मनाच्या आरशात नजर टाका व आपले प्रतिबिंब- सेल्फी पहा.
27.7.2023
आपले संत – फिलॉसोफर ही आहेत. तेव्हा दासबोधाचे वाचन पठण करा. पारायण नको.
हॅलो, मित्र-मैत्रिणीनो, हो आता आपलौ ओळख, मैत्रीत रूपांतर झालेय नं? तेव्हा ,” वाचकहो, च्या ऐवजी ,” स्नेहांकित संबोधनच आवडेल-मला व तुम्हाला, बरोबर नं,
हां, आता काल लिहिल्याप्रमाणे, मी माझ्या पूर्वीच्या ब्लॉगची लिंक देत आहे.कृपया ती open करून जरूर वाचा म्हणजे माझे पुढील लिखाण समजेल व उमजेल. ती तुम्ही वाचाल ही खात्री आहे, तरी पण, तुमची उत्सुकता वाढविण्यासाठी, त्यातील उतारे देत आहे. बघा.
==============================
१.मुलांतरूणांनी, मनाशी विचार करावयाचा व ठरवायचे कि, मी आयुष्यात नेमके काय करू इच्छीत आहे. त्या दृष्टीने कोणते शिक्षण, मी घेऊ शकेन, बुध्दीने, स्मरणशक्तीने, आर्थिक परिस्थिति नुसार तो शोध घ्यावयाचा. जमल्यास loan किंवा शिक्षणाला द्यावयाच्या वेळेनुसार, एखादी part time नोकरी . हा सर्व विचार करणे, म्हणजेच selfy होय.
२.मोठ्यांना सेल्फी घेण्यासाठी tips देते. उगीचच दासबोधाचे बैठका वा सत्संगाच्या जागी न जाता स्वतः वाचन करा. फक्त त्याच दिवशी , “तासभर” कोणीतरी सांगतेय व तेथे माना डोलावयाच्या, हे खरे नव्हे. जर एखादा दुसरा वेळ मनापासून ऐकाल, तर निश्चित स्वतः तो ग्रंथ वाचावा, ही प्रेरणा, मनात येणारच.
३.अाता आपली संत मंडळी, याबाबतीत, काय सांगून गेलेत, ते बघू.
असंगाचा संग धरणे। निरावलंबी वास करणे । निःशब्दासि अनुवादणे। कोणे परी । । हा आहे, दासबोधातला दशक ७ वा समास ७. नाव दिलेय , "साधनप्रतिष्ठा निरूपण. साधन म्हणजे आपल्या जीवनाचे व जिविकेचे साधन- उद्दिष्ट. तेच जर ठरवले नसेल, तर आला दिवस , गेला दिवस. असलेच निष्क्रिय जगणे. https://thesunitakarnikshow.blogspot.com/2021/08/blog-post_19.html मी, या ब्लॉगचे नाव ठेवले होते., "निरांवलंबी वास करणे व असंगाशी संग." हे वाचल्यावर लक्षात येईल, समर्थरामदास स्वामी, नुसते संत नव्हते, तर श्रेष्ठ फिलॉसोफर होते. याच सोबत कालचे १० मुद्दे वाचा. म्हणजे हे पटेल. तेव्हा जरा हा ब्लॉग फक्त वाचून सोडावयासाठी नाही, तर त्यातून तुमचे विचार प्रवर्तन होऊ द्या. त्तानुसार आचरण व्हावे व जे बहुतेक सर्वजणांनी , " आवरण" चढवले आहे, ते गळून जास्तीतजास्त मंडळी ACTIVE, व्हा. इतरांना हा blog share करा. व जी तुमची manpower आहे, ती active करा. मग बघा, कसे आनंदी 👌जीवन जगाल. Come on ✌👍.
Comments
Post a Comment