माझे रसिक वाचक हो. एका अर्थी गुरूजन हो🙏.

 १७.६ २१. गुरूवार जेष्ठ. शु सप्तमी. 

खरे तर आज गुरुवारची- गुरू ग्रहाची माहिती सांगायला हवी. पण मंगळवार- मंगळ ग्रह व बुधवार- बुध ग्रह यांची माहिती अपुरी राहिली आहे. ती पूर्णतः सांगणे, बरोबर वाटले, म्हणून  मागचाच विषय चालू ठेवला. मुख्य म्हणजे sorry परवा वाराच्या मूळ नावांत चूक झाली.

मंगळवारचे नाव भौम्यवार तर चुकून धौम्य लिहिले गेले व बुधवारचे सौम्यवार होय. भौम्य म्हणजे सदैव भ्रमण वा भ्रमित करणारा. व सौम्य म्हणजे शांत करणारा. म्हटले तर दोन्ही विरोधार्थी. पण सलग्न. मंगळ नशीबाशी तर बुध प्रयत्नांशी संबंधित. 

   अाता येऊ या, कालच्या मुद्दाकडे.  दोन्ही उदाहरणात,  सिध्द होते, खालील म्हण.

  एकूण काय तर, चणे आहेत तेथे दात नाहीत.व दात अाहेत तेथे चणे नाहीत. 


    यावर, छ. शंभुराजेंनी काय लिहून ठेवलेय, ते बघा.

        छिन्द सोतं परक्कम कामे पनुद ब्राह्मण

       संखारानं खयं ञतचवा अकतञ्ञू दि ब्राह्मण  ।।१।। 

        

 प्रत्यक्षात  ब्राह्मण वर्गाची व्याख्या अशी आहे. 

   ब्राह्मण हा उल्लेख,  छ.शंभूराजांना  एखाद्या जाती विषयक अभिप्रेत नाही तर, खरा विद्वान अभ्यासक या अर्थी , ते लिहितात.

     अर्थ. 

      जे विद्वान व प्रज्ञावान आहेत, त्यांना उद्देशून' राजे म्हणतात, कि लालसेची तृष्णा तुम्ही दूर ठेवा- छिन्द-   विभक्त करा. काम- हाव- आपल्यापासून पळवून लावा.  संस्काराचा- सत्कार्याचा  नाश (खयं)कशामुळे होतो, हे समजून घ्या. तरच तुम्ही, आपल्यावर, जे संस्कार( चांगले अध्ययन) केले नाहीत, त्याचे जाणकार व्हाल. 

    तसेच,  ते कालचे, दोन्ही एपिसोड जर लक्षपूर्वक बघितले असले तर ह्याचा अर्थ पटकन चटकन कळेल.

    ह्याचा मतितार्थ हा कि, आपण, आपल्या  ज्ञात माहितीची, महती समजून न घेतातच, आपले  मत तय्यार करतो. आपल्या उत्कृष्ट ज्ञानाकडे दुर्लक्ष करतो. मग या मंगळ व मंगल मधील विरोधी अर्थ, आपल्याला समजतच नाही.  मंगल- अमंगल त्याचप्रमाणे, मंगळ- अमंगळ असे म्हणतो. प्रत्यक्ष मंगळवारचे मूळ नाव भौमवार. 

    भौम जर नपुंसलिंगी असला तर सोन्याच्या दागिन्यातील सोने काढून हिणकस धातू घालणे व पुलिंगी असला तर एक पाप ग्रह  म्हणजे बघा, नेमके काय आहे. जर याच प्रमाणे चिता व चिंता यात गल्लत केली तर ~ तसेच आरतीत मूळ संकटी पावावे ते संकष्टी पावावे.म्हटले जाते. 

    या अशा कित्येक बाबी विचारात घ्यायला हव्यात.

    

. आजच्या  काळात, सबकुछ,  झटपट पाहिजे ना? ज्ञान ही. हाजीर है।  या सरळ सोप्या रितीने, संस्कृत ग्रंथांची ओळख होईल.आजच्या भाषेत. 


      तर उद्या भेटणार नं? मी तय्यार होऊन वाट पाहते. ज्ञानाची ओंजळ भरून. गंमत म्हणजे हे मी तुम्हाला देणार आहे. पण माझी झोळी रिकामी न होता, भरभरून वाहतेच आहे, द्रोपदीच्या थाळीगत. जितके लिहिते, तितकेच माझी मती आणखीन् समृध्द होतेय. गंमत म्हणजे, माझे मूळ नाव, " भानुमति", पूर्वी मला विशेष भावत नसे. पण आता वाटते, सार्थ करावे, माझ्या जन्मदात्यांनी दिलेले नाव.

       अन् तुमच्या कृपेने, कदाचित तर शक्य होईल.    

       तर लहानथोर वाचकहो, 🙏🙏🙏.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू