उद्या कृष्ण जन्मअष्टमी व परवा दहीहंडी

  उद्या कृष्ण जन्म व परवा  दहीहंडी. 

      माझ्या धर्मप्रिय वाचक हो,

      हे तर सर्वांना माहीतच आहे की,कान्हा जन्मला मथुरेत, कंसाच्या कारागृहात. मध्यरात्री. कंसाच्या हातून वाचविण्यासाठी वसुदेव गेले, त्याला घेऊन, गोकुळात.. तो वाढला, यशोदा नंदाच्या घरी. तेथे त्याकाळी उंच इमारती नव्हत्याच नं! होती, ती सर्व कुटी म्हणजे बैठी घरे. कंसाच्या जुलमी आदेशानुसार सर्व दूध व दूधजन्य पदार्थ, मथुरेकडे रवाना होत असे. मुलांना दूध मिळावे. म्हणून लहानग्या कान्हाने शक्कल लढवली. छताला लटकविलेल्या शिंकाळ्यातील, दूध वगैरे खाली आणण्यासाठी, गोपाळ जमवले व फक्त एखादे मूल रांगते होऊन, तो, त्याच्या, पाठीवर चढून वर टांगलेल्या, मडक्यातील, दूध वा दूधजन्य पदार्थ, खाली पाडून सर्वांना खाऊ घालत असे. पण आजकाल इथे मुंबईत, हा सण साजरा करण्यासाठी, पूर्वी  दोन तीन मजली बिल्डिंग वर दोर लावून हंडी बांधतात. आणि  मानवी मनोरे करून, दही हंडी फोडतात. आता तर सहा मजली इमारतीवर ही हंडी बांधली जाते. सध्या सर्वत्र उंच इमारती झाल्यात व गावोगावी, उंच हंडी बांधून, हजारो रुपये लावून, पैशाचे आमिष दिले जाते.  ज्या श्रीकृष्णाने  पुढच्या आयुष्यात, गीता लिहिली. ती वाचण्यात कोणाला रस नाही. पण हा प्रकार करून, मुलांचे जीव धोक्यात घालण्याचा, जो खेळ चालतो, तो थांबवण्याचे, कोणी मनावर घेत नाही. यात कित्येक दुर्घटना होतात. सर्कशीत ही खाली जाळी लावली असते. बिल्डिंगची कामे चालतात, तेथे ही काळजी घेतली जाते. अगदी वर चढणारा मुलगा, लहानच का असतो, हे मला समजत नाही. वर प्रत्यक्ष हंडी फोडणारा ही बाप्या असला, तर काय बिघडेल. गोकुळात, एक मुलाचीच, फळी करत असत नं? तिथे काय कान्हाने गोप(मोठ्या माणसे) मदतीला घेतले होते का? 

           ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू