मंत्र +पुष्प + अंजलि. अर्थ. आपली त्या परमेश्वराकडे, असलेली "असली " व योग्य मागणी
मंत्र + पुष्प+अंजलि. अर्थ. आपली त्या परमेश्वराकडे असलेली "असली" आणि योग्य मागणी.
माझ्या ज्ञानार्जन इच्छुक वाचक जन हो, मी कित्येक दिवसापासून, याबद्दल तुमचे कुतूहल जागे केले होते. आज तो अर्थ सांगत आहे. ह्या विनवणीची पूर्तता, होण्यासाठी, आपल्याला ही काहीतरी करणे जरुरी आहे हं.
इथे मी फक्त अर्थ सांगेन. मुख्य श्लोक, तुम्ही जवळील "आरती" च्या पुस्तकात बघून, अर्थ समजून, घ्या बरे.
ॐ ज्ञनेन पासून अर्थ पुढील प्रमाणे आहे..
सर्व भूतलावरील, तसेच स्वर्ग निवासी देवांनी "यज" करून, परम अशा विश्वात्मक परमेश्वराचे पूजन केले, कारण यज्ञ हाच, "अशुभसूचक", गोष्टींचे बंधन करण्याचा, श्रेष्ठ मार्ग आहे. व साधन आहे. आपल्या वैदिक धर्मामध्ये, यज्ञाचे महत्व सर्वोच्च आहे. ह्या विधिने वातावरण प्रसन्न होते.
. ज्याप्रकारे, "देवस्वरूप", हे स्वर्गात असते. त्या प्रमाणेच राजा - सम्राट पृथीतलावर सर्वश्रेष्ठ असतो. त्या साठी शासनकर्त्यानेसुद्धा, ही जबाबदारी समजून व जाणून आपले कर्तव्य करावे. फक्त अधिकार गाजवू नये. अधिपती असण्याचा फायदा घेऊ नये.
आतां बघा, आपल्या पूर्व पुण्याईने, "महान अशीच व्यक्ती, हे पद प्राप्त करून घेतात. ईश्वर सर्व शक्तिमान आहे. तो सर्वव्याप्त व उदात्त आहे. अशा ईश्वर स्वरूपाला आम्ही वंदन करतो व विनम्र विनंती करतो की, "हे देवाधिदेवा, भक्तांचे अंत: करण, तु जाणतोस, तु आम्हा, सर्व मानव जातीच्या इच्छा पूर्ण करतोस, पण त्यासाठी तुझेच स्वरूप असलेला अधिष्ठाता, तु आमच्या कल्याणासाठी, प्रजापालक असा, " राजा तथा शासक" म्हणून पाठव. आम्हाला त्याची पारखण्याची व निवड करण्याची शक्ती व सुबुद्धी दे.
आता मला, एक सांगा हे आपण विनवून, मागणे मागत असताना, आपला सूर कसा पाहिजे, विनयशील की बोंबलत बोलायचे, तो ईश्वर ही म्हणत असेल, ही मागणी आहे की धमकी, अं 😄. तर आता जर ह्याचा अर्थ मनापासून समजला व उमजला असेल, तर ह्या पुढे, हे, "देवे", कसे म्हणाल, हात जोडून 🙏की, मोर्चात घोषणा दिल्यागत, विचार व आचार बदल करा हो🙏.. आज इतकेच, पण महान. आता उद्या पुढील,
कुबेराय नमः. कुबेर तर देवांचा खजिनदार. धनदाता मग उद्या त्याला अर्थपूर्ण -- meaning आणि आर्थिक सहाय्याकरिता 😊 नमन करूया.
🙏🙏🙏
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.
Comments
Post a Comment