सभ्य मवाली व कथित मवाली सभ्य.
९.९ .२०२३ . सभ्य मवाली व कथित मवाली सभ्य.
वाचक हो, आपण जेव्हा इतरांसाठी काही करतो, तेव्हा आपण ही काही शिकत असतो. आता बघा, या आदिवासींसाठी , आपण खूप काही करत आहोत, या समजातून घडलेली घटना वाचा. तुम्ही म्हणाल, मूळ विषय सायबर क्राईमवरून हे काय? पण हेच सत्य आहे. मला मुळात अपराध व गुन्हा हे स्पष्ट करायचे आहे. काळ बदलला, वेगऴ्या प्रकारचे गुन्हे वाढले. पण पूर्वीच्या पध्दतीही चालूच आहेत.उलट सभ्यपणा गायब होतोय.
आपण सुशिक्षित व सुसंस्कृत हो ना? काल सांगितलेल्याच ट्रीपमध्ये घडलेली घटना. सर्व जणांना जमवण्यात आम्ही कार्यकर्ते व्यस्त होतो. तीन पाड्यावरील लोकांना एकत्र करावयाचे होते. त्यांना मी नीट बसवत होते. तेव्हा या दिवाळीच्या प्रसंगी प्रथमच आलेल्या महिला व पुरूषही, त्यांच्याशी संभाषण करीत होते. आधीच्या काही प्रसंगांमुळे, त्याकडे लक्ष पुरवणे, गरजेचे होते. हे अनुभवाने जाणवले होते. तेव्हाही काही (सभ्य) व्यक्तींची नजर काही वेगळेच सांगत होती. असो. no comments. पण त्या महिला , आदिवासी बायकांना विचारत होत्या, तुम्ही ब्लाऊज- पोलके का घालत नाही, आम्ही तुमच्यासाठी जमा करून पाठवू. मग सर्वजणी घालत जा. एका बाईने, कशाला व्हय, विचारले. आपल्या शहरी महिलांनी एकत्रपणे सांगितले, " लोक वाईट नजरेने बघतात, मग हे झाकायला नको का?" बायका काहीच बोलल्या नाहीत. एकमेकांकडे पाहून हसू लागल्या. अन् काय झाले माहीत आहे? जवळच बसलेला म्हातार्या आदिवासी माणसांने ( हो खर्या माणुसकी असलेल्या) मध्येच तोंड घातले. "अव् बायो, ते तर आईचे देणं ना, मग त्याकडे कोन बेणं वंगाळ नजरेने बघणार? आयची सय नाय येणार?" एक पोरगेलसी बाई, तोंडावर पदर घेऊन बोलली, पघा, त्यांच्या शहरांत असेच व्हतं असेल. दुसरी उद् गारली, व्हय व्हय, म्या बघितलेय. ह्यांच्या अंगभर कापडं असून ही, ~ . अाता बोला! ह्यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे नं?
तसेच आज मिडियावर दादरच्या दहीहंडीचे व्हिडिओ बघताना, अामच्या खांडके बिल्डिंगची दहीहंडी बघितली. लहानपण आठवले. आम्ही खांडके बिल्डिंग नं ५ मध्ये रहात असू. अर्थात् आजीची( सर्व तिला काकी म्हणूनच ओळखत असत) आठवण. उंच सावळी पांढरी साडी- वैधव्य आल्यावर त्या काळच्या प्रथेनुसार. पण करारी व्यक्तिमत्व. ती संध्याकाळी -रात्रीच- ८.३० का देवळातून किर्तनावरून येत असे. त्यावेळी खांडके गल्ली वेगळ्या कारणासाठी प्रसिध्द - खरे तर कुप्रसिध्द होती. तेथे नेहमी मार्या-मार्या होत. गल्लीच्या दोन्ही टोकाला चाकू वगैरे व सोडावॉटरच्या बाटल्या फेकणे हे चाले. तर गंमत म्हणजे जेव्हा गल्लीच्या तोंडाशी असलेल्या भाजीवाल्या कडून, काकी आता शिरत असे, तेव्हा ही मवाली मंडळी , हातात शस्त्रे व सोडावॉटरच्या बाटल्या घेऊन, काय वाटते बरे, करत असतील, स्वस्थ उभे राहून , काकी दहा दुकाने ओलांडून जिन्यात शिरेपर्यंत थांबत. अन् मग सुरू खळखत्याकं!
मग हेच खरे सभ्य मवाली नं! काकीही शांतपणे व अारामात चालत येई न भिता. कारण तिला खात्री असणार, आपल्याला हे लोक इजा पोहोचवणार नाहीत.
हेच दाखले अाज सत्यात उतरणे, गरजेचे आहे. तर हा विचार टिकवण्यासाठी हातभार लावणार नं? सभ्य मवाली व आदिवासींची विचार संहिता सर्वत्र पसरवली पाहिजे. त्यासाठी वाचन झाल्यावर, ONLY DO ONE THING THAT SUBSCRIBE AND SHARE THIS BLOG, SO THAT THESE PRECIOUS THOUGHTS WILL DEVELOP EVERYWHERE.
Comments
Post a Comment