आदर्श गणेशोत्सव कसा असतो

 आदर्श गणेशोत्सव कसा असतो.

    माझ्या सर्वपरीने दक्ष असलेल्या वाचक मित्र मैत्रीणीनो, बहुदा अनेक लोक म्हणतील, आज असा आदर्श गणेश कार्यक्रम राबवणारी मंडळे आहेत कोठे? सर्व ठिकाणी डीजे व कर्कश आवाजातील, सिने गीते, बस.

       पण मी अशा एक नाहीतर दोन गणेश मंडळाचा, अनुभव घेतलाय. झाले, असे कि, मी वनवासी कल्याण आश्रमाच्या, आदिवासी मुलींसाठी असलेल्या, शबरी माला, या कनाशी, जिल्हा कळवण येथील आश्रमात, "सेवावर्ती म्हणून जायचे ठरवले. माझे पूर्ण आयुष्य मुंबईत गेलेले. तेथे पोहोचले. माझा समज होता की, आपण मुलींची काळजी घ्यायची व त्यांच्या अभ्यासात मदत करायची, ही जबाबदारी. पण तेथे गेल्यावर कळले. की त्यासाठी लागणारी देणगी सुद्धा जमवायची. रा. से सं. जनकल्याण संघ, जनसंघ वगैरे च्या कार्यकर्त्यांच्या परिवारातून, सर्वत्र, अशा "सेवावर्ती " येतात. यांचाच बच्चा म्हणजे, भाजप. त्या एक एक वर्ष राहतात. बहुदा सर्व संस्था मधून paid सुपरव्हायझर, ठेवण्याची गरज भासतच नाही.असो. आपला मूळ मुद्दा गणेश मंडळ.

        माझा  प्रॉब्लेम असा की, मी मुंबईची, इथे कनाशी (वणीच्या पुढे)ओळख नव्हती. आणि येथील कार्यासाठी, आपल्या मुंबईतील लोकांकडे मागू शकत नव्हते. आधी काही दिवसांसाठी, शिधा होता.

      हं तर काय झाले, आभोण, (वणी व कनाशी च्या वाटेवर) वरून काही मुले, मला भेटायला आली, त्यांचा मुख्य, परेश म्हणाला,आमचे गणेश मंडळ आहे. आम्ही मुलींना, जेवण देऊ इच्छित आहोत. मी म्हटले, "तुमचे बजेट काय आहे, या मुली जरा अभ्यासाला कंटाळा करतात. कारण, असे असावे की, खाली वाकून लिहिताना पाठ दुखत असावी. जर जमले तर, त्यापेक्षा, गणपती च्या दिवशी जेवणापेक्षा, त्यांना, जर छोटी टेबले देता आली, तर बघा. त्या मुलांना ती कल्पना आवडली. म्हणे, तोपर्यंत कशाला थांबायचे, शुभस्य शीघ्रम. चांगल्या कार्याला मुहूर्त कशाला, नवल म्हणजे ही सर्व मुले 18 ते 25 या वयातील. त्यांचे तिथेच, आपापसात ठरले. डीजे, ढोल वगैरे न करता, हीच आयडिया राबवू या. आणि जे गेले ते, नीलकमल कंपनीची, चांगल्या क्वालिटीची 40 टेबले घेऊनच आले. आमच्या मुली (35). म्हणे, अहो kaku, बाथरूममध्ये होतील, जास्तीची. मीच मग मुलींकडून, त्यांच्या मंडळाच्या नावाची लेबले तयार करून, टेबलांना चिटकवली. तर ते सर्व म्हणे की, याची काय जरुरी, काकू, गणेश तर विद्यापतीच नं, त्याला हे आवडेल.

बस मग आम्ही भरून पावलो.

. खरे सांगू, त्या लहान तरुणाईतली महानता बघून, वाटले, येथे कर माझे जुळती 🙏.

    उद्या आणखी एक अनुभव सांगीन. तो तर याहून ही उच्च कोटिचा. वाचक हो आपल्या जवळच्या गणेश मंडळाकडे, हा माझा अनुभव व संदेश forward करा हो, ही विनंती.

          Bॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू