बातमीचा, " बागुलबुवा व सत्य, जे आपल्यालाच शोधायचेय.
१८.७.२१ . रविवार. आषाढ शुक्ल.नवमी.
या, आलात, माझ्या मनस्वी वाचकहो. दिवसेदिवस आपले वाढता, वाचकवर्ग पाहून, माझा लिहिण्याचा उल्लास द्विगुणित होत आहे. कालचा विषय गंभीरच होता. तरी आपण माहित करून घेण्यात, उत्सुक आहात, हेच माझे यश आहे. अगदी खरे तर आपण जे काही करतो, त्याला इतरांकडून पावती मिळावी, ही कोणाचीही अपेक्षा असते. निरर्थक व निरपेक्ष काहीच घडत नसते. हो, मी ही मालाडला, underprivileged मुलांसाठी, १०वर्षे चालवलेल्या संस्थेतून व आदिवासी लोकांसाठी, जे केले, ते ही काही अपेक्षेनेच केले. ती मुले चांगल्यापैकी शिकावीत व आपले जीवनमान वाढवावे, ही अपेक्षाच नं? असो.
काल मी एक विनंती केली होती. एक तर कोठचीही बातमी ऐकून, हवेवर I mean एका कानाने ऐकून दुसर्या कानाने सोडून देऊ नका. ती घटना नेमकी का व कशी घडली असेल, त्यावर विचार करा. ती , " खबर- breaking news होण्यासाठी, पराचा कावळा केला नसेल नं? ह्याची मनोमन, स्वतःशी चर्चा करा. मग बघा मस्त timepass होईल.
यात पहिले काम म्हणजे अध्ययन. हे काही शालेय style करायला सांगत नाही. शिक्षण म्हटले कि, त्यात सात मुख्य घटक येतात. पहिला घटक शिक्षक- गुरू. आपल्याला विषयाची सांगोपांग ओळख करून देणारा घटक. सध्या आपल्यापर्यंत विषय पोहोचवणारा घटक म्हणजे बातमीदार. हा ती विशिष्ट बातमी आपल्यापर्यंत कशी आणतो. कोठच्या माध्यमातून देतो. हे बघू. पूर्वी आसपास घडलेल्या प्रसंगाची माहिती, आपल्याला शेजारीपाजारी किंवा commen कामवाल्या बायांकडून मिळत असे. ही झाली खाजगी बातमी. पण तीही वेगवेगळ्या व्यक्ती, different angel देतात. मग आपण सर्व गोळाबेरीज करून ठरवतो कि, काय झाले असेल ते आपले मत. मग त्या angel ने आपण दुसर्यांना सांगतो. ओके.
आता जाऊ या, सामाजिक विषयांकडे व त्याच्या source कडे - वर्तमानपत्र. पूर्वीपासून हाच स्त्रोत होता. तरी, तीच बातमी, आचार्य अत्रे 'मराठा' मधून कशी भाषा वापरून देत, नवशक्तीमध्ये साधी सरळ तर लोकसत्ता, आपले त्यावरील मतासकट देई. अजून दूरदर्शनच्या, बातम्या आठवा. सुस्पष्ट व सुसंगत असत. साचा व ढाचा तयार करून सांगत. पण आजचे हे तरूण पत्रकार, without planning बोलत जातात .संबधित मान्यवर व्यक्तींचा उल्लेख चक्क एकेरी करतात. तेव्हा सावधान. त्यांच्या hummering ने news काहीशी रौद्र स्वरूप घेते. अन् आपण, " अरे बापरे! व अग्गो बाई!" म्हणत मनावर भय- चीड- उगीचच हर्ष - वा! छान! अशा भावनांचा पगडा बसून घेतो. पण जरा विचार केला, तर सत्य सामोरे येऊ शकेल. आता कोणी म्हणेल, कशाला ऐवढा विचार करायचा, ऐकायचे अन् सोडून द्यायचे. झालं. मग मी म्हणते, I mean, विचारते, मग आपण मनात विचार तरी कसला करतोय, कि fully blank अं. तर कोणताही विषय, असो, त्याचा आशय व उद्देश जाणून घ्या. मनात घोळवा. जमल्यास, एक वही घेऊन, एखाद्या विषयावर बातमीवर, स्वतःचे मत लिहा. बघा मग कसे fresh & lively वाटेल. दर रोज लिहिलेले नंतर स्वतःच वाचा. आपण कोणीतरी , "खास" आहोत, असे वाटेल. Then start today-now- just now.आज- आत्ता- लगेच. ओके. आज रविवार असल्याने , लेख उत्सुकतेने वाचण्यार्यांची संख्या जास्त आहे. म्हणून त्या, सागरांच्या timetable ने जागा अडविण्यापेक्षा , ते उद्यावर टाकले. या पत्रकाराची मज्जा उद्या बघू या. ओके.
Comments
Post a Comment