सुखी राहण्यास, सुरक्षितमता हवी. त्यासाठी शांतता मिळणे, आजमितीस दुरापास्तच- अशक्य.
५.१० .२०२३ . सुखी राहण्यास, सुरक्षितता हवी. शांतता मिळणे, आज मितीस दुरापास्तच.
वाचक हो, खरे सांगा, शांतपणे वाचन छान वाटते कि, सतत काहीतरी ऐकणे, तेही मोठ्या आवाजात, हां, डोके उठते ना? आठवतेय, महिन्यापूर्वी, मी लिहीले होते. आमच्या जवळील देवळातील कल्लोळाविषयी. देवभक्त असून ही त्या मोठ्ठ्या आवाजातील( लाऊडस्पिकर) बेसूर भजन ऐकताना, त्रास होत असे. ते ही रात्री ११- ११.३० पर्यंत. आता गणेशोत्सवात तर कहरच झालाय. गणपती आणताना ढमटक ढम तेही डिजे ढोल सहीत. बापरे! ते ढोलकी अशी बडवतात कि, जणू कोणावरचा रागच काढताहेत. गंमत म्हणजे, विसर्जन शांततेने करण्याची प्रथा,पण तेही, जणू आनंदोत्सव असल्याप्रमाणे, ढोल बडवत केले जाते,काय बोलायचे??? आज महाराष्ट्र टाईम्समध्ये बातमी आलेय कि हा गोंगाट, शास्त्रिय भाषेत ८४.१ डेसिमलच्या वरती पोहोचलाय. खरे तर गणेशाची स्थापना पूर्वी घरोघरी होत असे. पूजन अर्चन आरती व मंत्रपुष्पांजलि हे श्रध्देने होई.
ब्रिटिशांच्या विरोधात जनजागरणाच्या हेतूने, लोकमान्य टिळकांनी, या सणाला सार्वजनिक स्वरूप दिले. त्यातून स्वदेश चळवळ उभी केली. पण आज त्याला जे बाजारू स्वरूप आले आहे, ते पाहता, हे आपल्या सामाजिक आरोग्याला घातक ठरले आहे. या दहा दिवसात सोसायटीतून व रस्तोरस्ती गणपती बसवले जाऊ लागले. वर्गणीची मागणी ही कशी तर fix amount ते सांगतात. न दिल्यास~~~ . १५दिवसापूर्वी मी एका सुशिक्षित समाजाच्या whatsup वर join झाले. हेतू हा कि, काहीतरी, "बुध्दिमत्ता वरिष्टम्" अशी चर्चा करायला मिळेल. तर काय सांगू, drinks वर जोक्स वगैरे.
मुख्य म्हणजे एक पोस्ट forward झाली. मतितार्थ असा कि, लेखकाची( 60+) BIRTHDAY पार्टी चालू होती. सगळ्यांच्या हातात ,ग्लासेस होते. थोडक्यात ड्रिंक - चिकन पार्टी चालू होती. शुध्द मराठीत लिहावयाचे तर दारू.
असो. तर ह्या गृहस्थाने , अचानक ढँ ढँ गाणे थांबवून, गणेशाची आरती लावली. सर्व चमकले. ह्याने सांगितले, " हे अप्रस्तुत वाटतेय ना, तसेच गणेशोत्सवात, जी वाह्यात गाणी लावतात, ते अयोग्यच ना?" point बरोबर. पण अहो, मंडळी , जर हिंमत असेल तर तेथे जाऊन सांगा ना! असे नुसते आपल्यासारख्याच," कायर" लोकांत बोलून काय उपयोग? नुसत्याच हवेत फुशारक्या. अन् या आशयाची comments मी त्या गटात टाकली. तर तेथील महिलांनीच मला target बनवले. त्यांच्या हेतू बघा व आजकाल सर्वच ठिकाणी अशा पार्ट्या होतात. त्यात काय एवढे, मानायचे. याहूनही अयोग्य भाषा. हे आपल्यातील महत्वाचे प्रदुषणच - दुषणेच भुषण बनलेत. तिही महिला वर्गात. हे म्हणजे, स्वतःच स्वतःची फसवणूक करणे, होय. मी एकच केले. एक पोस्ट टाकली व तो गट LEFT केला. माझी पोस्ट, " THE BIRTHDAY IS DAY OF MOTHER, BECAUSE SHE GAVE US THE BIRTH. ती जिवित असली, तर तिच्या बरोबर. अगर जिवित नसेल, तर तिच्या आठवणीत दिवस घालवावा. पितरांत बायका ही असाव्यात. सांगा बरे काय चुकले माझे? या sophisticate समाजाचा भाग होण्यापेक्षा, माझ्या संस्थेतील under privilege दुनिया मला जवळची वाटते. जर एखादी, कुप्रथा पटत नसेल, तर "कायर" बनून नुसत्या वल्गना करू नका. तर " कायल" ( जिगरबाज) बनून स्पष्टपणे, योग्य जागी विरोध नोंदवा. माझ्या तरूण वाचकांना स्पष्ट करते.वल्गना म्हणजे," लंबी लंबी सोडणे.
हो, आज मायना ही साधाच व तात्पर्य ही तुम्हीच काढावे, ही अपेक्षा. अर्थात् त्या प्रमाणे वर्तन करणे, ही जबाबदारी ही तुमच्यावर सोपवतेय. तेव्हा असे " कायल" - सर्वांच्या कौतुकाला पात्र बना व इतराना बनवा. For that share this blog to become everybody , "कायल" not be ," कायर". see you tomorrow .
Comments
Post a Comment