आपल्या मनाच्या कॅमेर्यातून सेल्फी काढा.
26.7.2023. selfy मनाच्या कॅमेरातून काढा. स्वप्ने( दिवा स्वप्ने) संधी व त्यामधील साकव- म्हणजे bridge व्हा.
मी आपली आभारी आहे, आज ही मला भेटण्यास आलात. means you open my blog and try to understand my thoughts and purpose.
तर आज मी आपल्या प्रिय वाचकांना SELFY कशी काढावयाची, ते सांगणार आहे. हसू नका हो. ती मोबाईलने क्लिक करावयाची selfies नव्हे हं. तर आपल्या व्यक्तिमत्वाची, आपल्या अगदी स्वतःच्या- खर्या नजरेतून काढलेली SELFY.
माझ्या विचारांना व आचारालाही, मी हाच base दिलाय
The accountant general ( com) च्या केंद्र सरकारच्या जॉब मधून VRS घेऊन, वयाच्या ४८व्या वर्षी second inning सुरू केली. मनाचा कौल घेऊन, माझ्या आवडीच्या क्षेत्रात, स्वतःला झोकून दिले. एक नक्की कि, मी जरी पूर्णतः , सेवावर्ती म्हणून कार्य केले,( आजवर २५ वर्षे तरी माझे किंवा, माझ्या मुलांचे, अार्थिक नुकसान अजिबात झाले नाही. हां, मी single mother आहे. ते फायद्या कसे ठरले, ते नंतर पाहू. आज मी आपल्याला, “” दिवास्वप्ने व संधी यातील साकव – लहान पूल – कसा बनवला, तो माझा स्वतःचा अनुभव सांगणार आहे. अन् गंमत म्हणजे, त्या नंतर, मी आवडीनुसार, पुस्तके खरीदी केली, त्यातील एक पुस्तक, ” rich dad& poor dad,” मध्ये हेच principle वेगळ्या विषयात- वेगळ्या रितीने मांडले आहे. कित्येक यशस्वी उद्योगपतींनी हेच सांगितलेय. या विषयी १० तत्वे खाली दिली आहेत, बघा. त्याप्रमाणे सर्व आबालवृध्दांनी follow करावी, ही विनंती. खरे तर, second inning सुरू करण्यास, पहिला व्यवसाय, चालू ठेवून ही करता येतो हो. अगदी २०व्या वर्षीही दोन बाबतीत करियर करता येते टाटा अंबानी अडानी बिर्ला जिंदाल-steelking ह्या सर्वांनी अनेक क्षेत्रात पदार्पण करून, यशस्वी वाटचाल केली आहे. मग आपणही थोड्या प्रमाणात का करू शकणार नाही. yes I and you can do it.👍. फक्त आपल्यातील, “राम- आत्माराम -क्षमता ओऴखा.
खरे तर, ही शक्ती आपल्या सर्वात असते. आपण स्वप्ने ही बघत असतो. पण ती दिवास्वप्ने राहतात. म्हणजे कल्पनेतील मांडे. पण तुम्हाला पैशाचे- लक्ष्मीचे स्वामी होणे, सहज शक्य होईल. जर तुम्ही साकव- bridge बांधण्याचे पक्के केलेत तर. संधी नक्की चालून येईल. फक्त त्यासाठी खालील १० बाबींचा पाठपुरावा करा.
१. मोठे व प्रबळ कारण/ प्रयोजन/ उद्देश निश्चित करा.न
२.निवडीचे सामर्थ्थ – काय व कसे करू शकाल – आर्थिक शारिरीक क्षमतेनुसार.
३. मित्र/ मैत्रिणी काळजीपूर्वक निवडा.
४. योग्य सुत्र निर्माण करा. किंवा असलेल्या सुत्रांत प्राविण्य मिळवा.
५. काही सुरूवात करण्या आधी स्वतःच्या गरजा पुर्या करा. स्वःहित सुरक्षित करा.
६. स्वतः वर ताबा मिळवा. be always positive. but not be over confidant.
७. जे ह्यात तुम्हाला प्रोत्साहन देतील, त्यांना सदैव thanksgiving द्या.
८ आदर्श योग्य निवडा.
९. मालमत्ता मिळाल्यावर चैनीच्या गोष्टींच्या मागे लागू
नका. यश सिध्द करण्यासाठी दिखाऊ खर्च करू नका.
१०. मुख्य म्हणजे, इतरांना, आपले पाय खेचण्याची संधी देऊ नका. मुख्य म्हणजे लोक काय म्हणतील बरे, या कल्पनेतून, स्वतःचैच पाय मागे खेचले जाऊ नये, यासाठी सजग रहा.
बघा, पटतेय का?
हेच तत्व मनात बाळगून, जर आपली मुले, काही करू पहात असतील, तर हे काय आपले काम नाही, असे न म्हणता, ” आगे बढो, हम तुम्हारे साथ है,” सांगा.🙏🙏🙏
याच बरोबर मी आपली एका दिवसासाठी रजा घेते. उद्या माझा दोन वर्षापूर्वीचा blog refer करण्यासाठी पाठवीन. हा ब्लॉग, खरोखर share करण्यायोग्य आहे न? मग ,” आगे बढो,” subscribe &share it to needy people..
Comments
Post a Comment