दहीहंडी - एक विचार करण्याची बाब.

 .दहीहंडी- एक विचार करण्याची बाब.

माझ्या जागृत वाचक हो, खरे सांगा,तुमच्या घरची कोणी मुले

 दहीहंडीच्यामनोऱ्यावर चढतात का, असल्यास तुम्ही बिनधास्त असता,कीtension येते. त्या दिवशी किती मुले वरून पडून जखमी होतात. हे दुसऱ्या दिवशी पेपरात वाचायला मिळते. आता माझी ही short film बघा, माझ्या कडे कामाला येणाऱ्या, महिलेच्या बाबतीत घडलेली. हां, आम्ही, सर्वांनी तिला मदत केली म्हणजे फक्त पैसे पुरवले. पण पुढे आयुष्य भर, तो मुलगा लंगडत राहिला.


कोण जबाबदार? मग मी काल लिहिले, ते बरोबर होते ना? आणि कित्येक वर्षे सत्तेवर राहिलेली मंडळी, त्यांना काही मदत, म्हणजे जाळी वगैरे, पुरवायची सोडून, कृष्णाष्टमीला, मटण व चिकन वाटत आहेत. या साठी, त्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे. आणि फुकटे लाईनी लावून ते घेत आहेत. छी! छी!छी! का तर म्हणे आता सत्तेवर असलेल्याना, विरोधासाठी विरोध. आणि हे म्हणे राजकारणी, हं 😔😔😔

       ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू