नकाराधिकार व आपण.

 नकाराधिकार व आपण. 

       माझ्या प्रिय वाचक हो, एक मिनिट, मी track बदलला नाही. उलट आधी, दत्तगुरू यांच्या, negative गुरूं प्रमाणे च, हा नकाराधिकार आपल्या जीवनाला, track वर ठेवतो. चांगले व सुखी जीवन देतो.

        हा नकाराधिकार प्रत्येकाच्या आयुष्यात यश व समाधान या  बाबतीत फार महत्वाचा मुद्दा आहे. कित्येकदा, एखादी विशिष्ट गोष्ट, आपल्याला पटत नसते, करायची नसते, तरी आपण करतो. का तर, सर्व करतात, मग नाही कसे म्हणायचे, इतर शेजारी वा  मैत्रिणी वा कलिग्सची मुले करतात, म्हणून आपल्या मुलांना ही force केला जातो. especially  १० वी नंतर मुले सायन्सलाच जावी, असे पालकांना वाटते. मग त्यांची आवड असो वा नसो. शाळेत सायन्सचा अभ्यास प्रत्यक्षच करावा. इतर विषय महत्वाचे मानले जात नाहीत. ते काय मार्क मिळवण्यापुरते, हे असे मुलांच्या व पालकांच्या मनावर ठसवले जाते. आपल्या आवडी नुसार,शिकावे.  इतर सामाजिक दबावाला बळी पडू नये. नकाराधिकार वापरून आपल्या आवडीच्या क्षेत्रात जावे, ही यशाची किल्ली आहे. या किल्लीचा वापर योग्य पध्दतीने व योग्य वेळी करायला हवा. लोक काय म्हणतील, या फालतू कल्पनेपायी, आपल्या करियरला तिलांजलि देऊ नये. 

      हे मी नुसते लेक्चरबाजी म्हणून सांगत नाही. मला दोन मुले. मोठ्याला ड्रॉंईंग व भूमितीत  intetest होता. सातवीतच त्याने tech school ची माहिती मिळवली.व मी त्याला दादरच्या डिसिल्व्हा टेक्निकल मध्ये  घातला.  साहाजिकच १०वी नंतर त्याने आवडीच्या क्षेत्रात डिप्लोमा करायचे ठरवले. मी मुभा दिली. पण आजूबाजूच्यांनी मला बोलून खाल्ले. मी पैशाकडे बघते. तेच दोन वर्षाने धाकट्याच्या बाबतीत घडले. त्याने arts  जायचे ठरवले. पुन्हा तेच. मी त्याला सायन्स/ कॉमर्सला न घालण्याने, त्याचे नुकसान करत आहे. हे ऐकावे लागले. पण सुदैवाने, दोघे ही आवडीच्या क्षेत्रात( इंटिरिअर डिझाईनर व वकिल) यशस्वी व समाधानी आहेत. जर त्यांनी, त्यावेळी संकोचाने, आपली आवड व्यक्त केली नसती. किंवा आम्ही , " लोक काय म्हणतील, हा विचार करत बसलो असतो व प्रवाहात वाहून न जाण्यासाठी,  हा """ नकाराधिकार""" वापरला नसता, तर ~  हेच पुढे , एका सुप्रसिध्द  सिनेमात दाखवले आहे. सगळ्यांनी अगदी आवडीने, सतरांदा हा सिनेमा पाहीलाय.  पण काही धडा शिकलेय का? विद्यार्थीवर्ग व पालकवर्ग?  तो आहे, - THE THREE EDIOTS.  त्यात हेच दाखवलेले बघितले. जे आपला अंतरात्मा सांगत आहे , ते ऐका. स्विकारा. मग यश व सरस्वती व लक्ष्मी नक्कीच आपल्या पाठीशी उभी राहिल. 

      तो रांच्चो,  फोटोग्राफी साठी passianate असलेल्या मित्राला सांगतो, "  दुनिया क्या कहेगी, सोच के तु इंजिनियर बनेगा, लेकिन बुढापेमें, दुःखी होगा, आँद्रेका लेटर आया था, पर लोग क्या सोचेंगे, इस विचार में ~~.

      हेच छत्रपती संभाजी महाराजांनी, आपल्या बुधभूषण या लहान वयात लिहिलेल्या ग्रंथात स्पष्ट लिहिले आहे. जे पाहिजे, ते योग्य असेल व आपल्यात  योग्यता असेल तर संधी सोडू नका.  भीड आपल्याला अपयशाच्या पायर्‍या उतरवण्यास भाग पाडते. सध्या  आपण फक्त एक श्लोक  बघितलाय. (चार दिवसापूर्वी) हा  संपूर्ण  ग्रंथ जणू अशा उपदेशांचा खजिना आहे. दासबोध व बुधभूषण मनापासून अभ्यासलात तर, जगातील अव्वल नंबर मिळवाल. हे विसरू नका. मी पौढीने बोलत नाही. पण या दोन्ही ग्रंथांनी व ज्ञानेश्वरीने मला जे शिकवले,  ते ज्ञान, एक प्रकारच्या, 😆  व्हिटमिन्सच्या तय्यार  टॅब्लेट प्रमाणे मी या BLOG मधून तुम्हा सर्वांना देऊ इच्छिते.  चांगल्या प्रकारचे literature  साहित्य ही भरपूर कमाई देऊ शकते. पण त्यासाठी शालेय जीवनापासून निबंध लिहिण्याची सवय पाहिजे. तेव्हा पालकांनो, मुलांना पंख पसरू द्या. तरच ते त्यांचे आकाश शोधतील व भरारी घेतील. समाधानी जीवन जगतील.

      आज संपूर्णपणे व्यक्तिगत असा वर्तमानकाळ. ओके. तर हा BLOG वाचनात interested  अशी मंडळी वाढत्यात. हे माझे यश आहे. कारण हे माझे क्षेत्र आहे.  लेक्चर देणे.😁🙂.

नकाराधिकार व आपण.

           ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू