Skip to main content

आपले सामान्याचे अर्थकारण म्हणजेच बजेट- जमाखर्च.

 22.july 2023..

आपले सामान्यांचे अर्थ कारण म्हणजेच बजेट-जमाखर्च.

काल मी समर्थरामदासांचे कवन, सांगितले. त्याचा, आपल्या जीवनाशी कसा संदर्भ, मी लावला आहे,वाचा.😍मी आज, तुम्हाला greet न करता direct लिखाणास आरंभ केला नं? इतकी intimancy झालीय,आपल्यात हो नं? तर आता,समर्थांचे , " भोळे भाविक हो,"" हे कवन पाहू या. (संदर्भासाठी २१ जुलैचा, मागचा लेख पहा.) जरा वरच आहे बरे.

समर्थरामदास स्वामी सांगतात, भाविक जनहो, भाविकचा अर्थ काल बघितलाच आहे, भाविक म्हणजे, “काहीतरी खास करू इच्छिणारे, म्हणजेच आध्यात्मात interest घेऊ पहाणारे जन- तुम्ही आम्ही. आधि+ आत्म- कोठचीही गोष्ट सुरूवाती(आधी)पासून आत्म- सात करू बघणारी लोक. सरळ सोप्या भाषेत, एखादा व्यवसाय वा अध्ययन करणे. त्यासाठी, त्यांच्यामते, भक्त होणे, आवश्यक आहे. म्हणजेच त्या क्षेत्रात, ” दिलसे ” interest (लक्ष देऊन) माहिती मिळविणे. मग त्यापासून, “interest,” व्याजरूपी फायदा – धन मिळू शकते. आपण(?), कित्येक व्यापारी जमातींना,
” नावे” ठेवतो, मेहनत करणार्‍यांना(विशिष्ट) मंडळींना ही. पण हेच आपण, नोकरी मिळेल, म्हणून शोधात, वर्ष सहा महिने तरी रिते असतो. ते गुरूंचे चिंतन करा, सांगतात. म्हणजे, खरे तर अशा लोकांकडून धडा घ्या. त्यांच्या, प्रयत्नशीलपणाची, सदैव आठवण ठेवा. त्यांच्या, पध्दतीवर विचार करा. त्यातून आपल्या चूका समजून घेतल्यात तर आपोआप स्वतःच त्यांचे निरसन कराल. व आपली कमाई वाढेल व खर्च कमी होऊ शकतील. प्रतिष्ठेपायी होणारा अनाठायी खर्च अल्लद कमी कराल.
ज्याला, गुरू मानाल, त्याची सेवा- म्हणजे- त्याच्या प्रमाणे वर्तन करा. मग काय नक्कीच यशस्वी (मोक्ष) व्हाल. समर्थरामदास हे पूर्णतः practical होते. त्यांनी गावोगावी, मारूती मंदिरे बांधली, का तर, ” बलशाली” व्हा. ज्ञानी व्हा. हा त्यांचा उद्देश होता. सामान्यांना, ” उपदेश होता कि, आपापल्या क्षेत्रात, “भक्त”, व्हा. ते सांगतात, गुरूच आपल्या शरीराला चालवितो. म्हणजेच, अापले, लक्ष्यच, आपल्याला active बनवितो. हा लक्ष्यरूपी, गुरू, ज्ञान मिळविण्यास, मदत करतो. व्यवसायात, धैर्याने पुढे होण्यास, ताकद देतो. व पैलपारू- धंद्यात – पुढे आणतो. हेच तत्व, मॅकडोनल्डचे संस्थापक , ” रे कोर्क”, सांगतात, आपला उद्योग ओळखा. त्यातील खाचखळगे, आधीच समजून, त्यावर मात करा. बघा, आपण भारतीय, मसालेदार चमचमीत खाण्याचे, ” शौकिन” .पण त्या पिझाच्या सुक्या प्रकाराचे crazy झालोच ना?😬😁. हाच मोक्ष – यश. व्यापारात पैलपार गाठणे.😉.
ही पुढील कडवी,
गुरू मायेचे निरसन,
गुरू मायेचे अंजन,,
गुरूचे अगाध महिमान,
मुझे कित्येक वदावे॥४॥
गुरू संताचे निजगुज,
गुरू मंत्राचे निजबीज,
गुरूचे घ्यावे चरणांबुज,
अनेक तिर्थे त्या ठायी ॥॥५॥
जयजयगुरू मायबापा,
चुकवी च्यौर्‍यांशी खेपा,
भक्तराज ध्यातो गुरूबापा,
ब्रह्मी लय लावुनिया।६॥
ही पुढील कडवी ही अशीच मजेशीर आहेत. त्यातून आपण काय व किती घ्यावे, हे आपल्यावर आहे. या ज्ञानरूपी विहिरीत, दोर्‍याला, छोटा गडू सोडावा कि, मोठी घागर, हे आपल्यावर आहे. त्याप्रमाणेच आपल्याला,
” अक्कल” मिळेल.
Sorry, my dear readers,may I hurt you? but you see, the doctors, always give us injection to recover soon and to be healthy. The same thing, I want to do. Then don’t angry and meet me on my blog, because I am your well Wisher. and wish you will be active. Atleast, encourage, youngesters to read and share and discuss regarding my blogs.


Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू