आदर्श असा लोकमान्यांच्या मनात असलेला गणेशोत्सव.

 आदर्श असा लोकमान्यांच्या मनात असलेला गणेशोत्सव. 

         माझ्या उत्सव प्रिय वाचक मंडळीनो, 20 तारखेचा लेख वाचलात नं, तर त्यावर मनन ही करा. आता आणखी, एका आदर्श, गणेश मंडळाची, ओळख करून देणार आहे. गंमत म्हणजे हे मंडळ ही तरुण मुले च चालवतात हं.

         मी तेथेच कनाशीला असतानाची गोष्ट. मी याआधीच लिहिले होते. हे सर्व आश्रम, वि हिं प,, रा.से सं. जन संघ, जनकल्याण समिती व. क. आ., यातील महिला, सेवावर्ती होऊन  चालवतात.  त्यांना, सर्व, तरतूद, आपणच करायची, हे माहीत असते. मला हे नवीन होते. असो. तर आश्रमाच्या कोठीत, साधारण आठवड्यासाठी, शिधा शिल्लक होता. तेव्हा कळवणवरून, सौ. मंजुश्री मालखरे आल्या, मला, काही अडचण आहे का, विचारायला. मी खरे सांगितले. माझा नवखेपणा, त्यांच्या लक्षात आला. त्या बोलल्या, " काकू मी बघते व सांगते".

         त्यांनी घरी जाऊन, आपल्या मुलाला, योगेशला सांगितले, तो कळवण गणेश मंडळाचा सदस्य होता. त्याने लगेच मिटिंग घेतली व ठराव मांडला. आणि त्या सर्वांनी, एकमुखाने निर्णय घेतला. वर्गणी मागताना, सर्वांकडे, पैसे न मागता  चार पाच किलो धान्य मागितले. नंतर त्या गावकऱ्यानी एकत्रित येऊन म्हणे, सरळ गोदामातून धान्याची पोती घेतली. त्यामुळे सर्व प्रकारचे धान्य नीट एकत्र करता आले. व मला फोन आला, " आम्ही शिधा आणतोय. आम्ही मंडळाची सोळा जण येत आहोत. मी जरा चहा पाण्याची सोय केली.  ठरल्या प्रमाणे 4 वाजता, आश्रमाच्या मोठ्या गेटशी हॉर्न वाजला.  योगेश आत आला व म्हणाला, जरा मोठे गेट उघडा. ते नेहमी बंद असे. मला नवल वाटले. चावी आणून उघडले. तर पुढेच खरे नवल  घडले. मोठा ट्रक आत आला. मला वाटले होते की जास्तीतजास्त 10.12 किलो धान्य मिळेल व सध्याचे काम भागेल. पण ती गणेश उत्सवाची मुले, संपूर्ण प्लांनिंग करून , सर्व प्रकारचा शिधा घेऊन आली होती. त्यातील एक जण म्हणाला,असे करा काकू, तुमची कोठी उघडून द्या.   आम्ही नीट लावूनच ठेवतो.   मी बघतच बसले. आधीची पोती बाहेर काढून सर्व नीट लावले. मला जी हाताशी मदतनीस दिली होती. ती देखरेख करू लागली. प्रत्येक पोत्यात काय आहे, ते लिहिले होते. मग त्यातील एक जरा मोठा मुलगा, मला विचारू लागला, " काकू, तुम्ही शहरातून आल्यात, म्हणून विचारतो हं, तुम्हाला, इंजेक्शन माहीत आहे नं, मला संदर्भ लागेना. तेव्हा त्या सर्वांना, माझे अज्ञान कळले.  आपण मुंबई त फार तर महिन्याचे सामान भरतो. मग त्यांनी, स्वतः च सामग्री मागवली. हे वर्षाचे सामान असल्याने, कीड वा सडू नये, म्हणून खबरदारी घ्यावी लागते. मग त्या सर्व पोत्याना, माणसाला देतात, तशा प्रकारे, इजेक्शन दिली. व सोनाताईला, (माझी मदतनीस) सांगून लक्षात ठेवण्यास सांगितले. बघा ह्या तरुण मंडळाचे, गौरवशाली कार्य. अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का, आपण शहरी, कित्येकदा, त्या लोकांच्या, अज्ञानाला सहज हसतो, गावठी म्हणून सबोधतो. पण ह्या मुलांनी, मला माहित नसलेली गोष्ट खुबीने मला समजवली.  शिवाय डीजे वगैरे नं करता, श्री. गणपती बाप्पाला व सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्रणेता, लोकमान्य टिळक यांना प्रसन्न केले. तर संपूर्ण महाराष्ट्र हयांचा कित्ता गिरवील तर, आपला, विकास करणे, सरकारला ही सहजसुलभ होईल हो. 

           ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू