धनसंचय कसा वाढवाल!

 १८जुलै २०२३.

हितधोरण व अर्थकारण.
श्रेष्ट व तरूण सुज्ञ वाचक हो, सुस्वागतम्. रविवारच्या दोन्ही blog चे वाचन आपण केलेच असेल, असे गृहित धरून, मी जरा पुढची माहिती व जाणिव, याचा परिचय करत आहे, तुम्ही सुजाण आहातच. तेव्हा,
” हितधोरण,” या संकल्पनेचा अर्थ सांगणार आहे.
परवा या माझ्या तयार केलेल्या शब्दाची व्याख्या वाचली
असेलच. धोरण म्हणजे planning.व हित म्हणजे जे आपल्याला फायदेशीर आहे.पन तेही कसे तर आपल्या समस्त लोकांना उपयुक्त ठरेल.
अर्थ या शब्दातून दोन कल्पना बघतो. एक अर्थ:-त्यातून काय अघिप्रेत होते. थोडक्यात meaning😉. दुसरे धन संचय त्याविषयी कमाई, जमाई ( पुंजी). अर्थात् हे आपल्या मुलाबाळंमांसाठी व म्हातारपणासाठी, planning असते. पण महत्वाचे म्हणजे या वयासाठी व मुलांसाठी wealth बरोबर health राखणे, महत्वाचे असते. हे पटतेय नं?
आज मी थोडे विषयांतर करणार आहे. खरे तर हे मला भाग पडलेय. २ दिवसांच्या पेपर वाचनातून मला हे हितकारण मिळालेय. जे हित धोरण महत्वाचे आहे.
बघा,आता. पेपरमधील पावसाळ्यात हटकून घडणार्‍या ह्या बातम्या. पोहायला, धबधब्यात सहली विषयी दुर्घटना. सर्व जम काय करता, अरेरे! म्हणून नंतर आपला जाय संबंध! मनाबाहेर टाकता. काल रविवारी, मार्वेच्ता समुद्रावर पोहायला गेलेली ५मुले बुडाली. सर्व मुले साधारणतः १२ ते १६ वयाची. या अशा जोरदार पावसात, मुले समुद्रावर पोहायला निघाली असता, एका ही पालकांनी सोबत जाण्याचा विचार केला नाही. असो. पंधरा दिवसापूर्वी, वांद्राच्या बिचवर, एक मुलगी , आपल्या परिवाराचा फोटो काढताना, समुद्रच्या लाटेबरोबर बुडाली.तेव्हा तरी फोटोसाठी, smile देत उभ्या असलेल्या समस्त नातलगांना, तिला असलेला धोका दिसला नाही. नागपूर मधील घटनाही तशीच. साधारण १५ वर्षाच्या मुलांना हर शहाणपण हवे कि, आपल्याला पोहता येत नाही , तर असले नसते, शौर्य दाखवू नये. ही जाणिव एका दिवसात रागवू येत नसते. त्यांना बातम्या वाचून – टिव्हीत दाखवून परिणामाची जाणिव- धोरण होणे, आवश्यक आहे. हे मध्येच काय, असे वाचकांना वाटेल. पण अर्थकारण करून, पुढे असर काही घडले, तर काय , ” हादसे”, होतात, माझ्या short film मध्ये बघा. महसूस करा बरे।



आता, मी आणखी एक उदाहरण देते. साधारण ७ ८ महिने पूर्वीची बातमी. एका सधन कुंटुंबातील २वर्षाच्या मुलाचा, BIRTHDAY एका बड्या resort मध्ये साजरा केला होता. केक कापून झाला. ती पार्टी, तेथील swimming pool च्या जवळ चालली होती. सगळे मज्जा करत होते व तो ,” Birthday boy” ते अजाण बालक pool जवळ गेले, कोणाचे लक्ष नसावे(?) अन् पाण्यात पडले. मग , घडली दुर्दैवी घटना! यात कोणाचे हित धोरण चुकले सांगा। तेथील care takerला म्हणे, कामावरून काढले. अर्थ- पैसा खर्ची घालण्याचा, मोठेपणा झाला. पण ते पोर फोटोत बसले ना? बघा विचार करा. असा पैसा खर्च करून, पार्टी करण्यापेक्षा साधे पणी साजरा करणे. खरे, अर्थकारण ठरते नं?
ही घटना खरी अाहे.
आता जरा समारंभाच्या अर्थकारणाचा, आढावा घेऊ या., पुढच्या भागात. तर उद्या भेटणार ना! विचार करा. जमल्यास be active- alert and share this blog to yours , “अपने लोग” जिनकी आपको दिलसे .
हमदर्दी और फिक्र है।
तो मेरे सुजाण वाचकहो, मिलते है कल यही पत्तेपर, यानि, गुगल के, https//sunitakarnikshow. com पर।

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू