स्मितहास्य सदैव फुलावे, तुमच्या मनरूपी अंगणी.
२२.११ .२०२३ . स्मितहास्य फुलावे सदैव, तुमच्या मनरूपी अंगणी.
My dear readers, today, I wish that you all become the wisest person in the world. At least around, your surroundings.
हो तर मग माझी ही छोटीसी,पण मोठ्या आशयाची, इच्छा पुरी करणार नं, मला खात्री आहे कि, माझे हे सर्व ब्लॉगस् वाचून, निदान ७०% वाचक, active झाले असतील. तुम्ही कोठच्या गटात आहात बरे-७५% की २५%. चलो आगे बढो। आचारांनी नाहीतरी, निदान विचारांनी तरी परिपक्व झाला असालच. असो. हे झाले माझे wishful thinking. आपले जे कोणी आदर्शवत् व गुरूसमान जन असतात, तेच आपली विचारधारा तयार करत असतात. लहानपणी बहुदा , आपले पालक - आईवडिल- मम्मा पप्पाच आदर्श असतात. तेव्हा , या दोन्ही गटातील व्यक्तींना माझी विनंती आहे कि, आपली IDEOLOGY खरेच योग्य यथार्थ आहे नं, ही खात्री करा. प्रथमतः पालक वर्ग हो, तुमची विचारधारा, आचारधारा, खरोखर, अनुकरणशील आहे का, तपासा. एक छोटेसे पण सर्वत्र घडणारे उदाहरण देते. मी काही मराठीचा गैर अभिमान धरणारी नाही. आपल्याकडील, पुढील शिक्षणपध्दतीला अनुसरावयाचे तर दुदैवाने english media, "must" ठरते. पण मराठीत शिक्षकेचा उल्लेख
सहजी, " त्या बाई" असा केला जातो. पण english . media चे parents मुलांना विचारतात, " टिचर काय बोलली? एकेरी उल्लेख. खोटे वाटले तर, स्वतःच्या मनाला विचारा. किंवा एखाद्या school च्या गेटशी शाळा सुटण्याच्या वेळेस जाऊन ऐका. हाच सर्व प्रथम असा संस्कार. तसेच पालकांनी झोपताना, हात जोडून, एक confession स्वतःशीच द्यावे. ख्रिचन मंडळींच्यात ही प्रथा आहे. मिडिया सोबतच ही रीत आपलीशी करा. हां, तर काय सांगणार होते, कि आपण दिवसभर आपल्या मुलांशी कसे व काय बोललो, कोठच्या पध्दतीने, त्यांना कसे संबोधले? होकारात्मक कि नकारात्मक? अरे हो, मी english media च्या parents ना संबोधत आहे ना? 😉 positive approach or negative
approach? मुख्यतः त्यांना हाक देण्यासाठी कोणता शब्दप्रयोग करत आहात? सन्मानार्थी की त्यांच्यात, कमीपणाची भावना ( inferiority complex ) निर्माण करणारे, शब्द वापरत आहात.
एक भविष्यासाठी इशारा देत, आजकालची मुले कदाचित कमीपणाने , हे घेणार नाहीत, तर पुढील reaction साठी स्वतःला तय्यार करतील. महाभारतात जे घडले ते,संपूर्णतः action - reaction पध्दतीनेच घडलेय. मला वाटते, सुज्ञांस अधिक सांगणे न लगे. आता मुलांनो, आपल्या अादर्शवत् व्यक्तींचे blind followers बनू नका
जे जे तुम्हाला भावते, मनाला छान वाटते, त्याचेच अनुकरण करा.
आता एक गंमतीशीर उदाहरण सांगते, नीट वाचा व वागणूकीत स्विकारा. काही वर्षापूर्वी एक फार मोठे महान गायक होते. गायकीत ते अव्वल होते. पण काय करायचे कि, गाताना, सूर ताल अप्रतिम, पण तोंड वेडेवाकडे करत. सार्वजनिक कार्यक्रमात, आम्हा मुलांमुलींना पुढे बसविण्यात येई. माझ्या सारख्या रडक्या मुली, ते पाहून भोकाड पसरायच्या. पण काही टारगट मुले हसत. मग २.३ वर्षानी, ह्या अशा उत्कृष्ट गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी, आयोजकांनी बच्चे कंपनींना कटाप केले. पण आजकालचे गायक मात्र presentation ला महत्व देतात. तसेच आपण सर्वांनी प्रत्येक वेळी व प्रत्येक नातेसंबंधात संभाषण करताना, presentable and with smile रहाणे, आवश्यक आहे. पटलेय ना? मग सदैव स्मितहास्यवदन रहा बरे! आपल्या प्रत्येक हितसंबंधीयांशी. मग 😊 ला 😊च मिळेल! हेच तत्व सर्वदूर फैलवा हो. this means share these MY BLOGS to yours' near and dear. So that you will get smilies every where.
Comments
Post a Comment