आवरण- इंग्लिशमध्ये cover. -विक्षेप-अविद्या- माया-। ही आपलीच जीवन शैलीबआहे. फक्त त्यांच्या ता नावांची जाणिव नाहीये.
२७.११.२०२३. आवरण - इंग्लिश मध्ये cover. विक्षेप अविद्या - माया. आपलीच जीवनशैली आहे. फक्त त्यांची ह्या नावांची जाण नाहीये.
माझ्या प्रिय वाचक मंडळीनो, संस्कार म्हणजे, जे आपण मुलांना, शिकवतो. जसे वागायला व अभ्यास करायला सांगतो. डॉ. एस. एल.भैरप्पा ह्यांच्या ,आवरण" ह्या महान साहित्यकृतीत, त्यांनी हे स्पष्ट केले आहे. कि आपल्या राज्यकर्त्यांनी, प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासावर, "आवरण" घालून , वर्तमान काळातील सामान्य जनांच्या जाणिवेत, " विक्षेप" आणला आहे.
व मुख्य म्हणजे आपण, ज्या प्रकारे एखादी गोष्ट ज्या प्रकारे सांगतो. बोलण्याची पध्दत शैली. स्वर शब्द वगैरे वापरतो. ते वळणच संस्कार होय. याचा उल्लेख, मी वेगळ्या प्रकारे, ३.४ दिवसापूर्वी केला होता, आठवतेय, तेव्हा ही घरोघरीची बाब, म्हणून सहज समजली, अर्थात् उमजली व आत्मसात केलीत का? तुम्हीच जाणे 😉😊. असो. आपण सुध्दा त्रिकालदर्शी असावे. म्हणजे भुतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ ह्या तिन्ही ही काळाचे भान ठेऊन वागावे व चांगले जीवन मिळवावे. भूतकाळ म्हणजे फार मागे जावयाची गरज नाही. गेल्या महिन्याभर आपण ज्यावर व कसे बोललो वागलो व घडलेल्या छोट्या छोट्या गोष्टींना कसे react झालो, यावर थोडासा विचार करावा. म्हणजेच , " आवरण" या संकल्पनेचा आपण किती उपयोग केलाय? ते लक्षात येईल. कित्येकदा एखादी सत्य पण अप्रिय घटना वा गोष्ट, आपण विसरू पाहतो. थोडक्यात, माझ्या नेहमीच्या सांगण्याप्रमाणे, मला काय करायचेय, माझा काय संबध, जाऊ देत झालं, किंवा मी काय करू शकणार, ह्या रितीने, टाळतो, ते हेच ," आवरण " होय. माहीत असते, सत्य काय आहे, पण उशीला अभ्रा घातल्याप्रमाणे, सत्य झाकतो. खरे आहे ना? हाच भूतकाळाचा मागोवा होय. आता, " विक्षेप" म्हणजे, एखादे, असत्य" खरेच आहे, त्याशिवाय पर्याय नाही. असे कित्येकजण, इतरांनावर, especially पालक, मुलांवर बिंबवतात. मला सांगा, जर सचिन तेंडुलकरांच्या प्राध्यापक वडीलांनी, खेळ- क्रिकेट बंद व अभ्यास - मार्क- रँक असे केले असते, तर भारताला, हा महान क्रिकेटर मिळाला असता का? मुलांना, फुलासारखे उमलून द्या. सतत, " फुंकर " मारून, एकाच दिशेने, फुलायची जबरदस्ती करू नका. असो. हा शब्द बोली भाषेत नेहमीच सर्वजण वापरतो. उगीच विक्षेप आणू नका. वेडेवाकडे अंगविक्षेप करू नये. 😁 म्हणजेच सरळ व सुलभ घटना होऊ द्या. मुख्य म्हणजे आपले विचार - आचार- मतप्रचार व मतप्रसार योग्य दिशेने होऊ द्यात.
मीना प्रभुंनी त्यांच्या, " इजिप्तायन" मध्ये, - पुण्य म्हणजे पर उपकार, पाप म्हणजे परपीडा,"( प/१५६ ) असे लिहिले आहे. माझे सुख दुसर्याच्या दुःखावर उभे नाही ना? माझ्या वर्तनाने माझ्या, आसपास च्या इतरांना ( कुटुंब शेजारी मित्रमंडळींना त्रास होत नाही, हा सदैव विचार करावा. कित्येकदा पालक, स्वतःच्या स्वप्नांचे प्रतिबिंब, मुलामुलीत बघतात व तेच सत्य मानून, ( आवरण) जगतात. पण होते काय कि, त्यामुळे, मुलांच्या बाळ बुध्दीतील, संकल्पनेला तडा जातो. म्हणजेच "विक्षेप" घडतो. तेव्हाया तिन्ही
काळाची जाण ठेऊन, त्यावर मात करणारे चिंरजीवी होय.
ना? तर मग आपण ही चिरंजिवी होण्याचा प्रयत्न करू या. कसे ते, उद्या सांगतेच. तर,या ब्लॉगवर , सहकुंटुंब वसह परिवार या बरे. चांगल्या बाबी सर्वांशी SHARE कराव्यात हो. त्यासाठी काय करावयाचे जाणताच आपण
Comments
Post a Comment