लग्न कार्यातील वायफळ खर्च.

 २०जुलै २०२३.

आर्थिक नुकसान टाळा.
या, माझ्या रसिक व चाणाक्ष वाचकहो, धन्यवाद, आज ही आपण सर्व, हा ब्लॉग वाचण्यासाठी आलात, यानि यह , मेरा लिखा हुवा, पन्ना खोलके मुझे मिलनेकी चाहत, मनमें रख के, इस विषय में चौक़नै हुये। आभारी आहे.
मुझे पता है कि, मेरे यह विचार स्विकृत करना और,
this foot prints को follow करना, आसान नही है।
पण काय आहे, हा काही लग्नाचा season नाही. पण लग्न ठरविणे व त्यासाठी, arrangement करणे, बरेच आधी सुरू असते. हॉल निवडणे, डेकोरशन ठरवणे, कॅटरर्स अर्थात् मेनु निश्चित करणे, व्हिडिओग्राफर ठरवणे,
मेक अप वगैरे ४.५ महिने आधी book करून advanced दिला जातो. मग त्यानंतर मी हे समारंभहित अर्थकारण सांगून, काय उपयोग??? ते म्हणजे,
बैल गेला अन् गोठा केला”, असे व्हायचे! .
म्हणून तर काल म्हटले, मी प्रयास करतेय – विचाराचे बीज पेरतेय, पण त्याचे प्रयत्नात रूपांतर म्हणजे पाणी खत घालून actual implication तुम्हाला करायचेय. हं तर, पुढचा अध्याय सुरू.
काल मी pre wedding foto shoot चा विचार मांडला. खरे सांगा, पुढे अख्खे आयुष्य पडले असते, फोटो काढायला, मग हे असले सिनेमा स्टाईल, त्या फोटोग्राफरच्या प्रत्येक सुचनेनुसार, तस्सेच फोटो काढून, खर्च वाढविण्याची गरज असते का? कधी आईवडिलांच्या अशा काही सुचना पाळल्यात का, सांगा बरे. अहो, भावी पती-पत्नीनो, खरे सांगायचे बरे का, निदान मनाशी तरी कबूल करा.😉😁.
आजही मी ह्या मुद्दावरच लिहिणार आहे. मी बोलू नये, पण प्रेम काय, असे by suggestion करतात का? ही stupidity नाही का? असो. वर त्यात खर्चाची फोडणी.
आता तेच reception च्या फोटो अन् व्हिडिओचे. स्टेजवर जाण्यासाठी, लाईन लागली असते, अर्धा तास थोडे. थोडे पुढे सरकून एकदाचे, पाहुणे, उत्सच मूर्ती पर्यंत पोहोचतात, ( अगदी बड्या देवळासारखेच) मग काय,त्या फोटूवाल्याच्या सुचनेनुसार, गर्दीत, उभे राहून, smile द्यावयाचे अन् हुश्श् करत खाली उतरावयाचे. नवदांपत्यांची वआमंत्रितांची दमवणूक! पण करमणूक मानून, पुन्हा बुफेच्या लाईनीत उभे. तसेच उभ्याने जेवायचे. पूर्वी कसे छान होते. शांत पंगतीत बसून जेवण व्हायचे. हे झाले, निमंत्रिताचे. (*) यजमानही, इथून तेथे धावत, सगळ्यांशी बोलायचा, प्रयत्न करत असतात. पण म्हणतात ना, ” धड ना भाराभार चिंध्या,”
वर अन्नाचा भरमसाट नाश! सुरूवातीला असलेले, सॅलड पापड वगैरे उगीच घेऊन टाकले जाते. मग आठवण येते, समर्थरामदास स्वामींच्या दासबोधातील उपदेशाची. असो. ते बोल उद्या सांगते. हा कॅटरर्सचा टेबल भरगच्च भरण्याचा अनाठायी खर्च. विचार करा. जर मोजकेच चार पदार्थ ठेवले, तर काय हरकत आहे? नाही, लोक काय म्हणतील? म्हणजेच, दासबोधात, यालाच, ” प्रवाहपतित” म्हटलेय😂.
शिवाय एक मोठ्ठा खर्चाचा item राहिलाच. decoration. स्टेजवर जणू चकाचक नसेल, तर त्या नवदांपत्याच्या, वैवाहिक जीवनात, प्रकाश कमी पडेल. या पध्दतीने लिहितेय, म्हणून लहानथोर, माझ्यावर, नाराज होतील. पण नीट विचार करा, २.३ दिवसांनी परत हाच लेख, ताज्या लेखासोबत वाचा. नक्कीच पटेल, मला खात्री आहे. Only thing is, to implement this point is somewhat difficult. Try it. Every new thing to be start by somebody. Then why not become yourself , “that somebody.”.
यात मनःपूर्वक विचार कराल, तर तुम्हालाही, अनेक अनाठायी, खर्च जाणवतील. ह्या झाल्या, फक्त ५०% बाबी! तर उद्या येणार नं, माझ्याकडे, या नवीन प्रथाबाबत चर्चा करायला. याच. ह्या तुमच्या आर्थिक फायद्याच्या गोष्टीच आहेत, काही परीकथा नव्हेत. तर विचार करा. share करा. अन् सगळ्यांना लाभ करून, समाज कारण व्हा. see you tomorrow .

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू