आपले आपण मनन व चिंतन करून आपले मत बनवा. No breaking news.
१७.७ .२१ . शनिवार. आषाढ शुक्ल दुर्गा अष्टमी.
आजचा दिवस दुर्गेचा, तर मी विचार केलाय, आपणही दुर्गा बनून का बघू नये? आता, " आणखीन् एक, " आ बैल मुझे मार," चा दाखला देते. खरे तर हे, मुर्खपणाचे उदाहरण नाहीये. माझ्या मते, बैलाला बदनाम करण्याचा एक पध्दतशीर प्रयोग आहे. हे गाई बैल सहसा , स्वतःहून कोणाच्या वाटेस जात नाहीत. पण काहीजण लाल कपडा दाखवून व त्याच्या समोर तो हलवून, जर बैलाला, हूल देत असतील, तर काय बोलायचे? हां, मी आज फार मोठ्ठ्या विषयाला हात घालणार आहे. मग तुम्हीच ठरवा, सरळमार्गी बैल कोण व त्याला उपसणारे कोण? ओके.
नुकतेच सर्व मिडियावर एका लग्नपत्रिकेने, धुमाकुळ घातलाय. वर्तमानपत्र, टिव्ही , मोबाईल, फेसबुक वगैरे वगैरे. ते लग्न आहे, अांतर धर्मिय प्रेम विवाह. मुलगी हिंदू व मुलगा मुस्लीम. नाशकातील घटना. सर्व वाचक ऐकून व वाचून असतीलच. मग काय ह्या लग्नाला जे विरोधक आहेत, त्यांनी म्हणे धमक्या दिल्या. मान्य कि, ही त्या दोन्ही परिवारातील खाजगी बाब आहे. इतरांनी का नाक खूपसायचे, अं? हे ही मान्य. पण मला या परिवारांना एक प्रश्न विचारायचाय. जर ही तुमची खाजगी बाब आहे, तर ही आमंत्रण पत्रिका, social media वर टाकलीच का, आम्हा सर्वांना आवतन, देऊन गावजेवण घालणार होते का? आता ते म्हणतील, आम्ही नाय टाकली, कोणीतरी टाकली असणार! हे कोणीतरी कोण बरे? ज्यांना, ह्यानी घरपोच, पत्रिका दिली, त्यांच्यांपैकीच एक असणार नं? आज कोरोनामुळे, lockdown आहे व लग्न समारंभाला, फक्त ५० जणच allowed आहेत. मग साधारणपणे फक्त २०/ २५ पत्रिकाच छापल्या जातील, हे सत्य मान्य आहे नं? मग शोधा बरे, यातील कोणी हा उपदव्याप केलाय. हे सरळ सरळ जाहीर आव्हानच केलेय. बघा. हं. आणि अपेक्षा ही कि, फेसबुकच्या रितीनुसार फक्त LIKE करा. व comment मध्ये नुसत्या , " वा! छान!" अशा compliments द्या. शब्दशः comments not allowed. हेच हवे आहे कि कोणीतरी विरोधात बोलेल, व ही मंडळी बघा कशी narrow minded आहेत, अशा बोंबा ठोकायच्या. हाच कावा आहे, ह्यामागे, हे समजून घ्या, सर्व लहानथोर मंडळीनो! आणि चक्क ignore करा. या घटनेकडे. " त्यांचा" डाव हाणून पाडा.
आता मला हेच आपणा सर्वांना पटवायचे आहे कि, आपले मत बनवून, जाहीर रित्या मतप्रदर्शन करण्या आधी १ ते २५ अंक मोजा. मग ती पेपरातली बातमी असो, गुगल वरची खबर असो. वा मिडियातील, त्या तरूण पत्रकारांनी बेंबीच्या देठापासून ओरडून दिलेली breaking news असो. जरा imagine करा व चिंतन करून नेमके काय व का घडले असेल , ते सत्य, मंथन करून, तुझाच तु शोधीशी, सत्य. आता कोणच्याही विषयाचा बद्दल मत बनविण्या आधी हा विचार करा, जर कोणी धमक्या दिल्या, अशा गमज्या करण्यापेक्षा, पोलिसांकडे जाऊन, ते मोबाईल नंबर tress करायचे नं. घरी येऊन, जोराने( कोणी हळूहळू तर असले बोलणार नाही) भांडण वाद घातला असेल तर सरळ record कराय़चे. मग दाखवा, ते मिडियावर. crime patrol बघा जरा.😀😂. तर आता खरेच विचारमंथन करणे, हाच timepass करा. माझ्या सत्यप्रिय वाचकहो. उगीच त्या मालिकेंच्या आभासी दुनियेत रमून, त्यांचे फालतू problems सोडवण्यात वेळ वाया घालवू नका. आजच्या सत्य जीवनात जगा. तर हो, मी विसरले नाही. समुद्राच्या भरती ओहोटीचे वेळापत्रक तयार आहे. उद्या uoload करते नक्की.
Comments
Post a Comment