दत्तगुरू, ही ज्यांना, गुरू स्वरूप मानत ते बाकी 17 ते 24 गुरू
डिसेंबर 2025 दत्तात्रय गुरूंचे गुरू त्यांचे कोण गुरू आहेत, ते आपण अभ्यासतआहोत.
माझ्या अभ्यासू व जिज्ञासू वाचक हो, स्वागत करते.
क्षमस्व. मध्ये दोन दिवस गुगलच्या server च्या problem मुळे blog टाकण्यात अडथळे आले व तुमच्यापर्यंत, मी पोहोचू शकले नाही. खरे तर फार महत्वाच्या विषयावर, आपण बोलत होतो, असो. तर..
दत्त गुरूंना वंद्य असलेले पुढील गुरू 17 ते 24.
दोन दिवस आपण, गुरूंच्या गुरूंनी , ज्यांना गुरू मानले, त्यांच्या अनुभवावरून काय शिकायचे , ते जाणून घेतले. आता पुढील,
" गुरू"पासून त्यांना काय शिकवण मिळते, ते पाहू. १७ नं.च्या गुरूंचे नाव व पेशा वाचून,तुम्हाला, धक्काच बसणार आहे. पण हे खरेच शिकण्यासारखे आहे. बघा.
१७. पिंगला वेश्या. गुण: -आशेचा त्याग.
पिंगळेच्या, बाबतीत झाले असे कि, एके रात्री बराच काळ वाट बघितल्यावरही एकही पुरुष पिंगला वेश्येकडे न आल्यामुळे तिला अचानक वैराग्य आले. अन् तिने, "ते" स्विकारले. पण जरा नाईलाजाने. जोपर्यंत -अंगी आशा प्रबल होती, तोपर्यंत तिला सुखाची निद्रा लागली नाही. पण जेव्हा , काही बिघडत नाही, उलट,तिने ते सर्व जण, गृहस्थ धर्माला जागत आहेत, अशी समजूत करवून घेतली. तेव्हा उलट तिला समाधान वाटले. म्हणून स्व-आशेचा त्याग करण्याने, तिला चिरंतर सुख मिळाले. म्हणून स्वतःच्या फायद्यापेक्षा, इतरांच्यासाठी सुखाची मनिषा करण्याने, संसारात एकही दुःख बाधत नाही.
१८. टिटवी. गुण: उपाधीचा त्याग करणे.
यासाठी एक छान गोष्टच सांगते हं. एक टिटवी, चोचीत मासा धरून उडत होती. ते बघून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागले, तिला टोचा मारू लागले. तिने ओळखले कि, हे सर्व, या माशामुळे ( घेतलेल्या उपाधीमुळे) होत आहे. शेवटी तिने तो मासा टाकून दिला. तोच एका घारीने त्याला पकडले आणि हे बघताच, टिटवीला सोडून सारे कावळे, त्या मासा उचलणार्या घारीचा पाठी लागले. पण मग ही टिटवी स्वस्थ चित्त झाली. त्याच प्रकारे संसारात उपाधी- नाहक पदे वा धनदौलत, बाळगण्याने, नको तो, ससेमिरा मागे लागतो. त्यासाठी मी कोणीतरी मोठ्ठा आहे. या भ्रमात हवेत उडू नये. त्यापेक्षा शांती महत्वाची आहे.
१९. बालक. गुण: आनंदी. लहान मुले मानापमानाचा विचार करत बसत नाहीत. वाद-भांडणे लगेच विसरून, एकत्र येतात. तसेच जग हे, नेहमीच, आपल्या मतानेच चालावे,असे मानू नये. सर्व चिंतेचा भार दूर करून बालकाप्रमाणे राहावे आणि आनंद भोगावा.
२०. कंकण. गुण: negative गुरू. एकान्तवास साधणे.
नेहमी, दोन बांगड्या एकावर एक आपटून त्यांचा आवाज होतो. त्या प्रकारे दोन माणसे किंवा पुष्कळ माणसे, अतिरेकीपणे एकत्र आल्यावर कलह होतो. म्हणून आपण जरा distance राखावा. थोडक्यात, " अति परिचयात् अवज्ञा" होय.
२१. शरकर्ता (कारागीर).बाण बनवणारा. गुण: एकाग्रता
एकदा एक कारागीर एकाग्र चित्ताने बाणाचे पाते सिद्ध करत बसला होता. त्याच्याजवळून राजाची स्वारी वाजतगाजत थाटात गेली. नंतर एकाने त्याला विचारले की राजाची स्वारी बघितली का? तेव्हा कारागीर म्हणाला की मी आपल्या कामात गर्क असल्यामुळे मला ते कळले नाही. शर- बाण तयार करणार्याच्या, perfect कामगिरीवर, त्या राजाचा पराक्रम अवलंबून असतो. त्यासाठी, त्याची एकाग्रता महत्वाची. असते. राजाचा वा नेत्याचा उदो उदो करण्यात कोणाचेच भले नसते.
२२. सर्प. गुण: सावधता.
दोन साप सहसा एकत्र आढळत नाहीत. साप हे नेहमी सावधपणे फिरतात, वाटेल तिथे राहतात, पण अपकार, (कोणी छेड काढल्या शिवाय) केल्यावाचून कोप करत नाहीत. तसेच,दोन बुद्धिमत्तांनी कधी एकत्र येऊ नये, भांडू नये, मोजकेच भाषण करावे व विनाकारण कोणाला डंख - उणेदुणे काढण्यात, आपली बुध्दीमत्ता फुकट घालवू नये. आजकाल फेसबुकवर हेच चाललेले असते नं!
२३. कोळी. गुण: ईश्वरेच्छा
तुम्हाला माहीत आहे, ज्या प्रकारे कोळी घर बनवतो व मनास वाटेल तेव्हा पुन्हा त्या घरास गिळून स्वतंत्र होतो. बघा आधी सुबक असलेले, कोळ्याचे जाळे, तो सोडून गेल्यावर , जळमटे बनते. तसाच ईश्वर ही हे जग उत्पन्न करून मनास येईल तेव्हा त्याचा नाश करतो. म्हणून जगातील घटनांना कवटाळून राहू नये.
२४. भ्रमर गुण: ईश्वरस्वरुपता
भ्रमराची अळी, कोशात, एकात्मकता पावते, तेव्हाच जशी स्वतः भ्रमर स्वरूप पावते. तसाच एकनिष्ठपणाने भक्ति व चिंतन करणारा भाविक, भक्त आत्मरूपास पावतो.
बघा अशा प्रकारे, अनेकांपासून, आपण , जीवनाच्या प्रत्येक टप्पावर, अनेकांपासून, खूप काही शिकू शकतो फक्त आस पाहिजे व नजर पाहिजे. मुख्य म्हणजे, आपणातील कमतरता ओळखली व स्विकारली पाहिजे.
" मला माहितेय. मला सर्व येतेय" हा अपसमज" सोडला पाहिजे. बघा समजू घ्या व स्विकारा. अन् इतरांसाठी, योग्य गुरू बना. निदान आपल्या मुला नातवंडासाठी, गुरूस्वरूप व्हा. आदर्श रहा.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
Comments
Post a Comment