स्वतंत्र व स्वातंत्र कसे आपलेसे करावे.

 स्वतंत्र व स्वातंत्र                                    माझ्या स्वतंत्र विचार करू शकणाऱ्या वाचक हो,             मी 2 तारखेच्या blog मध्ये या विषयावर लिहिले होते व त्याच सोबत माझा पूर्वीची, एक short film दाखवली होती. ती तुम्ही पाहिली असेलच, असे गृहीत धरून, मी, त्याच  वर भाष्य करणार आहे. माझा जातधर्म, या विषयी लिहिण्याचा हेतू नाही, पण आपल्या हिंदू धर्मातील, एका चांगल्या संस्कार विषयी लिहावयाचे, rather सर्वांना सांगावयाचे आहे.                           आज काल तरुणाईतलीच नव्हे सर्व वयातील व्यक्तींना, एक भूषण वाटते की आम्ही, आपल्या विशिष्ट तिथीला मासांहार करतो. असो. तसेच आपल्या कित्येक संस्कारात काही जणांना अर्थ नाही, असे वाटते.            त्यापैकी एक मुंज, उपनयन.  त्या विषयी, मी माहिती देणार आहे.       

           ब्राह्मण व आम्हा कायस्थात  10.12 व्या वर्षी हा विधी केला जातो. त्यात त्यांना, विध्यार्थी जीवनात कसे वर्तन करावे व कसे न करावे, थोडक्यात Dos and Dont's सांगितल्या जातात. त्या नंतर लग्नाला उभे राहण्याचा अगोदर सोडमुंज करणे,आवश्यक असते.     जेव्हा मुंज करतात, तेव्हा, गुरुजी, मुलाला सांगतात, आता तुझी अध्ययनला सुरुवात होत आहे. जोपर्यंत, अध्यापक, तुला, पूर्णतः शिक्षित झाला आहेस, चरितार्थ करण्यास योग्यता प्राप्त केली आहेस, असे सांगत नाहीत, तोपर्यंत तु, तुझे संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित कर. आणि फक्त, " आईचाच " बनून रहा. म्हणजे सर्व ठिकाणी, तुला आईच भासली पाहिजे, म्हणजे, सर्व महिला, तुला आईसमान वाटल्या पाहिजेत. योग्य सल्ला आहे नं? मग हा संस्कार outdated कसा ठरवावा, सांगा बरे? तसेच नंतर लग्नाला उभा राहतो, तेव्हा ही सोडमुंज करण्यासाठी,  गुरुजी येतातच. त्या प्रसंगी, ते प्रश्न करतात, " तु चरितार्थ करण्यास पात्रता धारण केलीस का? पत्नीच्या सर्व गरजा पूर्ण करण्यास, तु समर्थ झाला आहेस नं, तरच तु लग्नाला योग्य आहेस. ह्यात, " धर्मे च कामे च वगैरे विचारणा होते व सोडमुंज केली जाते व लग्न होऊ शकते. मग ही मुंज व सोडमुंज प्रथा योग्यच आहे नं? खरे तर संपूर्ण समाजात ही पद्धत,  आपलीशी करणे, गरजेचे आहे. आज कायद्याने बाल विवाहाला बंदी आहे. पण आजकालची ही मुले मुले कॉलेज मध्ये, प्रवेश करताच, अभ्यासापेक्षा girl freind व boy freind करण्यासाठी धडपडतात, जणू त्यासाठीच पालकांनी, त्यांना कॉलेजमध्ये घातलेय. आणि कित्येकदा पदवी शिक्षण पुरे होण्याआधीच, पळून जाऊन लग्न करतात. मग आयुष्य बरबाद, हं.  ते बंद करण्यासाठी, कॉलेज मधून ही प्राध्यापक व पालक यांचे get together व्हायला पाहिजेत. कॉलेजच्या वेळे व्यतिरिक्त, मुले मुली बाहेर फिरतात, तेव्हा समाजाची ही जबाबदारी आहे. त्यांना, खुशाल हटकावे. वयस्क, व्यक्ती, फावल्या वेळात, हे समाज कार्य करू शकतील. बागेत, पार्क मध्ये, समुद्र किनारी ही मुले मुली ही बसून जे "काही" करतात, ते  समजूतीने थांबवणे, गरजेचे आहे. 

      हो, मी असला उद्योग केलाय, आणि त्यातून, चांगलेच निष्पन्न झालेय. बघा,  एकत्रित येऊन,  हे करता येईल. 

                ॐॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू