मंत्र + पुष्प+ अंजलि. अर्थ. भाग दुसरा. कुबेराला विनवणी.

 मंत्र + पुष्प+ अंजलि.

   अर्थ. भाग दुसरा. कुबेराला विनवणी

           वाचक हो, आलात, फार बरे वाटले.  आरतीच्या नंतरचे,"देवे" म्हणता, त्याचा अर्थ समजून घेण्याची, तुमची उत्सुकता, खरेच, प्रशँसनीय आहे.

   तर काल म्हटल्या प्रमाणे आपण, आज देवांचे खजिनदार, कुबेर महाराज, यांना, जी विनवणी करतो, ( प्रत्येक आरती नंतर) ती जाणून घेणार आहोत. अर्थाजन व त्याची जमाई, आपल्या दृष्टीने, महत्वाची आहे, ह्यात दुमत नाही नं, मगsss. आता आम्ही, या पुढे, मंत्र पुष्प  ओंजळीतून, कुबेराला  नमन करीत आहोत. तु आम्हा सर्वांची,. तु इच्छा पूर्ती करतोस. तु संपूर्ण विश्वाचा आधार आहेस. तुझ्या विना कार्य कसे सफल होईल, अर्थ (धन) सहाय्याशिवाय. अशा महान व उदार रायाला, देवांच्या खजिनदाराला, आम्ही," ॐ स्वस्ति", या मंत्राचा जप करून, मन:पूर्वक नमस्कार करतो. हे देवाधिदेवा, आम्हाला, असाच शासन कर्ता लाभो, की ज्याची, कार्य पद्धती कुबेराच्या, पसंतीस उतरेल व तो   या राजकर्त्यावर कृपा करील. त्या दृष्टीने असा शासन कर्ता, निवडण्याची, योग्य मती, तमाम प्रजेला दे.

       यास्तव, या साम्राज्य व्यवस्थेचा उपयोग व उपभोग,सर्व सामान्यांना मिळो. सत्ता, थोड्याच लोकांच्या हातात राहून, ती फक्त त्यांच्याच स्वार्थासाठी राबवली जाऊ नये. येथे प्रजेचे राज्य प्रजेच्या, तंत्राने, व प्रजेसाठी चालावे. शास्ते हे, लोकांच्या हितासाठी झटावेत. आमच्या राज्यातील शासन व्यवस्था उत्तम असावी. संपूर्ण विश्वात,आमचा, राज्य कारभार वैशिष्टपूर्ण व अनुकरण करण्यायोग्य ठरावा. ही व्यवस्था अशी आगळी वेगळी असावी की प्रजाननांची, त्यावर अढळ श्रद्धा बसावी. सर्व जनता सदैव जागृत असावी. शासनकर्त्यावर, अंधश्रध्दा न ठेवता, त्यांच्या कर्तव्या बाबत सावध व तत्पर राहावी. प्रजेच्या अपेक्षा व गरजांचा राजाने आदर करावा व पूर्ततेसाठी तत्पर असावे. आणि त्याने हा कारभार निस्वार्थ वृत्तीने करावा. त्यायोगे प्रजा सुख समाधान पावेल व राजकर्त्याचे अभिष्ट चिंतन करील आणि तो ही समाधान पावेल व सर्व श्रेष्ठ ठरेल.

       आतां नीट चिंतन व मनन करून सांगा बरे, आज जगाला, आपले पंतप्रधान, आदरणीय का वाटत आहेत. आज जगभर त्यांच्या स्वागतासाठी, आपले, वंदे मातरम व जनगण मन का गायले जात आहे. 

फार पूर्वी, एक सिनेमा आला होता, अजून ही, तो युट्युबवर दिसतो. बघा परत., " कभी खुशी कभी गम ", त्यात लंडनमध्ये एका शाळेत, जन गण मन म्हणताना दाखविले आहे. सर्व उपस्थित परदेशी लोक उभे राहून, मानवंदना देतात. पण तेव्हा, ते फक्त wish full thinking वाटायचे. आज खरेच ते सत्यात उतरताना दिसून येत आहे. का व कोणामुळे, ते आपल्याच मनाला विचारा. मिळालेल्या उत्तराची जाणीव ठेवा.

     उद्या अंतिम अर्थपूर्ण व सार्थ असे  लिखाण म्हणजेच शेवटच्या श्लोकाचा अर्थ. तेव्हा मला वाटते, दररोज ही प्रार्थना घरोघरी म्हणायला हवी. काही घरात, संध्यासमयी "शुभम करोती" म्हटले जाते ही.  पण "काहीच" हे दुदैव. असो. हे ही नसे थोडके.

        ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू