परशुराम. दशावतारातील सहावा अवतार.
28. परशुराम. दशावतारातील, सहावा अवतार.
ज्ञानार्जन इच्छुक अशा माझ्या प्रिय वाचक हो, माझे कालचे promise, लक्षात आहे, मी आपण नेहमी आरती नंतर म्हणत असलेल्या मंत्र+ पुष्प+ अंजली बद्दल सांगणार होते, तुम्ही म्हणाल, असा विषय का बरे बदलला.. नाही हं, मी त्याच बाबत लिहिणार आहे. फक्त आधी त्यातून, आपण त्या ईश्वराकडे काय व का मागणी करत आहोत, हे जाणून घ्या.
आपण त्यातून योग्य जनहितदक्ष शासन कर्ता मागतो.
पूर्वी राजेशाही होती, त्यामुळे, त्याच वंशांतील, राजपूत्र शासन कर्ता म्हणजे अधिपती होत असे. त्यामुळे प्रजा, हा भावी राजा योग्यच निपजो, त्याला योग्य असे शिक्षण व शौर्य लाभो. गुरू गृही चांगले संस्कार मिळो अशी प्रार्थना करत. तो प्रजा हित दक्ष होवो.
पण आज दोर आपल्या हातात आहेत. आज लोकशाही आहे.आपण योग्य अधिपती निवडू शकतो. असो. अयोग्य व भ्रष्टाचारी नेत्यांना पाय उतार करणे, सर्वस्वी आपल्या हातात आहे. फक्त पारखी नजर पाहिजे.
आता मला ह्या सहाव्या अवताराचीच का आठवण आली. कारण परशुराम हे जमदग्नी पुत्र. त्यांची माता क्षत्रिय व पिता ब्राह्मण ऋषी. हो त्या काळी सर्रास असे विवाह होत असत. तर सहस्त्रार्जून नावाचा राजा जुलमी होता, प्रजेला छळायचा. भ्रष्टाचारी होता. मग काय त्याचे अधिकारीही, त्याच मार्गाने जनतेला लुबाडत. त्यात त्याने परशुराम पिता, जमदग्नी यांचा वध केला. का तर त्याला, त्यांच्याकडील, कामधेनू हवी होती. साहजिक परशुरामांनी, सहस्त्रार्जूनाचा पराभव केला. तो मारला गेला, तेव्हा प्रजा आनंदी झाली. तेव्हा परशुराम यांनी अशा जुलमी राजांचा शोध घेऊन, एकूण 21 राजांचा पराभव केला व जनतेची सुटका केली.
आरतीत आपण म्हणतो, "नि: क्षत्री". आणि निक्षत्रिय नव्हे. दोन्हीतील फरक समजून घ्या. तर मुख्य म्हणजे शासन कर्ता कसा नसावा, हे ओळखून निवडणुकीत योग्य व्यक्तीलाच निवडून देणार नं??
तर आधी परशुराम महती ऐका.
तर मग तय्यार नं... सध्या रस्ते पूल बोगदे ही सुविधा, विकास जल प्रकल्प योजना व शिक्षण, धर्म रक्षण व वरिष्ठ लोकांची गरज हे कोण करते व कोणी या योजना रद्दबादल केल्या होत्या, ते अभ्यासा. आणि आपल्या मुलां-नातवंडांचे भविष्य घडवा निदान बिघडेल, असे करू नका.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.
Comments
Post a Comment