आपल्या शूर वीर व धर्मवीर शंभू राजें संस्कृत पंडित सुध्दा होते, त्यांनी लिहिलेला ग्रंथ - बुधभूषण
आपल्या शूर वीर व धर्मवीर शंभू राजें संस्कृत पंडित सुध्दा होते, त्यांनी लिहिलेला ग्रंथ - बुधभूषण
छत्रपती संभाजी महाराजांची खरी ओळख व महती, त्याकालीन तत्सम जनतेने व प्रजेने जाणून घेतली असती तर~ आता जर तर म्हणण्यात काही अर्थ नाही. पण या धुरंधर योध्याला, जनतेने साथ दिली असती, संताजीप्रमाणे व कवि कलशा सारखे स्वदेशप्रेमी व स्वधर्मनिष्ठ सगे सोयरे मिळाले असते, तर आपले आजचे जीवन किती समृध्द समाधानी असते व स्वधर्मात योग्य स्वतंत्र व स्वबल झालोअसतो. जर कित्येक सरदारांनी स्वार्थी विचार न करता, या शिवशाहीत स्वतःला झोकून दिले असते तर ~~. एखादे इवल्याशा वतनाचे धनी न होता, संपूर्ण मराठा राज्याचे अधिपति झाले असते. आरती नंतर जी मंत्रपुष्पांजलि म्हणता ना, त्याचा अर्थ माहित आहे का? ते स्वप्न तेव्हाच सफल झाले असते. निदान अाजतरी जागे व्हा. जगजेत्ते होऊ शकणार्या आपल्या पंतप्रधानांना, मा.मोदींना साथ द्या. हिंदुत्व त्यांना कळलेय हो.
हां तर, आपण परत वळू या, बुधभूषणकडे. कित्येकजण नको त्या पध्दतीने अस्मिता व स्वाभिमान यामागे लागत आहेत. पण तो आभास आहे. आज आपल्याला मोगल व ब्रिटीश काळापासून, पाठ्यक्रमिक अभ्यासाला हिंदुत्वाबाबत शिकवण्यास मुभा नाही. इतर धर्मिय खुलेआम मदरसा च कॉंव्हेंटमधून धर्म विषयक पाठ शिकवू शकतात. शंभुराजांनाच जर दिर्घायुष्य लाभले( rather if he survived) असते, तर त्या काळात मुलीबाळी सुरक्षित राहिल्या असत्या. तो विचार न करता ती पुरूष मंडळी पैसा वतन वतन करत बसली. मी सतत तेच कानीकपाळी सांगण्याचा प्रयत्न करतेय. दूरकी सोचो। ही नेते मंडळी अचानक येवढी गब्बर का होत आहेत, ते गणित सोडवा हो. आणि आपल्याच पुढच्या वंशजांच्या सुखीसमाधानी जीवनासाठी फुल ना फुलाची पाकळी मागे सोडा. आता बुधभुषणातील समृध्द शैली अभ्यासू या.
ह्यात ते सूर्याचे स्तवन करत आहेत. बघा.
सिन्दूरस्पृह्या स्पृशन्ति किरणं कुम्भस्थमाधोरणा ।
भिल्ली पल्लवशंकया विचिनुते सान्द्रं द्रुमद्रा ।
( द्रोणिषु) कान्ताः कुंकमशंकया करतले मृद्रन्ति लग्नंम् यत् । त्ततेजः प्रथमोद्भंव भवकरं, सौर चिरं पातू वः
सिन्दूरस्पृह्या स्पृशन्ति किरणं कुम्भस्थमाधोरणा ।
भिल्ली पल्लवशंकया विचिनुते सान्द्रं द्रुमद्रा ।( द्रो? णिषु)
कान्ताः कुंकमशंकया करतले मृद्रन्ति लग्नंम् यत् ।
त्ततेजः प्रथमोद्भंव भवकरं, सौर चिरं पातू वः ।। ६१ ।।
अर्थ:- सुर्याचे किरण, जणू हत्तीच्या गंडस्थळ मस्तकावर पडल्याने, सिंदूराप्रमाणे चमकत आहेत. अन् भिल्लीणी तो ओला सिंदूर समजून, द्रोणात घेऊन, कुंकुम समजून लावत आहे. हे सुर्या, तुझे हे उदय काळीचे पहिले तेज आम्हाला पावन करो.
आता नीट विचार करा, असे प्रतिभावान साहित्यिक शेैलीवान व धैर्यशाली साहसवान धर्मनिष्ठ प्रजाहितदक्ष छत्रपती संभाजी महाराज, आपल्याला दिर्घकाल प्रशासक म्हणून लाभले असते, तर आपण नक्कीच विश्वाचे राजे असतो पण निव्वळ स्वहिताच्या लाभासाठी, जे घडले ते, योग्य होते का? विचार करा. चिंतन करा. मनन करा. अन् इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून सतर्क व सजग रहा. उद्या ह्या भुतकाळाचा व आपल्या हातात असलेल्या वर्तमानकाळाचा अाणि भविष्यकाळाचा विचार करू व त्याला अनुसरून आचार वर्तनशैली बनवू या. हो ना? चला तर, उद्या मार्ग शोधू या.आपली मंत्रपुष्प+ अंजलीचा अभ्यास करू या. ते जे आरती नंतर, घसा खरवडून, आपण काय ओरडतो, ते जाणून घेऊ या.. असेच देवापुढे काय मागणे, करतो ते माहित नसेल, तर... 😂😂.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.
Comments
Post a Comment