आपण ही गस्त घालू या. गुन्हाची विषवल्ली गाडून टाकू या
23.8.2923.
माझ्या सुज्ञ व विचारवंत वाचक हो,काल आपण हे पाहिले कि, फसगत होते, ती परक्यावर विनाकारण व अतिरेकी विश्वास ठेवल्यामुळे. जर आपण सर्वसामान्य सावध व सजग राहिलो, तर ७५% गुन्हे होणारच नाही, विचार करा. मुली फसतात. पण फसवणारी मुले व पुरूष ह्यांना, त्यांच्या पालकांकडून, चांगले संस्कार मिळाले तर योग्य मार्गाला राहतील ना? रस्त्यात मुलींची छेड काढणार्यांना, आजूबाजूच्या PUBLIC चा धाक राहिला, तर नक्कीच फरक पडेल. पण लक्षात कोण घेते? तर माझी 🙏 जोडून विनंती आहे, अशा प्रसंगी, मला काय करायचेय, अशी वृत्ती ठेऊ नका. अहो, कुठेतरी कोणीतरी , तुमच्या मुली बहीणींना पत्नीला मदत करील हो.
तर,प्रसंगी, तुम्ही ही, ” कोणीतरी व्हा”.
अशा छोट्या छोट्या, घटनातूनच, त्या टारगटांची हिंमत वाढते. मग त्यांचे पाऊल पुढे पुढे सरकते. त्या वेळी त्यांचे “TARGET” कोणी ही – आपल्या पोरीबाळींपैकी ही असू शकेल. म्हणून सर्वांनी एकत्र विचार करून प्रत्येक प्रसंगी, वेळेवर , ही विषारी वल्ली उपटून टाकली पाहिजे.
नंतर होणारे अत्याचार व बलात्कार थांबतील. तसेच ,” ती” मुले- मोठेपणी असला गुन्हा करणार नाहीत. त्याचे श्रेय तुम्हाला मिळू शकेल.
😬😂 आज एका पेपरात, एक जाहिरात पाहिली.
लालबागच्या राजाला बाऊन्सर/ बॉडीगार्ड/ गर्दी नियंत्रक पाहिजेत. बोला. तेथेच फक्त , ” गणपती बाप्पा” आहे का? आधी आपण गर्दी करायची, मग आपल्याला धक्के मारायला — बांऊन्सर येतील. तेथे चोर्याही होतात म्हणे. मला सांगा, अगदी असे गृहित धरले, कि बाप्पा तिथेच आहेत, तरी ज्या कित्येकांच्या घरी गणपती बसवतात, ते ही
त्या गर्दीत धाव घेतात. मग घरी त्यांनी कोणाची पुजा केली? भक्ति???? असो. no comments.
पण निदान सोन्याचे दागिने घालून तरी जाऊ नका. ते काय गणेशाला दाखवायला घालतात का???
सध्या इतकेच. कारण आपण सर्व भारतिय आज आनंदात आहोत. आपल्या हरिहर कोटाच्या शास्त्रज्ञांनी बाजी मारली. चांद्रयान ३ चंद्रावर पोहोचले. विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा उँचा- चांदोबाच्या – मामाच्या घरी पोहोचला. अभिनंदन इस्त्रोच्या सर्व स्टाफचे. व त्याना पाठिंबा व fund पुरवणार्या मोदी सरकारचे. मोदी है तो सब कुछ आसान हेे। आता आपला भारत आत्मनिर्भर झालाय. तर असेच आपण ही , ” आत्मनिर्भर होऊ या. व गुन्हे होऊच नयेत, म्हणून सक्रिय होऊ या. मग वाचकहो, तय्यार आहात नं! तर हा विचार सर्वांपर्यंत पोहोचण्यास हातभार लावा. यानी कि, share this blog.
Comments
Post a Comment