दत्त जयंती (दत्तात्रयांचे २४ गुरू)

  दत्तात्रयांचे २४ गुरू. मंगळवारी दत्त जयंती.   मार्गशिर्ष पौर्णिमा. 

माझ्या प्रिय अभ्यासू वाचक वृंद हो,  मी अचानक, वारांच्या माहिती वरून, गुरूंचे गुरू , दत्तगुरू यांच्या कडे वळलेय.  कारण मूळतः, मी योग्य गुरूच्या बद्दलच लिहित होते. चार दिवसांनी, मंगळवारी, " दत्तजयंती" आहे. आपले सर्वांचे , गुरूवर्य. पण वाचक हो, तुम्हाला, एक गंमत सांगते, आजच्या जमान्यात, कित्येकजण, अमूक एक, आमचे गुरू- एकमेव गुरू / गुरूमाता आहे, अशी गर्वोक्ती करतात,  पण मला सांगा, शाळेत, आपल्याला,  प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक असतात नं! हर एक विषयासाठी, त्या त्या विषयातील, " तज्ञ" मग ~~ तर आपल्याला माहित असायला हवे कि, श्रीकृष्णाने ३२ व दत्तात्रयांनी २४ गुरू केले आहेत. कोणीही सर्वगुणसंपन्न नसते. आपण, इतर योग्य त्या व्यक्ती कडून, चांगले ते ते गुण घ्यावयाचे असतात. हीच शिकवण, श्रीकृष्ण व श्रीदत्तात्रय, आपल्या भक्तांना देत असतात.

   आता, दत्तात्रयांनी, हे खालील गुरू मानले आहेत. 

    १.पृथ्वी, २.वारा, ३.आकाश, ४.पाणी, ५.अग्नी, ६.चंद्र, ७.सूर्य. ८.कबूतर. ९.अजगर. १०. सागर.

    ११ मधमाशी. १२. हत्ती. १३. हरिण. १४. मासा. १५. वेश्या. १६. खार. १७.बालक. १८.ससाणा. १९. भ्रमर. २०. धनुर्धारी. २१.साप. २२. शरकर्ता. २३. टिटवी. २४.पतंग.

 तर वाचा, प्रत्येकाची महती.

१.पृथ्वी- गुण: पृथ्वीप्रमाणे सहनशील  असावे. ती आपल्याला, खोदण्यार्‍यांचा( खाण- शेती - झाडे व इमारती) ह्यांचा राग करत नाही. तर याच्या बदल्यात, त्यांना काहीतरी देतेच.

 २. वायू. गुण: विरक्ती. वारा कोठेही थांबत नाही, आपले वहन चालूच ठेवतो. त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूला मोहित होऊन आपले व्यवहार थांबवू नये.

 ३. आकाश. गुण: अचलता. आपला आत्मा हा आकाशाप्रमाणे निर्विकार, एक, सर्वांशी समत्व राखणारा असावा. निःसंग, निर्मळ, अलिप्त व अचल असावा.

 ४. पाणी. गुण: स्नेहभाव. मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्वांसमवेत प्रेमभावाने वागावे. कोणाशीही पक्षपात करू नये.  हा भेदभाव, माणसांनी चालू केलाय. तो योग्य नाही.

 ५. अग्नी. गुण: पवित्रता. मनुष्याने अग्नीप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे. स्वतः जळावे.अन् तेज परावर्तित करावे.

 ६. चंद्र. गुण: कमी जास्तचे सुख वा दुःख न मानणे.

ज्याप्रमाणे चंद्राच्या कलांचा, चंद्रावर परिणाम होत नाही. तो नेहमी, शीतलच राहतो. तसेच यश अपयशाने दुःखी न होता updowns accept करावेत.

७. सूर्य. गुण: नि:पक्षपातीपणा. सर्वांनाच सारखे मानणे. 

सूर्य हा सर्वदूर व समान  तेज व प्रकाश देतो. पण त्याचा अभिमान न बाळगता स्थितप्रज्ञ असतो. तसे असावे.

 

८. कपोत. गुण: अलिप्तता. हे कबुतर सर्वांपासून अलिप्त असते. कोणी दाणा घालो.वा हाकलवो. तो तिथेच जातो. भित नाही वा परत माणसांवर हल्ला करत नाही.

     तर वाचक मंडळीनो, आपण  ह्या तीन दिवसात ता.२२ शुक्रवार, ता.२३ शनिवार व ( २४ ता.ला माझी व माझ्या asstt. ची सुट्टी) २५ तारखेला, दत्तात्रयांच्या ८.८.८ गुरूंची, ओळख करून घेऊ. मग येईल- दत्तजयंती. मी आशा करते, त्या दिवसापासून, माझे  सुजाण वाचक, योग्य त्या त्या बाबतीत, योग्य ते ते गुरू मिळवतील. एक एकच धरून न बसता, सर्वांपासून, चांगले चांगले गुण आपलेसे करतील.  ज्यायोगे  माझा हेतु सफल होईल. तर नेहमीचीच विनंती, like& share this blogs to everyone & every where with help of  whatsup groups and facebook and so on.

     <> <> <><> <> <> <> <> <> <> <> <>

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू