पुनश्चः सायबर गुन्यह्याकडे वळू. SUPPLY WHERE THERE IS DEMAND.
२५.१० .२०२३ . पुनश्च: सायबर गुन्ह्याकडे वळू या. supply where demand is.
माझ्या जागृत वाचक हो, काल आपण जरा, एक नवीन अध्याय सुरू करावा, हा सुतोवाच मी केला होता. बहुतेक सर्वांना पटला असेल, पण, "नको बाबा उगीच" ही कल्पना पुढे पाऊल टाकायला, देत नसेल नं. ओके, पण अशा तर्हेने किती तरी अपराध व चुकीचा रस्ता, यावर अटकाव होऊ शकतो. असो. आता एक गंमत. म्हटले तर जबरदस्त फसवणूक. अगदी ३० लाखाची. तीही पुण्यनगरीतील एका वृध्दाची. बिचारा! मात्र असे म्हणू नका हं. एक खास बाब म्हणजे, SUPPLY WHERE THERE IS DEMAND
ही असली मागणी, कोणी सभ्य गृहस्थ करू शकणारच नाही. ही बाबच एक अपराधानेच अंगावर घेतली गेली आहे. ज्या वयात नातंवडांत रमायचे, जर घरात नांतवडे नसतील, तर आजूबाजूच्या गरजू मुलांचे आजोबा व्हायचे, सोडून असली थेरे करणारा वृध्द अगतिक वगैरे असूच शकत नाही. आता पुढे वाचा सत्य घटना.😬.
बातमी:- पीडित वृध्द जुलै महिन्यात कोणाएका ज्योतीच्या मध्यस्थीने, एका कॉलगर्लला भेटला होता. त्यानंतर, त्याला ज्योतीचा फोन आला. पोलिसाने," त्या" कॉलगर्लला मोबाईल चोरीत पकडलेय, तिच्या मोबाईलमध्ये तुमचे call recording आहे. तर गुन्ह्यातील नाव टाळण्यासाठी, blackmail करून ३०लाख रूपये उकळले. पण हे सद् गृहस्थ घाबरले का बरे? स्पष्टच आहे कि, त्या नंतरही त्याने, फोनाफोनी करून कदाचित पुन्हा भेटीचा, आंबटशौकिनपणा केला असणार. खरे तर पोलिसांनी, या वृध्दाचे नाव लपवण्याचे कारणच नाही. असला- नसता उद्योग त्याच्या कुटुंबाला कळलाच पाहिजे. नाहीतरी , या ३० लाखाचा हिशोब, त्याला परिवारात दाखवायलाच लागणार ना? त्याच्या मुलानातवंडाचे, तो कोठे जातो. या कडे लक्ष हवेच ना? खरेच तरूणांना, पालकांनी जपावयाचे, त्यांच्यावर लक्ष ठेवायचे तसेच मुलांनी घरच्या बुजुर्गांवर लक्ष ठेवायची वेळ आलेय. हा हन्त! हा हन्त! 😠😵.
आता ४.५ दिवसापूर्वीचा माझा लेख आठवा. घरात पथ्य पाळण्यासाठी मुलगा सून धडपड असताना, दादर स्टेशनवर, दररोज, परक्या समोर हात पसरून, ( परखडपणे लिहायचे तर भीक मागून) बटाटा वडा व गुलाब जाम खाणार्या, सुस्थितीतील म्हातारी. यांना आवरायचे, तर पाळत ठेवायलाच हवी. घरच्यांना, " भोचकपण" करणे, भाग आहे नं? हा वर उल्लेखलेला म्हातारा, फिर्यादी कसा? ३० लाख लहान रक्कम नाही. तर जीवन भराची जमाई असेल. काय बोलायचे. आपल्या बायको मुलांचा विचार? असो. आपला पाय घसरला, वा जीभ दगा देत असेल, तर नाचक्की होणारच. तेव्हा त्या सुस्थितील ( रहाणीमानावरून) परक्या घरी जाताना, आम्ही दोन शेजार्यांना बोलावले होतेच. आम्हाला दोष लावून हाकलले असते, तर. ह्या भीतिने. तेव्हा आता काय बोलू. To share this blog or not, its depend on you. but atleast think over it. कोणाला हानीपासून वाचवायचे, public च्या हातात असते. जे आपणच आहोत. तर भेटू या उद्या.
Comments
Post a Comment