टेहळणी बुरूज. सांप्रत जे जे गरजेचे आहेत ते ते.
८.१२ .२०२३. टेहळणी बुरूज.
प्रिय वाचक मित्रमैत्रिणींनो, मी, हे जे शिर्षक दिले आहे. त्याविषयी जरा सविस्तर सांगावयाचे झाले, तर मी माझ्या या ब्लॉगच्या आरंभी २०२० साली लिहिले होते, त्याची पुनरावृती -( विचार व आचार करण्यासाठी) दोन महिन्यापूर्वी केली होती. जरा आपल्या स्मृतीला जोर द्या. असे अनेक प्रसंग आठवतील. ज्यात, आपण जरा लक्ष घातले असते, तर---- असे जाणवते कि, आपण परिस्थितीत नक्कीच बदल करू शकलो असतो. अन् आपले कौतुक झाले असते. निदान स्वतःचा फायदा झाला असता. परत वाचा. व विचार करा. या प्रकारे, आपण बदललोत का?
टेहळणी बुरूज आजचे. गस्त वर्तमान काळातली.
सतर्क व सुज्ञ वाचकहो, मी काही इतिहासात शिरत नाहीये. आजच्या वर्तमान काळच्याच टेहळणी बुरूजांसंबंधी लिखाण करणार आहे.
टेहळणी बुरूज.
आपल्या छ.शिवाजी राजेंच्याच हर एक गडावर, दुर्गावर चारी बाजूस " टेहळणी बूरूज" असत. ते सर्वांना माहित आहेतच. आज आपले ही प्रत्येकाचे गड व किल्ले व दुर्ग आहेत. आपण साधी माणसे, पण तरी ही असतात. काय म्हणता, काहीतरीच हं.
पण नीट विचार केल्यास मला काय म्हणायचे आहे' ते झटक्यात लक्षात येईल.
आपले गड किल्ले दुर्ग म्हणजे आपला परिवार आपले घर --त्यासाठी घेतलेले loan आपली मुले त्यांना द्यावयाच्या सुविधा, सोसायटी. आपली नोकरी ह्याच प्रकारे, आपले संगोपन करणारे आपले पालक, आपले व या सर्वांचे अारोग्य अन् आसमंतातील, धोक्यापासून संरक्षण. सर्व विश्वभर पसरलेले अापले पुर्वज---This point is wanton & franetic म्हणजे प्रचंड व गहन. तेव्हा स्वतंत्रपणे अभ्यासणे, जरूरी होय. आपली सुरक्षितता आपल्या हातात.
अन् हेच मी माझ्या "आनंदी जीवनाचे रहस्य" या आगामी पुस्तकातून ही सांगणार आहे. त्यासाठीच तर हा blog चा प्रपंच. इथे गड/ किल्ला/ दुर्ग निर्माण करण्याआधीच, मी उभारलेत, "टेहळणीसाठी बुरूज".
माझ्या मनात, बुध्दीच्या जोरावर ज्ञानांच्या चीरा व निरीक्षणाचे लिंपण वापरून निर्माण केले.
आणि मी नजरबाज झाले, तर काय आसमंतात, कित्येक नवलपरी दिसल्या. चांगल्या वाईट. अन् लक्षात आले, चांगल्याचे (प्राचीन ग्रंथ व त्यातील माहितीचा खजिना) चे वर्धन करण्यात आपला व आपल्या समाजाचा फायदा होईल. व जे, या उंच बुरूजावरून अनिष्ट दिसतेय, ते दूर करता येईल. तसेच कित्येकदा, आपल्या जीवनात, आपल्याला सहजपणे, उपलब्ध झालेल्या सुविधा ही आपण विसरून जातो. बघा तुम्ही ही कधीतरी वेडा वाकडा रस्ता cross केला असेल, अन् एखाद्या कारने वा बसने, करकचून break दाबून तुमचा जीव वाचविला असेल, पण ते तुम्ही विसरता,( चूक भूल माफ करा) पण त्याच बरोबर त्यानी करकचून उच्चारले शब्द तेवढे लक्षात रहात असतील. त्यालाच मी बुरूज म्हणतेय. गडावर शत्रू येतोय कि, आपल्यासाठी ," रसद" येतेय, हे या टेहळणी बुरूजावरून पाहणी करणे, ताबडतोब द्वार उघडे ठेऊन, wecome करणे, हे ही गनिमांना रोखण्या इतकेच आवश्यक आहे. हे बुरूज म्हणजे, डोळसपणे व दूरदृष्टीने
भविष्याचा विचार करणे व त्यानुसार वर्तणूक ठरवणे. हेच महत्वाचे असते. त्यासाठी सद्य परिस्थितीची टेहळणी आवश्यक आहे, हे पटतेय नं. त्यासाठी तनमनधनाची योग्य ती काळजी व निगा वेळेवरच करणे, गरजेचे नाही का? तेच तर, परवा सांगितले. नाहीतर , बैल गेला व गोठा केला, असली गत असते, ७०% लोकांची. बघाच, आजूबाजूला, कसे तर टेहळणी बुरूजावरून. तेव्हा आधी आपल्यासाठी हे असले, टेहळणी बुरूज बांधा. on perfect place from where we can watch and judge the situation. and act as per that. त्यासाठीच तर मी सावध करतेय. पण हे काही एकटीचे काम नाही. हा रामसेतू बांधायची कल्पना माझ्या डोक्यात आली तरी, मी फक्त खारीचाच वाटा उचलू शकेन.
"तो राम मला देईल रे"
या समर्थांच्या उक्तीप्रमाणे, मेहनती व रामभक्त वानरसेना मला लाभेल. पण त्यासाठी उत्तुंग आत्मविश्वासाची आवश्यकता अाहे. तो राम कोण व कसा देईल हे जाणून घ्या.
"रा' शक्तिरीति विख्याता
. 'म' शिव: परिकिर्तित:।
शिवशक्तात्मकं बीजं
राम, राम इति गीयते ।।
या श्लोकात " रा " चा अर्थ आहे शक्ती, जी सर्वजणात असतेच. "म" म्हणजे शिव -- म्हणजेच असणे.
शक्ती असणे " क्षमता". शिवशक्ती आत्मकं बीज. हीच आपली प्रेरणा . काही करण्याची प्रबळ शक्ती होय. त्यातूनच या समाजात व मानसात, सर्व प्रकारे कपाळशूळ ठरलेल्या बाबीतून, बाहेर पडण्यास, उभारलेली कार्यशलाका. म्हणजे सामाजिक प्रदुषण दूर व सामाजिक पर्यावरण लखलखीत. शूळाची -- शलाका करण्यासाठी व तो जड शूळ (कांब) तासून त्यातून ज्ञान शलाका( सुर्य किरण) तयार करण्यासाठी या टेहळणी बुरूजावर चटचट या बरे. अन् वाचताना एकटे आहात, पण या सहकुटुंब व सह परिवार व मित्रमैत्रिणी समवेत. यासाठी काय करायचे बरे, ह्या IDEA ची कल्पना, ह्या सर्वापर्यंत पोहोचवायची--- त्यासाठी of course, share these blogs to everywhere and to everyone.
₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹
Comments
Post a Comment