हरकत- अडसर . होणे. असत्यच खरे मानणे. अविद्या व माया.
२८ ११.२०२३ . हरकत - अडसर होणे. असत्य , खरे मानणे
अविद्या , माया.
आता , या परवा सांगितलेल्या पुढील संकल्पना पाहू. याचा अर्थ. कळल्यावर हसाल. अन् म्हणाल, अरेच्चा हे असे नेहमीच घडते, पेपरमध्ये बातम्या येतात. कित्येकदा टिव्हीत live दाखवतात व रिपोर्टर ओरडून ओरडून बातमी अगदी महत्वाची असल्यागत, सांगतात. शिवाय, कित्येक हौशी व नवशी मोबाईलवाले, shoot करून social media वर वायरल करतात. व लोकही हजोरोंनी बघतात. कधी कधी, LIKE ही करतात.
तर आता समजून घेऊ या. या असल्या बिन महत्वाच्या बातम्या.म्हणजे त्या घडतात, वेगळ्या हेतूने व दाखवल्या जातात, वेगळ्याच angel ने. प्रथम बघु या. अविद्या- विद्या तीन प्रकारची असते .। सुविद्या. २.अविद्या. ३.कुविद्या.
ह्या तिन्ही विद्या आपल्या, प्रत्येकात असतात. अन् आपण , त्यांचा मस्तपैकी वापर ही करतो. फक्त प्रश्न हा आहे कि, नेहमीच तो योग्य रितीने करतो का? आवरण व विक्षेप, जेव्हा, व्यक्तीगत, ( तुमच्या- आमच्यात घडते, तेव्हा ते अविद्या म्हटले जाते. अन् जेव्हा दोन किंवा अनेक गटात - जातीत - धर्म पंथात घडते, तेव्हा ती असते माया. साध्या सरळ भाषेत बोलायचे झाले, तर हा आरक्षणाचा आघात बघा. मी स्पष्ट काय बोलू? सध्या एका विशिष्ट प्रकारे आरक्षणाचा मुद्दा कळीचा केला गेला आहे. मुळातील आरक्षीत जन >< अजिबात आरक्षणात न येऊ शकणारे जन>< व तिसरा पंथ आरक्षण अपेक्षीत जन. यात जे काही घडत आहे, ती माया होय. म्हणजे प्रत्यक्षात काही नसणे, पण साबणाचे फुगे उडवणे, पण ते असतात मात्र रंगीबेरंगी व आकर्षक. इनका जीवन पळ भर का ही होता है।
😁 खाता पिया कुछ नही ग्लास फोडा बस. सामाजिक एकता फोडली जातेय. सर्वसाधारण जनतेला यात नेमके काय आहे, कसे घडणार आहे व का, ह्याचे आकलन होत नाहीये. पण देश especially ,आपला महाराष्ट्र त्यात ढवळून निघत आहे. या आरक्षणा बाबत, मी, १५ दिवासापूर्वी, एक सध्या प्रख्यात असलेल्या, महिला डॉक्टरची,medical admission च्या वेळची कुचंबना लिहिली होती. ही माया तिला, पराकोटीच्या नैराशेच्या गर्तेत, नेऊ शकली असती. पण तिच्या हिंमतीची दाद द्यावी, तेवढी थोडी. असो. त्याचप्रकारे मोर्चा, संप, उपोषणे, निवडणूकीच्या काळात, प्रत्यक्ष दिली गेलेली प्रलोभने( चिल्लर लालूच) ही सर्व अविद्या अन् मायाच होय. बघा ह्या सर्व- चारी संकल्पना आपल्याला परिचित आहेत ना?
Thats why, I request to you all people to be safe, from these type of विक्षेप व माया. आपल्या सुविद्याला जागृत ठेवा. माझ्या ता ब्लॉगमधील लेखनाच्या, हेतूला यश द्या. हा विचार सर्वदूर पोहोचविण्यात मला हातभार द्या, कसे ते आपल्याला माहित आहेच.
Comments
Post a Comment