स्वातंत्र दिवस, दोन दिवसावर आला हो.

 माझ्या प्रिय देशभक्त वाचक मंडळी हो, आपला स्वतंत्रदिन, दोन दिवसावर आला, सर्व त्या साठी तय्यारीला लागलात ना? काय तयारी करताय हो, कपाट उकरून, सफेद साडी, सफेद झब्बा सलवार, मुलांचे सफेद शर्ट वा टी शर्ट शोधताय ना?                            मला लहानपणापासून प्रश्न पडतो. हा तर राष्ट्रीय सण आहे नं, मग आनंदाने साजरा करायचा, तर जिथे तिथे हे पांढरे वस्त्र परिधान केलेली मंडळी का फिरत आहेत. आपल्या हिंदू धर्मात सफेद वसने वीरक्तीचे लक्षण मानले आहे. माझी आजी- आम्ही अख्खी दुनिया तिला काकी म्हणत असे. तिला विसाव्या वर्षीच वैधव्य नशिबी आले. पदरी अडीच वर्षाची मुलगी व दहा महिन्याचा मुलगा. त्याकाळी, एकत्र कुटुंबात, तिला पांढरी साडी दिली. तोच मग तिचा पेहेराव बनला. दुःखी आयुष्याचे प्रतीक. मला लहानपणी काही प्रश्न पडला की तिलाच विचारायची सवय होती. पण त्या वयात ही, ही समज होती की, ही शंका, तिला विचारून, दुखवू नये.. त्यामुळे ही शंका अनुत्तरीत राहिली. त्या काळच्या सरकारने ठरवले व सर्वत्र झेंडा वंदनाला शाळा वगैरेतून सर्वांनी पांढरे वस्त्र घालणे, आवश्यक ठरले. Rather complussary झाले. खरे तर 14ऑगस्टला जेव्हा आपल्या देशातून फाळणी होऊन, पाकिस्तानचा भूभाग वेगळा झाला, तो दिवस दुःखद मानून, दुखवटा मानला पाहिजे होता व नंतर 15 ऑगस्टला आपला राष्ट्रीय सण मानून, छान छान कपडे घालून, शोभा यात्रा काढण्यास हवी. पण दुदैवाने, तेव्हा सत्तेत आलेल्या पक्षाने, विशिष्ट समाजाचे लाड करण्यासाठी, आपला देश, निधर्मी असल्याचे जाहीर केले. हां, सर्वधर्मसमान संकल्पना मान्य आहे. पण हे निधर्मी काय होते. खरे तर, " धारयते इति धर्म म्हणजे, जे नियम धारण करावयाचे तो धर्म. उदाहरणार्थ मातृधर्म, पितृधर्म. पुत्र व पुत्री धर्म, गुरूधर्म व विध्यार्थीधर्म आणि नेता धर्म व प्रजाधर्म. जर हे,असे सर्व जण निधर्मी झाले तर, दुनियेचा सत्यानाश होईल. हेच खरे सत्य होय.

         स्वातंत्रवीर सावरकर यांनी लिहिल्या, " हिंदुत्व " या पुस्तकातील महत्वाचा ( माफ करा, त्यांच्या लेखणातील, प्रत्येक अक्षर न अक्षर महत्वाचे आहे.) 

        भाग खाली देत आहे. तो युगेनयुगे, लक्षात ठेवण्याचा आहे.

          सावरकर लिखित, "हिंदुत्व ".

        हिंदुस्थानच्या अर्वाचिन इतिहासात, हिंदूचे सर्वांत मोठे शिरकाण 1946 ते 1948 या काळात झाले आहे. 'हिंदू ' असण्याच्या एकमेव अपराधासाठी, देशाच्या दुदैवी फाळणी समयी आणि नंतर, पूर्व बंगाल, पश्चिम पंजाब, सिंध,सीमा प्रांत येथे लक्षावधी हिंदू जनतेला धर्मवेड्या मुसलमानांनी ठार मारले. हिंदू स्त्रियांवर अत्याचार केले. हिंदुची घरे दारे, शेतीवाडी लुटली आणि उर्वरित लक्षावधी हिंदूना निर्वासित करून, भारतात हाकलून दिले.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

        🙏🙏🙏🙏🙏

     ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐॐ.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू