कंपनी, मुले कोठे मज्जा करायला जाणार आहेत, तिकडे लक्ष द्या. परवा 15 ऑगस्ट, आपला स्वातंत्र दिन आणि पाठोपाठ कृष्णअष्टमी व दहीकाला सगळेच मज्जा करण्यासाठी निघणार. लक्षात ठेवा. निसर्गाचे ही काही नियम असतात. त्याच प्रकारे समुद्र नदीचेही ठरावीक नियम असतात. तीन दिवस सुट्टी म्हणून सर्व पिकनिकला निघणार. बहुदा ओढ पाण्याचीच. थ्रील म्हणून समुद्रात घुसणार. पण हे लक्षात घ्या. शुक्रवारी अष्टमी आहे. भरती ओहोटीचे नियम असतात. दर पौर्णिमेला दुपारी व रात्री बरोबर 12 वाजता भरती असते. नंतर प्रत्येक तिथीला 40 मिनिटाने भरतीची वेळ पुढे सरकते. या क्रमाने अष्टमीला संध्याकाळी सहा वाजता भरती असते. त्या नंतर ओहोटी पर्यंत पाणी आपल्याला आत खेचते. आणि लोक हीच चूक करतात व पाणी कमी होतेय. आता जाऊ या आत, म्हणतात. मग दुर्घटना होतात..
Enjoy करताना विचार व सत्य न बघता, लोक धाव घेतात. ते कोळी सांगतातही वेळ बरोबर नाही,पण कोण लक्षात घेतो? तर पहा, यावरील सावध करणारी, माझी short film.
मग काहीच्या बाही घडते,मग नंतर, मागे पालकांना काय भोगायला लागते, बघितले ना? तर सावध मनुजा सावध रे, होईल अपुली पारध रे.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.
Comments
Post a Comment