लोकमान्य टिळकांच्या उपदेशाचा मागोवा.

 लोकमान्य टिळकांच्या उपदेशाचा मागोवा.

         प्रिय चौकस वाचक हो, मी आपल्याला, लोकमान्य टिळक यांची खरी ओळख करून द्यावयाचा, प्रयास करणार आहे. तुम्ही त्याचा प्रयत्नात रूपांतर कराल, अशी आशा आहे.

     आज जे जातीय राजकारण, करून मुंबई चे जन जीवन तुंबविण्याचा प्रकार चाललाय,, त्या पाश्वभूमीवर, हा त्यांचा लेख वाचनीय व मननीय आहे, हे तुम्हाला निश्चितच पटेल. लो. टिळक व सावरकर यांनी, राजकारण व त्याच बरोबर समाजकारण ही साधले. बघा, त्यांचा हा तत्कालीन, "केसरी तील" लेख.

      13 सप्टेंबर 1892.

      """ एका विशिष्ट उद्देशाने भरवलेल्या सभेविषयी त्यांचे भाष्य.

       अध्यक्ष यांनी काल, या प्रश्नाचा कोणत्या दिशेने विचार करावयाचे, आपणास कळविलेच आहे. आमच्या उद्योगधंद्याची कोणत्या रीतीने सुधारणा होईल, याचा विचार करण्यासाठी, आपण येथे जमलो आहोत. तेव्हा औद्योगिक दृष्टीनेच या विषयांचा विचार केला पाहिजे. जाती धर्म दृष्टीने कशी ही असो, परंतु एका धंद्याचे अगर एका स्थितीतील लोकांना, जुटीने कोणतीही गोष्ट करणे असल्यास, जातीसारखे दुसरे साधन नाही. वर्ण व्यवस्था कशी उत्पन्न झाली, तिच्या पासून, एकत्रित येण्यास काय फायदे, झाले, ते लक्षात घेणे, जरूर आहे.

       मूळत: जाती, ह्या निर्माण झाल्या, त्या भगवत गीतेत म्हटल्या प्रमाणे, गुणकर्मविभागश: होत."""'

  म्हणजे जो तो आपल्या कल्पने नुसार, पेशात शिरला. त्यात उच्च निचतेचा भाव मुळात नव्हता. पुढे कळत नकळत, संततीही, वडिलधाऱ्या, सोबत त्याच व्यवसायात शिरली. आणि पिढ्या न पिढ्या, त्यावरून जाती निर्माण झाल्या. त्या काळात रोटी बेटी व्यवहार, सर्रास चालत असे.  प्रभू परशुराम यांची आई क्षत्रिय होती, तर पिता ब्राह्मण होते. कैकयी क्षत्रिय नव्हती. विश्वामित्र, जन्माने क्षत्रिय तर कर्माने ब्राह्मण होते.

    या जातीभेदामुळे आजवर संस्कृतीचा बचावच झाला आहे. प्रत्येक जातीची सर्व व्यवस्था, जातीमार्फतच चालत असे. अपराध्याला, जातीच्या पंचाद्वारे ताबडतोब, शिक्षा दिली जाई. ती मान्य ही केली जाई. अन्यायाला जातबंधू द्वारे एकजुटीने, न्याय मिळे.

या व्यवस्थेचा उपयोग करून घेतला पाहिजे, ना की त्यायोगे, समाजात, फोडा फोडी व्हावी. """

    खरे तर मला असे वाटते, की मराठा, हे मुळचे क्षत्रिय, "दाते व रक्षणकर्ते"  

       आज, एका व्यक्ती मुळे, ते, आरक्षण मागतात. तर ते याचक झाले आहेत नं??? जे पिढ्या न पिढ्या, मनगटाच्या जोरावर, जगले, ते आज असंतोष पसरवत आहेत. बरे हे फक्त महाराष्ट्रीयच मागतात. असो.. 

 वाचा व विचार करा. मुलांनो,तुमचे भविष्य तुम्हाला हाक देत आहे, तुम्ही त्याला साद द्या.

           ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू