धर्म रक्षणासाठी बलिदान केलेल्या, श्रद्धानंदस्वामी यांचा खून करण्याऱ्याची फाशी रद्द कोणी केली????

 माझ्या सजग वाचक हो, उद्या, 31डिसेंबर ला रात्री नाचायला जाण्यासाठी जागरण करण्यासाठी आधी जरा या घटनेचा विचार करा. आणि "याद इसे भी कर लो.

            स्वामी श्रद्धानंद यांचा खून!

                   स्वामी दयानंद सरस्वती यांचे शिष्य असलेले स्वामी श्रद्धानंद यांच्यावर आर्य समाजाचा प्रभाव होता.१८९० मध्ये जालंदर येथे, त्यांनी कन्या शाळा  सुरू केली. विधवाविवाह व अनाथरक्षण हे क्रांतिकारक कार्यही त्यांनी सुरू केले. प्राचीन गुरुकुल शिक्षणाचा पुरस्कार, स्वामी श्रद्धानंद यांनी केला. रौलेट या काळ्या कायद्याविरोधात  धाडसी विरोध केला.

              या महान शुद्धीकरणस्वामी श्रद्धानंद यांचा खून झाला. याचे मुख्य कारण हे की,

                    स्वामी श्रद्धानंदांनी शुद्धीकरण चळवळ सुरू केली. अनेकांना त्यांनी हिंदू धर्मात घेतले. घर वापसीची ही चळवळ  देशात जोर धरू लागली. अनेकांनी घरवापसी केली. या चळवळीमुळे स्वामी श्रद्धानंद यांचे कार्य सर्वत्र पोहोचले. त्यांना पाठिंबा ही मिळू लागला.१९२२ मध्ये स्वामी श्रद्धानंद यांनी दिल्लीच्या जामा मशिदीच्या मिम्बर वर चढून, वैदिक मंत्र उच्चारणासह ओजस्वी भाषण केले. हा मान मिळवणारे, श्रद्धांनंदस्वामी, एकमेव हिंदू नेते होते.

             २३ डिसेंबर १९२६ या दिवशी दिल्ली अब्दुल रशीद नावाचा धर्मांध युवक स्वामींना भेटण्यासाठी घरी आला. त्याने, स्वामीं सोबत इस्लामवर चर्चा करावयाची इच्छा प्रगट केली. स्वामींनी, त्याला आत बोलावले. तो अंगावर, काहीतरी गुंडाळून आला होता. थंडीचे दिवस असल्याने, कोणाला संशय आला नाही. पण त्याने पांघरूणा च्या आत, पिस्तूल लपवून आणले होते. त्याने पिस्तूल लपवले होते. त्याने, तेथे असलेल्या,स्वामींचा शिष्य  धर्मपाल यांजकडे पाणी मागितले. पाणी पिल्यानंतर धर्मपाल, पेला ठेवण्यास आत गेल्यावर,अब्दुल रशीदने, स्वामींवर गोळ्या झाडल्या. धर्मपाल यांनी रशीदला पकडले. लोक एकत्र येईपर्यंत स्वामी स्वर्गवासी झाले होते..

      शुद्धीकरणस्वामी श्रद्धानंद यांचा खून!

        स्वामी श्रद्धानंदांनी धर्मासाठी बलिदान दिले. या अब्दुल रशीद नामक माथेफिरुला महात्मा गांधींनी "भाई रशीद" म्हणून गळाभेट घेतली आणि त्याला अभय दिले. त्याची फाशी, रद्द करवली. म्हणे हिंसा नको. पण त्यांनी इतर क्रांतीकारकांची फाशी, खुशाल होऊ दिली. भगत सिंग, सुखदेव व राजगुरू हे आणि अनेक. मुख्य सत्य,मला तुम्हाला सांगायचे आहे. सावरकर यांची, काळा पाणी शिक्षा, याबाबत कोणालाही (कॉग्रेसी नेते मंडळीना) सोयर सुतक नव्हते.

      धर्मासाठी बलिदान देणाऱ्या स्वामी श्रद्धानंद यांच्या चरणी विनम्र वंदन.

      ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.


Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू