श्री दत्तगुरू ही ज्यांना, "गुरू "" मानतात ते पुढील 9 ते 16 गुरू

 दत्तगुरू ही ज्यांना गुरू मानतात ते पुढील 9 ते 16 गुरू.


धर्मप्रिय वाचक मंडळी हो,  मी 3 तारखेस दत्तात्रयांच्या २४ गुरूची,आपल्याला ओळख करून देण्यास प्रारंभ केला. अन् ८ गुरूवर्याची महती लिहिली.  पण नंतर, आधी चालू असलेला मुद्दा,पुढे लिहिला. (मंत्र+पुष्प+अंजलि)  आता परत त्यांच्या पुढील गुरूंची महती जाणून घेऊ कि,  तारीख २३व  २५ ला इतर १६ गुरूंची महती सांगेन. पण जरा बदल करावा लागला. मा

       तर आज दत्तजंयतीच्या शुभदिनी, त्यांचे पुढील ८ गुरू  त्यांच्या सगुण महत्वासह समजून घेऊ या.

        ९. अजगर गुण: निर्भयता

अजगराप्रमाणे भक्तांनी नशीबावर विश्वास ठेवून, जे काही थोड्या प्रमाणात वरदान मिळेल, ते  आपलेसे करून घ्यावे, व त्या समाधानाने, आत्मविश्वास वाढवावा. कधी कधी, काही मिळाले नाही, तरी स्वस्वरूपाची जाण करून घेऊन, स्वतः चे समाधान करावे.  जसे अजगराला, नेहमीच भक्ष्य मिळत नाही. पण तरीही, आधी पोटात, गेलेले खाद्य, तो पुरवून खातो. 

      १०. समुद्र. गुण: परोपकारी. समुद्रात, भरती व ओहोटीचा क्रम चालूच असतो. त्याप्रमाणेच आपल्या आयुष्यात, up- downs होतच राहणार. पण समुद्राप्रमाणे प्रत्येक मनुष्याने स्वधर्माची जाणिव मनी ठेवून, जे सुख व उपभोगांचा लाभ मिळेल त्याचा, गर्व करू नये, वा दुःख कोसळल्याने निराश होऊ नये, सदैव आनंदी असावे.

 

    ११. पतंग. गुण: मोह त्याग .

हा गुरू negative स्वरूपाचा आहे. आपल्या हिंदी सिनेमातून, असे प्रेम करावे.bla-bla- bla. दाखवत अाले आहे. पण हे चुकीचे आहे. तरूणांनी, असा पागलपणा करू नये. जीवनात, आपल्यासाठी, इतर ही परिवार असतो.ध्येय असते.   ज्या प्रकारे दिव्याच्या मोहात पतंग जळून मरतो.त्याचप्रमाणे  वेड्या प्रेमात वा अपयशात,  मनुष्य पतंगाप्रमाणे आपला नाश करून घेतो.       

      १२. मधमाशी. गुण: धनसंचय. 

   हा सुध्दा negative गुरू आहे. सत्य काय आहे, माहीतेय, मधमाश्या कष्ट करून, जेवढ्या प्रमाणात मध साठवतात, तेवढ्या प्रमाणात, मध खाऊ शकत नाही.  परंतु, नादिष्टासारख्या, संचय करीत राहतात.  त्याचप्रमाणे धनसंचय करीत राहताना, अचानक मरण येते, हा उपदेश घेऊन अतिरेकी द्रव्यसंचय करण्याचे सोडून द्यावे.. 

        १३. गजेंद्र (हत्ती).गुण 

             हा ही negative गु्रू आहे. तो काम विकाराच्या वश असतो.

      हत्ती बलवान असला, तरी त्याला पकडण्यासाठी , शिकारी, एक हत्तीणीची लाकडाची मुर्ती ठेवतात. व तो मुर्खासारखा, तिच्या मोहात, पडून, खड्ड्यात पडतो. त्याचप्रमाणे, मनुष्य प्राणी, लटक्या मोहातून, बंधनात पडतो.

    १४. भ्रमर. गुण: विषयांत न अडकणे

हाही negative गुरू होय.

सूर्यविकासी कमळे सूर्य मावळताच मिटतात. अशा वेळी भ्रमर, वेळेचे बंधन व  limitation जाणून न घेता, तेथेच रेंगाळतो व कमळाच्या पोटात बंधन पावतो. यावरून ‘ कोणताही आसक्तीने, मोहात अडकले, तर बंधन प्राप्त होते, हे जाणून  विषयांत आसक्ती बाळगू नये.

 

     १५. मृग -गुण: मोह त्याग negatuve.

 वार्‍याप्रमाणे गती असल्यामुळे जो कोणाच्याही हाती लागत नाही, असा कस्तुरीमृग मधुर गीत ऐकताच , त्यामागे, धावतो व  आपला जीव परस्वाधीन करतो. हे लक्षात ठेवून कोणत्याही मोहात अडकू नये.

 ..   १६. मत्स्य. गुण: चवीत न गुंतणे. negative गुरू. 

 कोळ्याने, गळाला बांधलेल्या, भक्ष्याच्या, मोहात भुलल्यामुळे मासा, तो गळ मुखी घेतल्याने, प्राणास मुकतो. त्याप्रमाणे मनुष्य जिभेच्या चोचल्यापायी, चमचमीत,  खाण्याच्या, वेडापायी, आजारपणा व मरणही ओढवून घेतो.  पथ्य न पाळणे. 

 बघा, हे नकारात्मक गुरू, आपल्याला खूप काही शिकवणार आहेत.  आपण, सर्वांनी ही, या शिक्षकांच्या अनुभवांपासून, विचार व आचार आत्मसात करणे, आवश्यक आहे. वाचकांना निश्चित पटेलच. फक्त मानणे व अनुसरणे, खचितच घडते, हे सत्य. पण माझे सुजाण वाचक, ह्याला अपवाद ठरावेत, ही माझी मनिषा पूर्ण करणार ना, मित्रमैत्रिणीनो. यात तुमचेच भले आहे. तेव्हा please हे इतरांनाही पटवा. कसे ते सांगणे नलगे.

         ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू