आपण सर्व ही, आदर्श नागरिकत्व सहजी निभवू शकतो.

                                 आपण सर्व ही, आदर्श नागरिकत्व सहजी निभवू शकतो.

      माझ्या सात्विक वाचक वृंद हो,  मला माहीत आहे, सर्वांना सत्कार्य करण्याची इच्छा असतेच. पण बरेचदा पुढे होण्याची हिंमत नसते. करू का नको, ह्याच विचारात, ती संधी निसटते. मग येतो मनात, after thought, अर्रर्र तेव्हा मागे पुढे करायला नको होते. असो. काल सांगितलेल्या घटनेत, नंतर जेव्हा त्या बाईंना सर्व समजले, तेव्हा त्यांना ही चुकी जाणवली. म्हणे, मीही पुढे तुमच्या बरोबर यावयास हवे होते वगैरे वगैरे.

           नंतर जेव्हा मी वनवासी कल्याण आश्रमाच्या, कनाशी ( वणीच्या पुढे) आदिवासी मुलींच्या आश्रमात"सेवावर्ती" म्हणून एक वर्ष होते. तेव्हा कधी कधी मी घरी मुंबईला येत असे. नाशिक वरून, संध्याकाळी, पाच वाजता कनाशीसाठी बस असे. एकदा माझी ती बसं चुकली. मी एका रिक्षावाल्याला विचारले. तो म्हणाला, " येईन पण हजार भाडे घेईन. मी कबूल झाले. नाशिक ते कनाशी काही ठिकाणी सामसूम भाग असतो. वणीच्या पुढे आम्ही पोहोचलो. काळोख पडू लागला. अचानक रस्त्याच्या बाजूला कडेला काही हालचाल जाणवली. रस्त्यावर फक्त आमचीच रिक्षाच होती. मी रिक्षा वाल्याला, थांबणास सांगितले. तिथे एक मुलगा, एका मुलीला बाजूस घेवून, कळले नं? रिक्षा चालक नकार देऊ लागला,  म्हणे "मला भय... " मी म्हटले, "ठीक आहे. मग मला इथेच सोडा," मी लगेच उतरले. जणू झाशीची राणी संचारली होती. मागून जाऊन, त्याची कॉलर पकडली, " काय चाललेय अं ",

   जरा बिचकले. पण गंमत म्हणजे मला वाटले होते, तो माझ्यावर भडकेल, उलट तो आपली कॉलर सोडवून घेत पळून गेला. ती मुलगी मला बिलगली. तेवढ्यात, तो रिक्षा वाला ही आला. मी त्या मुलीला फक्त म्हटले, तुझ्या घराचा पत्ता सांग. तिने ही, सांगितला व आम्ही रिक्षात बसलो. तिच्या घरी पोहोचलो. मी विचारल्यावर ती म्हणाली," काकू,तो असे करील, वाटले नव्हते, 

         " मी, " म्हणजे तो तुझ्या ओळखीचा... " "

        तर म्हणे, "हो पण माझ्या घरी सांगू नका प्लीज."

        आता बोला. हे friendship चे लोण गावातून ही पसरलेय. ही घटना 9.10 वर्षा पूर्वीची हं.   

    ठीक आहे, मला एवढेच वाटले, की मी ती दुर्घटना टाळू शकले. तिच्याच नव्हे तर त्याच्या ही भविष्याचे नुकसान झाले असते. हा असा वारसा मला, खुद्द माझ्या आई व आजी ( काकी) कडून मिळालाय. ती ही कथा सांगेन. I am proud of them.

          तर मग विचार नको, आचार हवा, दुवा, सर्व संकटात, आपल्याला ही साथ देतात. सोचो. 

             ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू