खऱ्या नागरिकांचे कर्तव्य..
खऱ्या नागरिकांचे कर्तव्य.
माझे लेखन आवडीने वाचणाऱ्या वाचक मित्र मैत्रिणींनो, काल मी तुम्हा सर्वांना, एक सल्ला दिला होता, तुम्ही म्हणाल, सांगणे सोपे आहे हो, प्रत्यक्षात करणे, risky पडू शकेल. पण, एका महान संतांनी म्हटले आहे,
' केल्याने होते आहे रे, केलेची पाहिजे. वाचन प्रिय जणांना नाव सांगणे, न लगे.
असो मी असले उद्योग केलेत, करते आणि पुढे ही करणार. मी वय 75.
हां तर एक दोन उदाहरणे सांगते. एकदा मी काही कामानिमित्त नाशिकला जात होते. सकाळी लवकर पोहोचायला हवे होते. म्हणून मनमाड पसेंजरने जाण्यासाठी व्हिटीला गेले. रात्रीची वेळ होती. बरोबर एक परिचित महिला होत्या. गाडीला वेळ होता व नेमका प्लँटफार्म माहीत नव्हता. म्हणून गर्दीत कॉमन जागी बसलो होतो. अचानक समोर लक्ष गेले. एक मुलगी हातात पिशवी घट्ट धरून बसली होती. चांगल्या घरची दिसत होती. अंगावरचे कपडे, महागाचे पण बरेच मळकट दिसत होते. दिसायला ही चांगली होती. बरोबरच्या बाईंनी, माझे लक्ष, तिच्या सॅन्डलकडे वेधले व बोलल्या, " अग तिच्या पायाकडे बघ, किती costly सॅन्डल आहेत बघ. " आणि माझ्या डोक्यातला किडा वळवळला.
मी लगेच तिच्या जवळ जाऊन, विचारपूस करू लागले. अंदाज बरोबर निघाला. बाईसाहेब घरातून पळून आल्या होत्या. मुंबईला, सिनेमात काम करायचे म्हणून. कर्म माझे. चार दिवस भरकटून पैसे संपले. आता काय करावे, आणि रडू लागली. मनमाडला घर आहे. पण आता भीती वाटत होती.
आमची गाडी लागली होती व सुटण्याची वेळ झाली होती. मी लगेच तिला घेऊनच गाडीत चढले.
. आता बरोबरच्या बाई घाबरल्या, नसते लचांड म्हणे.
एक प्रश्न होता. तिचे तिकीट काढायला वेळ नव्हता. मी बिन धास्त reserve डब्यात तिला घेऊन चढले. मात्र लगेच TC ला सर्व परिस्थिती सांगितली. आमची तिकिटे नाशिकपर्यंतच होती. पण तो चांगला निघाला. त्याने तिचे मनमाडचे व माझे एक्स्टेंशन करून दिले. त्या बाई मात्र नाशिकला उतरणार, म्हणाल्या. माझी हरकत नव्हती. मग तिच्याशी बोलले, घर दाखव हं, सांगितले.
बहुतेक प्रवाशी झोपण्याच्या तयारीला लागले. आमची साईड स्लीपर असल्याने प्रश्न नव्हता. समोरच्या, एका आजींनी, अचानक विचारले, हिला घरात घेतले नाही, तर काय करशील बयो. आणि मी जरा टेन्शन मध्ये.
विचार केला, पाऊल टाकलेय, जो होगा तो देखा जायेगा. मी कधीही मनमाडला गेले नव्हते. मनमाडला दोघी उतरलो. अचानक त्या TC ने, आम्हाला, त्या बाजूची रिक्षा करून दिली. जरा धीर आला. तिकडे पोहोचलो. आता मात्र ती घाबरून माझा हात घट्ट धरून राहिली. समोर मोठा वाडा. त्यातील लोकांची सनातनी विचारसरणीची साक्ष देत होता. मी ही जरा हादरलेच. सकाळचे 7.30 वाजले होते. दिंडी दरवाजाची कडी वाजवली. ही माझ्या मागे लपली. दार एका आजींनी उघडले. मला बघून, जरा गोंधळल्या. मी तिला पुढे केले. आणि काय भीत होते, तसें काही झाले नाही, उलट त्यांनी, तिला जवळ घेतली, " कुठे उलथली होतीस ग पोरी, शब्द असे पण मायाभरले. मग घरातील सर्व आईवडील काका आले. मला बसवून आभाराचे बोलू लागले, मी सर्व हकीकत सांगितली. चहा नाश्ता झाला. व त्या काकांनी जीप काढून मला नाशिकला पोहोचवले. माझे नाव पत्ता घेतला. गंमत म्हणजे दोन वर्षांनी माझ्याकडे एक आमंत्रण पत्रिका आली. तिचे लग्न झाले. बघा, जर मी हिंमत केली नसती तर ती कोणा, गुंडाच्या ताब्यात सापडली असती.. हो अर्थात मी लग्नाला गेले नाही. पण पुढच्या आठवड्यात पार्सल आले. साडी चोळी. हे माझे करणे योग्य होते नं, मला काय त्रास पडला हो. म्हणून सांगते. असे उचित कार्य करा व पुण्य कमवा. 😊. ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.
.
5ऑगस्ट 2025.खऱ्या नागरिकांचे कर्तव्य.

Comments
Post a Comment