मला मिळालेला सत्कार्याचा वारसा.
मला मिळालेला सत्कार्याचा वारसा.
माझ्या सदैव साथ देणाऱ्या वाचक मंडळीनो,
माझा काल व परवाचा लेख वाचला असेल, तर संदर्भ नक्कीच लागेल. तसेच मी मागील आठवड्यात जो लेख लिहिला होता, भोचकपणा कराल तरच हातून कार्य घडेल. फक्त आपल्याच कुटूंबातील लोकांचा विचार व त्यासाठीच जगाल, तर तुमचाही सोलोमन ग्रँडीच होईल. मागे जाऊन शोधले तर, ह्याच नावाचे शीर्षक असलेला, लेख मिळेल. त्यासाठी चालू लेख बंद करून scroll केल्यावर सर्व लेख, अनुक्रमाने सापडतील.
तर वारसा हा फक्त संपत्ती व प्रॉपर्टीचा नसतो. ह्या गोष्टी आनी जानी असतात. तर माझ्या आईचा, मला मिळालेला वारसा, वाचा. लाखोची संपत्ती, त्या पुढे, तुच्छ आहे.
माझी आई एका मान्यवर प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. माझी मुले ही त्याच शाळेत शिकत होती. त्यामुळे मी शाळा सुटल्यावर,त्यांना घ्यावयास जात असे. एक दिवस, मी गेले असताना, मिटिंग चालू असल्याने, मी थांबले. तेवढ्यात, आई बाहेर आली, टॉयलेट रूम मध्ये गेली.. अचानक तिने तेथून, एका लहान दहा वर्षाच्या मुलीला व पंधरा वर्षाच्या 10 stn च्या मुलाला हात धरून बाहेर आणले. दोघांच्या. कपड्या वरून व मुलीच्या घाबरून रडण्यावरून, काय घडत होते, ते सर्वांच्या लक्षात आले. आईने, जाऊ देत, असा विचार न करता, ती दोघांच्या पालकांना, बोलवण्यावर ठाम राहिली. नंतर जे घडले, ते अटळ होते.
मुख्याधिपिका व ट्रस्टनी, त्या मुलाला एक वर्षासाठी rasticate. केले. पण आईने तेथेच, तो विषय संपवला नाही.फक्त सर्व संबंधिताना, ती घटना उघड न करता गुप्त ठेवण्यास, विनंती केली. व नंतर जवळ जवळ आठ दहा महिने त्या मुलाच्या संपर्कात राहून, त्यांना समजावले, की ह्यात त्या मुलाचेच हित आहे. परत त्याच्या हातून, अशी चूक घडणार नाही. त्यासाठी जसे, आपण अभ्यास करण्यासाठी रागावतो, शिक्षा करतो, ते भल्यासाठीच असते. त्याला अभ्यासात मदत केली
ट्युशन लावली. आणि पालकांना ही तिची कळकळ जाणवली. गंमत म्हणजे, जो मुलगा जेमतेम पास झाला असता, तो पुढील वर्षी S S C ची परीक्षा 79% नी पास झाला. रिझल्ट नंतर, तिघे, आमच्या घरी पेढे घेऊन आले. त्यानंतर ही त्याने चांगल्या पैकी शिक्षण पुरे केले. आई रिटायर्ड झाल्यावर ही, ही मंडळी आईच्या संपर्कात होती. ह्यात, त्या पालकांच्या समंजसपणाला ही दाद द्यावयास हवी. नाहीतर कोणी, त्याच्या, अपराधावर पांघरूण घातले असते. नंतर, " आत्मविश्वास" हा सिनेमा बघताना, आम्हाला, ही आठवण आली. तर सत्कार्य करण्यासाठी, थोडा वाईटपणा घ्यायला हवा. मग नंतर जे चांगले घडते, त्याचे credit ही मिळतेच हीच आपली,खरी प्रॉपर्टी होय.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.
Comments
Post a Comment