माझा लहानपणीचा गुरू स्वतः निरक्षर असलेला. डबे बाटलीवाला, please don't laugh at me. Laugh with me.😁.

 २८.७ २१. बुधवार. आषाढ कृ.पंचमी.


डबेबाटलीवाला गुरू. दुधाच्या पिशव्या. 

  ही पहिली लाईन पाहून, तुम्ही सर्व गोंधळात पडला असाल नं? आपण " गुरू" कसा असावा व कसा नसावा, ह्या बाबत, विचार करीत होतो. हो. त्याच बाबतीत, हे लिखाण  आहे. रामदासस्वामी सांगतात कि आपला गुरू नीच यातिचा  नसावा. म्हणजे खालच्या दर्जाचा/ पेशाचा नसावा. पण आमच्या बाबतीत, ती एक गंमतच झाली, आमच्या लहानपणी. मी दादरला खांडके चाळीत ( नं.५) राहत होते. तिसर्‍या मजल्यावर. एकूण ९ बिर्‍हाडे.  तर आमच्या चाळीत, एक डबेबाटलीवाला आठवड्यातूण २.३ वेळा येत असे.  दिसायला ओबड धोबड काळा , अगदी कोळशा सारखा. आणि तोंड उघडले कि, समोरचा, एक दात सोनेरी. सर्व मुले जाम घाबरायची त्याला. वरतून थोडा पोक काढून पाठीवर कळकट पोते. पण आमची सर्व पालक मंडळी त्याच्यावर खूश होती. का माहित आहे? स्वतः अंगठा बहाद्दर  असलेला हा प्राणी,  काय करायचा माहितेय?  आमच्या मजल्यावर तरी, त्याचा रूबाब असायचा.  खालून त्याची आरोळी आली, "  डबे बाटलीय",  की आम्ही सर्व शाळकरी मुले, पाटी वा पुस्तक/वही घेऊन, गॅलरीत लाईनीत, अभ्यासाला बसायचो. का बरे, असे वाटले नं? अहो, तो त्याच्या जाड्या भरड्या आवाजात दम मारायचा, बुक लिवली नं, पाटी कुठाय, नायतर चला, पोत्यात टाकतो, नेतो तिथे!  हसाल तुम्ही, पण आम्ही त्याला आमचे लिखाण दाखवायचो. तो ही हेडमास्टर स्टाईल "" ओके!" करायचा. हां म्हणायचा. त्याच्या धाकाने, परवचा (पाढे -table ही बोलायचो. मग हा , आमचा गुरूच झाला नं? समर्थांच्या शब्दात, , "त्याची ती पोत्यात घालून तिकडे न्यायची शिक्षाच, चूपचाप, अभ्यास करवायची. तो त्या दृष्टीने आमचा , कर्ता करविता,  ठरला होता. रविंद्रनाथ टागोराच्या , "काबुलीवाला" हून हा श्रेष्ठ गुरूच ना!  स्वतःला ना शिक्षण ना धड धन, पण इतराच्या मुलांनी शिकावे, म्हणून, खटाटोप. आजही त्या अज्ञात गुरूसाठी, " कर माझे जुळती.,"

    बघा, आठवा, तुमच्याही लहानपणी, नकळत्या वयात, कोणी अशी व्यक्ती अाली असेल, जिने तुम्हाला मार्ग दाखवला असेल. पण सध्या विस्मरणात गेलेली अशी ही माणसे, आपल्या अंतर्मनात असतात. तर शांत मनाने स्मृतींचे मंथन करा बरे. हुडका नक्कीच सापडेल, कोणीतरी.

      तर आणखी एक दाखला - अंध व्यक्ती. अं, काय म्हणता, ते तर बिचारे! --- अं हं. त्यांना सहानुभूती नको. त्यांबद्दल सहानुभाव ठेवा. त्यांना चालताना नीट बघा,  observe करा. त्यांना पुढचे पाऊल जिथे टाकायचे तिथे काय असेल, हे दिसत नाही. पण  केनच्या आधारे, श्रवणाद्बारे ते अगदी सजग असतात. उलट आपणच कधी कधी  "" केक""" कापतो. कळले ना, मला काय म्हणायचेय? घाणीत/ चिखलात/ शेणात पाय टाकतो.  एकदा मी माझ्या अंध विद्यार्थ्याबरोबर, रिक्षाने जात होते. त्याची बँकेची परिक्षा होती. बोरिवलीला centre होते. रिक्षात चढताना माझे डोके वरच्या बारला आपटले. मी जरा आोरडले.  तो हसला. मी  बघत बसले. पण तो शांतपणे बोलला, " मॅडम, रिक्षात चढताना व उतरताना वर हात धरायचा हो. म्हणजे बरे होते. मानले गुरू , एवढेच मनात म्हटले. अन् हो तो कमलेश आज , " विजया बँकेत" आहे.  मग हे ही गुरूच ना आपले! 

      तर आज ही कालचाच सल्ला- शोधा म्हणजे सापडतील, योग्य गुरू

      .जो गुरु भीडसारु ।

       तो अद्धमाहून अद्धम थोरु ।

        चोरटा मंद पामरु ।

         द्रव्यभोंदु ॥ २५॥  

          तर बघा, गुरू भीडस्त नसावा. जर त्या दिवशी, कमलेशने, मॅडमंना कसे बोलू, अशी भीड बाळगली असती, तर आज या  ७..८ वर्षात, मी किती वेळा, रिक्षात बसताना, आपटले असते.😂.  Then alert and grab the guide, when ever you  have chance. 

          तर नीट लक्ष देऊन वाचा व मिळवा, गुरू उपदेश. 

        जरा reference साठी मागील blog ही वाचत रहा.  व इतरांना वाचायला सांगा. ओके. bye for today.

        हो. प्रारंभीचा,दुसरा संदर्भ ( दुधाच्या पिशव्या) राहीला , तो उद्या.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू