डरना जरुरी है. प्रसंगी थोडी माघार घ्यावी

 डरना जरुरी है. थोडी माघार घ्यावी.

         प्रिय जागरूक वाचक हो, सदैव, हा सल्ला दिला जातो. घाबरू नका. आगे बढो. पण मी उलटंच सांगतेय नं, अर्थात त्यामागे सबळ कारण आहे. 

    बघा, कालचा लेख वाचलात  व यावर विचार केलात का? बघा जर त्यावेळी, महाराज्ञी येसूबाई व राजमाता सकवार यांनी, तो " माघारी " चा निर्णय न घेता, " जिंकू किंवा मरू "हेच धोरण मानून, रायगड लढायचे, ठरवले असते, तर काय झाले असते, माहितेय, जे मोजके निष्ठावंत, गडावर होते, ते धारातिर्थी पडले असते. मग कदाचित स्वराजच धोक्यात आले असते. त्यासाठीच, त्यांनी माघार घेतली.

       यावरून माझी, लहानपणची एक आठवण सांगते. जेव्हा आपले चीन बरोबर युद्ध सुरू झाले, 1962 मध्ये. तेव्हा, मी सातवीत होते. माझे वडील, border वर होते.. तेव्हा, सर्व शाळातून एक  गीत कोरस मध्ये बोलायला लावत.

       "" जिंकू किंवा मरू ""

     ज्यांचा border शी काही संबंधच नव्हता, त्या मुली जोर जोराने, "मरू" म्हणत, पण आम्ही, तिघी बहिणी तो शब्द उच्चारू शकत नव्हतो. वडील, तेथेच होते नं

      तर आपल्या आयुष्यात ही बुद्धीबळ या खेळाच्या, अनुसार माघार जरुरी असते. डरना जरुरी हैं.

आता ऐका च मी सांगते, ते या माझ्या व्हिडीओत.


एक विचित्र गोष्ट, तेव्हा, अशी घडली होती, आम्हा शाळकरी मुले मुली  जे गीत मरू या शब्दात बोलत होतो, तेच  नेमके तत्कालीन सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे घडत होते. सैनिकांना रसद-- अन्न आणि दारुगोळा पुरेसा मिळत नव्हता. आणखी खूप काही***

    आणि शेवटी तेव्हाच्या सरकारच्या धोरणातूनच.  देशाचा, कित्येक  भाग चीन ला देऊ केलाय. असो. हेच आज मीडिया मध्ये बाहर येतेच आहे. तेव्हा अलग  सांगणे, लगे.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू