लोकमान्य टिळक यांचे विचार व तत्वज्ञान समजू या.

 लोकमान्य टिळक यांचे तत्वज्ञान व त्यांचे विचार समजू या.

 माझ्या सुजाण व कुतूहल असणाऱ्या वाचक हो, प्रथम मी आपली क्षमा मागते, गुगलच्या सर्व्हर प्रॉब्लेममुळे 5.6 दिवस, माझे लेख प्रदर्षित होऊ शकले नाहीत.

       खरे तर फार महत्वाचा विषय, मी आपल्या पुढे मांडणार आहे. ते ही त्यांच्या केसरीतील अग्र लेखा आधारे. 

        लोकमान्य टिळकांचे लेख वाचून, त्यांचे म्हणणे, कोणी समजून घेतलेय का? ना तेव्हा ना आत्ता. आजचा चालू गणेशोत्सव, त्यांच्या मूळ संकल्पनेशी अजिबात टाळबंद राखत नाही उलट या प्रकाराला, आता टाळेबंदी घालावी, अशी परिस्थिती आली आहे. याला अपवाद, या आधीचे माझे दोन लेख आभोण व कळवण चे गणेश मंडळी. मुद्दाम मागे जाऊन परत वाचा.

           आता मी जो विषय मांडणार आहे, तो बघून तुम्ही म्हणाल, या उत्सवाच्या दिवसात, "हे" काय? पण लगेच नंतर, पितृपक्ष येत आहे. त्यावरील लोकमान्यांची मते विचारात घेणे, योग्यच. या गोष्टीला, शास्त्रीय आधार देऊन, त्यांनी, "केसरी" मध्ये अग्रलेख लिहिलाय

           " 8 नोव्हेंबर 1887 या दिवशी"

. तेच खूळ आज पुन्हा बळावत आहे.

   त्यातील परिच्छेद देते.  शेवटच्या ओळी, खूप महत्वाच्या आहेत, हे मुद्दाम लिहित आहे.

  """"मुंबईत प्रेतदहन भट्टीच्या संबंधाने मोठा वाद उत्पन्न झाला आहे. यंत्रात,प्रेत जाळण्याला, आमचे लोक, आज तयार नाहीत हे सुधारकांना कसे कळत नाही. क्षुल्लक बाबतीत, साऱ्या समाजाचे माथे फिरेल, असे साहसी बूट काढून आपलेच दात पाडून घेण्यात यांना भूषण वाटते. प्रत्यक्षात, सरकारची "री'ओढण्याचा हा उपक्रम होय. आणखी एक म्हणे, या भट्टीला खर्च कमी येतो, म्हणे. पण हे सिद्ध केले गेलेय की, मोकळ्या जागेत- हवेत, प्रेत जाळण्यालाच कमी खर्च येतो.

   आता, त्यांचा महत्वाचा तत्कालीन सरकारास सल्ला.

        ज्या इंग्रज बहादूरानी, या सूचनेचा जोर दिला होता, त्यांस आमची अशी विनंती आहे की, त्यांनी आपल्या लोकांच्या प्रेतांनी, आमच्या, या आर्य भूमीला, विटाळ न करिता, ती भट्ट्यार्पण करावी.,""".

        आज ही स्मशानात, हे चालू झाले आहे. म्हणे लाकडे वाचतात. पण कोणी स्मशानाजवळ राहणाऱ्या, लोकांना भेटले आहे का? अशाप्रकारे जेव्हा विद्युतदाहिनीमध्ये दहन होते, तेव्हा तेथे काळ्या रंगाचा धूर व अतिशय उग्र वास पसरतो. तेवढ्या वेळात जवळपासच्या लोकांना अक्षरश:  उलट्या होतात.

पण जेव्हा विधिवत, अग्नी संस्कार होतात, तेव्हा बरोबर लाकडे असल्याने दर्प वेगळा व साधा येतो. 

 मी दादर व मालाड च्या स्मशानाच्या जवळील, लोकांशी, बोलले आहे.

         लोकमान्यांच्या वरील सल्लाशी तर आपण सहमत असालच. त्यांची चर्च स्मशाने एकाच ठिकाणी. शिवाय. कॉव्हेट शाळा ही तेथेच. बघा आपणच या शाळेतून, आपली पोरे पाठवतो. 😂😂

          ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू